फोटो सौजन्य: iStock
दिवाळी भारतात खूप धुमधडाक्यात साजरा केली जाते. या शुभ काळात अनेक जण आपल्या नातेवाईकांना व मित्रमैत्रिणींना भेटत असतात, त्यांच्यासाठी मिठाई आणि भेटवस्तू घेऊन जात असतात. दिवाळीच्या सणात अनेक जण फटाके सुद्धा फोडताना दिसतात.
फक्त दिवाळीच्या सणातच नव्हे तर इतर कुठल्याही वेळी फटाके फोडताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, अन्यथा मोठी दुर्घटना सुद्धा होऊ शकते. अनेक वेळा दिवाळीत फाकटक्यांमुळे कार्सचे मोठे नुकसान पाहायला मिळते. हे नुकसान झाल्यानंतर कारचा इंश्युरन्स क्लेम का करावा हा मोठा प्रश्न कार मालकाच्या मनात येतो. जर तुमची सुद्धा कार फटाक्यांमुळे खराब झाली असेल आणि तुम्ही आता इंश्युरन्स क्लेम कसा मिळवा याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच लिहिली आहे.
हे देखील वाचा: अखेर वेळ आलीच! Maruti ची पहिली वाहिली इलेक्ट्रिक कार करणार ‘या’ देशात ग्लोबल डेब्यू
जर तुमची कार फटाक्यांमुळे खराब झाली असेल, तर ती कॉम्प्रेहेन्सिव्ह किंवा स्टॅन्डअलोन इंश्युरन्स अंतर्गत कव्हर केली जाते. याचे कारण म्हणजे आग किंवा स्फोटामुळे खराब झालेली कार या दोन्ही इंश्युरन्समध्ये समाविष्ट आहे. पण हे तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही तुमच्या कारचा इंश्युरन्स घेतला असेल. त्यानंतरच तुम्ही इंश्युरन्स कंपनीकडे पैसे मागू शकता.
क्लेम करण्यापूर्वी तुम्ही तुमची इंश्युरन्स पॉलिसी काळजीपूर्वक वाचली पाहिजे. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या नुकसानासाठी पैसे मिळतील आणि कोणती कागदपत्रे द्यावी लागतील, हे त्यात लिहिलेले असते.
समजा तुमची कार खराब झाली तर तुम्ही प्रथम काय करावे? तुम्ही तुमच्या कार इन्शुरन्स कंपनीला किंवा तुमच्या इन्शुरन्स एजंटला ताबडतोब सांगावे. असे केल्याने तुम्हाला लवकर मदत होऊ शकते. तुमची समस्या एजंटला सांगितल्याने तो तुमच्यासाठी शक्य तितक्या लवकर सर्व व्यवस्था करेल.
जर तुमची कार खराब झाली तर पोलिसांकडे जा आणि एफआयआर दाखल करा. याद्वारे, विमा कंपनीला तुमच्या कारच्या नुकसानीची योग्य माहिती मिळेल आणि तुम्हाला विम्याचे पैसे लवकर मिळू शकतात.
जेव्हा तुम्ही विमा कंपनीकडे क्लेम करता तेव्हा कंपनी तुमचा क्लेम योग्य आहे की नाही हे तपासते. या तपासणीसाठी कंपनी एक इन्स्पेक्टर पाठवेल जो अपघात कसा झाला आणि तुमचा क्लेम खरा आहे की नाही हे नीट तपासून पाहील. तुमचा क्लेम योग्य असल्यास, विमा एजंट डॉक्युमेंटेशनचे काम सुरू करेल. सर्व कागदपत्रे मिळाल्यानंतर, विमा कंपनी तुम्हाला कार दुरुस्त करण्यासाठी पैसे देईल.
जर तुमच्या कारला आग लागली आणि ती कारच्या बॅटरीमधून स्पार्क झाल्यामुळे किंवा इलेक्ट्रिकल वायरिंगमधील बिघाडामुळे झाली असेल तर तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे, जर तुमच्या कारमधील एसी किंवा सीएनजी गॅस किट बदलताना किंवा सेट करताना एखादी चूक झाली ज्यामुळे आग लागली, तर विमा कंपनी तुमचा क्लेम स्वीकारण्यास नकार देऊ शकते. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, कार जर तुमच्या किंवा मेकॅनिकच्या चुकीमुळे झाली असेल तर विमा कंपनी तुम्हाला नुकसान भरपाई देणार नाही.