फोटो सौजन्य: @MotorOctane (X.com)
भारतीय मार्केटमध्ये दिवसेंदिवस इलेक्ट्रिक कार्सची मागणी जोर धरू लागली आहे. ग्राहकांकडून EV ला मिळणारा प्रतिसाद पाहून आता अनेक ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक वाहनं लाँच करत आहे. भारतीय सरकार देखील EV विक्रीला प्रोत्साहन देत आहे, जेणेकरून वायू प्रदूषण नियंत्रणात राहील.
देशात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या दमदार इलेक्ट्रिक कार्स ऑफर करतात. यातीलच एक प्रमुख नाव म्हणजे टाटा मोटर्स. आता कंपनी आपल्या एका खास इलेक्ट्रिक कारवर आकर्षक ऑफर देत आहे.
टाटा मोटर्सची इलेक्ट्रिक कार बंपर डिस्काउंटसह खरेदी करण्याची उत्तम संधी ग्राहकांसाठी चालून आली आहे. कंपनी एप्रिल 2025 मध्ये त्यांच्या अनेक इलेक्ट्रिक मॉडेल्सवर बंपर डिस्काउंट देत आहे. त्याच क्रमाने, या काळात कंपनीच्या अद्भुत इलेक्ट्रिक कार Tata Curvv EV वर 70,000 रुपयांपर्यंतची कमाल सूट दिली जात आहे.
आता देशातील नंबर 1 कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांची उडणार झुंबड, कंपनी देतेय ‘एवढी’ भली मोठी सूट !
कॅश डिस्काउंटव्यतिरिक्त, या ऑफरमध्ये एक्सचेंज बोनस देखील समाविष्ट आहे. डिस्काउंटबद्दल अधिक माहितीसाठी ग्राहक त्यांच्या जवळच्या डीलरशिपशी संपर्क साधू शकतात. चला टाटा कर्व्ह ईव्हीचे फीचर्स ड्रायव्हिंग रेंज आणि किंमत याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
टाटा कर्व्ह ईव्हीच्या केबिनमध्ये ग्राहकांना 12.3-इंचाचा टचस्क्रीन, 12.25-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर मिळेल.
डिस्प्ले, 9-स्पीकर JBL साउंड सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि वायरलेस फोन चार्जर सारखी फीचर्स उपलब्ध आहेत. याशिवाय, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, कारमध्ये 6-एअरबॅग्ज, रिअर पार्किंग सेन्सर आणि 360-डिग्री कॅमेरासह इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, फ्रंट पार्किंग सेन्सर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि लेव्हल-2 ADAS सारखी फीचर्स देखील आहेत.
टाटा कर्व्ह ईव्हीमध्ये पॉवरट्रेन म्हणून 2 बॅटरी पॅक वापरले गेले आहेत. 45 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी पॅकसह, ही कार पूर्ण चार्ज केल्यावर 502 किमीची रेंज देण्याचा दावा करते. तर 55 किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅक असलेला व्हेरियंट पूर्ण चार्ज केल्यावर 585 किलोमीटर नॉनस्टॉप धावण्याचा दावा करते . टाटा कर्व्ह ईव्ही ग्राहकांसाठी 5 रंगांच्या ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. भारतीय मार्केटमध्ये, टाटा कर्व्ह ईव्हीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत टॉप मॉडेलसाठी 17.49 लाख रुपयांपासून 21.99 लाख रुपयांपर्यंत आहे. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू देखील शकते.