
झी टीव्हीच्या आयडियाबाज स्टार्टअप रिॲलिटी शोमध्ये Oben Electric ची यशोगाथा सादर
या विशेष भागात ओबेन इलेक्ट्रिकच्या दुचाकींमध्ये वापरल्या जाणाऱ्या LFP बॅटरी तंत्रज्ञानावर भर देण्यात आला असून, हे तंत्रज्ञान सुरक्षित, टिकाऊ आणि शहरी वापरासाठी विश्वासार्ह मानले जाते. बेंगळुरू येथील पूर्णपणे इन-हाउस डिझाइन व उत्पादन व्यवस्थेमुळे कंपनीला तंत्रज्ञानावर संपूर्ण नियंत्रण मिळाले असून, जलद नवकल्पना आणि सातत्यपूर्ण गुणवत्ता राखणे शक्य झाले आहे.
118 किमीची रंपाट स्पीड देणारी ‘ही’ बाईक झाली लाँच, किंमत 2 लाखांपेक्षा कमी
या यशाबाबत बोलताना ओबेन इलेक्ट्रिकच्या संस्थापक व सीईओ मधुमिता अग्रवाल म्हणाल्या, “शाश्वत वाढ ही सखोल संशोधन, तंत्रज्ञानाची मालकी आणि कार्यात्मक शिस्तीवर उभी असते, या विश्वासातून ओबेन इलेक्ट्रिकची स्थापना झाली. आयडियाबाजची पहिली यशोगाथा म्हणून मिळालेली ओळख दीर्घकालीन दृष्टीकोन आणि चिकाटीचे फलित आहे.”
दरम्यान, आयडियाबाजचे सह-संस्थापक जीत वाघ यांनी सांगितले की, आयडियाबाजमध्ये यशोगाथा ठरण्यासाठी केवळ कल्पना नव्हे तर कठीण अंमलबजावणीचे टप्पे पार केलेली कंपनी असणे आवश्यक असते. मजबूत अभियांत्रिकी, इन-हाउस ईव्ही तंत्रज्ञान आणि एंड-टू-एंड मॅन्युफॅक्चरिंगच्या जोरावर ओबेन इलेक्ट्रिकने मागील 18–20 महिन्यांत प्रभावी वाढ साधली आहे.
Yamaha XSR 155 आणि TVS Ronin समोरासमोर! इंजिन, फीचर्स आणि किमतीत कोणती बाईक खाते जास्त भाव?
या ओळखीमुळे गुंतवणूकदारांचा विश्वासही अधोरेखित झाला आहे. भारतीय आणि जागतिक फॅमिली ऑफिसेस यामध्ये संदेश शारदा आणि जीत वाघ यांचा समावेश आहे. ओबेनच्या दृष्टिकोनाला ते सुरुवातीपासून पाठिंबा देत आहेत.
ओबेन इलेक्ट्रिकची इन-हाउस आरअँडडीमधून विकसित Rorr सीरिज शहरी वापरासाठी डिझाइन करण्यात आली आहे. सध्या कंपनीचे 18 राज्यांतील 80+ शहरांत 100हून अधिक शोरूम कार्यरत असून, मार्च 2026 पर्यंत 150 शोरूम आणि सर्व्हिस सेंटर सुरू करण्याचे लक्ष्य आहे. 2020 मध्ये स्थापन झालेल्या ओबेन इलेक्ट्रिकने बेंगळुरू येथील 3.5 एकर सुविधेत संपूर्ण उत्पादन व्यवस्था उभी केली असून, आतापर्यंत 285 कोटी रुपयांची फंडिंग आणि सुमारे 150 कोटी रुपयांचा वार्षिक महसूल साधला आहे.