फोटो सौजन्य: @BBC_TopGear (X.com)
भारतीय मार्केटसह जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. ग्राहक देखील वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींना कंटाळून आता EV च्या खरेदीकडे वळताना दिसत आहे. पण आता ह्युंदाईने ग्लोबल मार्केटमध्ये चक्क हायड्रोजन कार सादर केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
कोरियातील Seoul Mobility Show मध्ये ह्युंदाईने त्यांची आगामी हायड्रोजन एसयूव्ही ‘Nexo FCEV’ सादर केली आहे. हे एक इंधन सेल इलेक्ट्रिक वाहन आहे, जे 700 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देण्याचा दावा करते. विशेष म्हणजे ही कार हायड्रोजन इंधन भरण्यासाठी फक्त 5 मिनिटं घेते.
BMW च्या ‘या’ दोन बाईक्स मार्केटमध्ये टोटल बंद ! 7 वर्षाचा प्रवास संपला, पण नेमकं कारण काय?
ही एसयूव्ही केवळ तांत्रिकदृष्ट्या प्रगत नाही तर त्याच्या डिझाइन आणि परफॉर्मन्स सेगमेंटमध्ये प्रीमियम फील देखील देते. ह्युंदाईच्या ‘आर्ट ऑफ स्टील’ डिझाइन तत्वज्ञानावर डिझाइन केलेली ही कार प्रीमियम, बॉक्सी लूकसह येते.
Hyundai Nexo चे डिझाइन ब्रँडच्या प्रीमियम EV Ioniq 5 शी मोठ्या प्रमाणात जुळते आहे. याचा फ्रंट HTWO LED हेडलॅम्प सेटअप चार पॉइंट्समध्ये डिझाइन केलेला आहे, जो कारच्या स्टिअरिंग व्हीलवर देखील दिसतो. या कारला काळ्या फेंडर फ्लेअर्स, चौकोनी खिडकीचे डिझाइन आणि एक मोठा सी-पिलरसह एक आकर्षक एसयूव्ही साइड प्रोफाइल मिळते.
अत्याधुनिक डिजिटल अनुभव देण्यासाठी ह्युंदाईने नेक्सोचे इंटीरियर डिझाइन केले आहे. यात 12.3 -इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 12.3 -इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम समाविष्ट आहे, जे एकत्रितपणे ड्रायव्हिंग अधिक इंटरेक्टिव आणि सोपे बनवते. याशिवाय, प्रीमियम साउंडसाठी, यात 14-स्पीकर बँग आणि ओलुफसेन साउंड सिस्टम आहे, जी थिएटरसारखा ऑडिओ अनुभव देते.
500 KM ची रेंज देणारी Tata ची EV म्हणजे कमालच ! मिळत आहे आतापर्यंतचे सर्वात मोठे डिस्कॉऊंट
हुंडई नेक्सो एफसीईव्हीमध्ये अत्याधुनिक हायड्रोजन-आधारित पॉवरट्रेन आहे. यात 2.64 किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक आहे, जो 147 एचपीच्या इंधन सेल स्टॅकद्वारे चार्ज केला जातो. ही बॅटरी एका पॉवरफुल 201 एचपी इलेक्ट्रिक मोटरला एनर्जी प्रदान करते, ज्यामुळे ही एसयूव्ही फक्त 7.8 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते. हायड्रोजन साठवण्यासाठी, कारमध्ये 6.69 किलोग्रॅम क्षमतेची उच्च-दाब टाकी देण्यात आली आहे, जी ती 700 किमी पेक्षा जास्त रेंज देण्यास सक्षम करते.
आजच्या इलेक्ट्रिक कार डीसी फास्ट चार्जरनेही 30-60 मिनिटांत चार्ज होतात, तर ह्युंदाई नेक्सो फक्त 5 मिनिटांत हायड्रोजनने भरली जाते.