फोटो सौजन्य: Social Media
देशात सध्या इलेक्ट्रिक कार्सची मागणी जोर धरू लागली आहे. वाढत्या पेट्रोल, डिझेल, आणि सीएनजीला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक कार्सकडे पाहिले जात आहे. अनेक ग्राहक इंधनाच्या वाढत्या किंमतींना कंटाळून इलेक्ट्रिक कार्सच्या खरेदीकडे वळताना दिसत आहे. अनेक कंपनीज सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादकडे विशेष लक्ष देत आहे. याचे कारण म्हणजे येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक वाहनेच ऑटोमोबाईल क्षेत्रावर राज्य करणार आहेत.
देशात अनेक कंपनीज आहे ज्या उत्तमोत्तम कार्स मार्केटमध्ये आणत असतात. यातीलच एक कंपनी म्हणजे ह्युंदाई. ह्युंदाईने देशात अनेक कार्स लाँच एल्यात आहेत, जटिल काही लोकप्रिय सुद्धा ठरल्या आहेत. आता कंपनी आपली इलेक्ट्रिक कार सुद्धा मार्केटमध्ये आणण्यास सज्ज आहे.
हे देखील वाचा: मिनिटात चमकेल कार, फक्त फॉलो करा ‘या’ 5 सोप्या स्टेप्स
Hyundai आपली नवीन इलेक्ट्रिक कार आणणार आहे, जी 3-रो इलेक्ट्रिक SUV असणार आहे. कंपनीने एक टीझरही रिलीज केला आहे. ज्यामध्ये ही 3-रो इलेक्ट्रिक SUV नोव्हेंबरमध्ये लाँच होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक SUV चे नाव Hyundai Ioniq 9 असणार आहे. बरेच दिवस लोकं याची वाट पाहत होते. या कारचे डिझाइन कसे असेल, त्यात कोणते उत्कृष्ट फीचर्स असतील याबद्दल जाणून घेऊया.
Hyundai ची ही पहिली 3-रो इलेक्ट्रिक SUV असणार आहे. याच्या टीझरमध्ये पाहण्यासारखे फार काही नाही आहे, फक्त या कारची साइझ प्रोफाइल समोर आली आहे.
यासोबतच Ioniq 9 च्या पुढील बाजूस पिक्सेल-डिझाइन सिंगल स्ट्रिप LED DRL सिग्नेचर देण्यात आले आहे आणि त्याखाली स्क्वेअर-इश पिक्सेल डिझाइनचे एलईडी हेडलाइट्स देण्यात आले आहेत. त्याचे ए-पिलर्स मागे वळवले जातात आणि शेवटच्या दिशेने सुरळीत प्रवाह देतात.
कारच्या मागील बाजूस कन्सेप्टचे पिक्सेल एलईडी बार डिझाइन आहे, जे प्रोडक्शन मॉडेलमध्ये टी-आकाराच्या स्वाक्षरीने बदलले आहे. शीट मेटलवर तीक्ष्ण क्रीज आणि फ्लेर्ड रीअर हंच, फ्लश डोअर हँडल आणि टर्बाइनच्या आकाराचे अलॉय व्हील देखील पाहायला मिळते.
हे देखील वाचा: दिवाळीत फटाक्यांमुळे कारचे नुकसान झाल्यास ‘असा’ मिळवा इंश्युरन्स क्लेम
Hyundai Ioniq 9 च्या पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर, यात EV9 सारखीच 100 kWh बॅटरी दिली जाऊ शकते. हा ड्युअल मोटर लेआउट 379 बीएचपीची पीक पॉवर आणि 700 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करेल.
या कारची किंमत Kia EV9 च्या आसपास असू शकते. ही इलेक्ट्रिक SUV उत्तर अमेरिका, युरोप, दक्षिण कोरिया आणि अगदी भारतासह अनेक प्रमुख बाजारपेठांमध्ये लाँच होण्याची शक्यता असलेले जागतिक उत्पादन असेल.