
हुंदाई मोटर इंडिया लिमिटेडने भारतामध्ये ८ लाखहून अधिक कनेक्टेड कार्सच्या विक्रीचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला असून २०२७ पर्यंत १० लाख कार्सचे उद्दिष्ट ठेवली आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमधील कनेक्टेड गाड्यांचे प्रमाण २०१९ मधील ४ टक्क्यांवरून २०२६ मध्ये २० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. ‘हुंदाई ब्लूलिंक’चा विस्तार आणि नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ही वाढ झाली आहे.
कंपनीने आपल्या ‘सॉफ्टवेअर डिफाईन्ड व्हेईकल’ रणनीतीचा विस्तार करत २०३० पर्यंत एकूण २० लाख कनेक्टेड कार्सच्या विक्रीचे लक्ष्य ठेवले आहे. हुंदाईच्या या कनेक्टेड इकोसिस्टममध्ये सुमारे १२ लाख लाईन्सचे कोडिंग असून याद्वारे व्हेईकल मॉनिटरिंग, डायग्नोस्टिक्स, रिमोट फंक्शन्स, सुरक्षा यंत्रणा आणि नेव्हिगेशन यांसारख्या सेवा पुरवल्या जातात.
कार मोडिफिकेशन आणि RTO नियम; महाराष्ट्रात नक्की काय लीगल आहे आणि काय नाही? जाणून घ्या सविस्तर माहिती
दक्षिण कोरियन कार उत्पादक कंपनी हुंदाईने २०१९ मध्ये ‘वेन्यू’ कारसोबत भारतात पहिल्यांदा ब्लूलिंक तंत्रज्ञान सादर केले होते. वेन्यू ही कंपनी-फिटेड कनेक्टेड तंत्रज्ञान मिळवणारी देशातील पहिली एसयूव्ही ठरली होती. सध्या ब्लूलिंकद्वारे सुरक्षा आणि सोयी-सुविधांशी संबंधित ७० हून अधिक फीचर्स मिळतात. यामध्ये रिमोट व्हेईकल मॉनिटरिंग, व्हेईकल हेल्थ डायग्नोस्टिक्स, लोकेशन ट्रॅकिंग, डिजिटल की, हुंदाई पे, डिजिटल पासपोर्ट आणि ५ भाषांमध्ये ४५० हून अधिक एआय-पॉवर्ड व्हॉईस कमांड्सचा समावेश आहे.
हुंदाईच्या या तंत्रज्ञानाचा टप्प्याटप्प्याने विकास झाला आहे. २०२० मध्ये i20 मध्ये ओटीए मॅप अपडेट्स देण्यात आले, तर २०२२ मध्ये नेक्स्ट-जनरेशन AVNT सिस्टीम आणि २०२५ मध्ये Connected Car Navigation Cockpit सिस्टीम सादर करण्यात आली, ज्यामुळे वाहनांमधील सॉफ्टवेअर रिमोटली अपडेट करणे शक्य झाले आहे.
चालू आर्थिक वर्षात लॉन्च होणाऱ्या हुंदाईच्या मास-मार्केट इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये हे नेक्स्ट-जनरेशन कनेक्टेड तंत्रज्ञान सर्व व्हेरियंट्समध्ये स्टँडर्ड म्हणून दिले जाणार असल्याची पुष्टी कंपनीने केली आहे.
आपत्कालीन मदतीसाठीही ब्लूलिंकचा मोठा फायदा झाला आहे. एसओएस आणि रोडसाइड असिस्टन्सद्वारे ५ लाखांहून अधिक वाहनचालकांना मदत करण्यात आली असून, १५,००० हून अधिक क्रॅश नोटिफिकेशन्स आणि चोरी झालेल्या वाहनांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना मदत झाली आहे.
HMIL चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण गर्ग म्हणाले, “कनेक्टेड वाहनांचा वाढता वापर ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा आणि गतिशीलता घडवण्यात तंत्रज्ञानाची भूमिका दर्शवतो. २०२७ पर्यंत १० लाख कनेक्टेड कार्सच्या विक्रीचे लक्ष्य गाठताना आमचा भर सॉफ्टवेअर-डिफाईन्ड मोबिलिटी आणि कनेक्टेड तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यावर असेल.”