New Hyundai Creta 2027 Spy Shots Reveal Bold Design (फोटो सौजन्य-AI एआय)
ह्युंदाई क्रेटाच्या तिसऱ्या जनरेशन मॉडेलची टेस्टिंग सध्या सुरू असून, नवीन Hyundai Creta 2027 मध्ये भारतीय मार्केटमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. नुकत्याच समोर आलेल्या स्पाय शॉट्समधून New Gen Hyundai Creta चे बॉक्सी डिझाइन, नवीन LED लाइटिंग, अलॉय व्हील्स आणि ADAS टेक्नोलॉजीसह अनेक बदल समोर आले आहेत. नवीन मॉडेलमध्ये एक्सटीरियरसोबतच इंटीरियरमध्येही मोठे बदल पाहायला मिळतील.
नवीन क्रेटाच्या टेस्ट म्यूलवर जाड कॅमोफ्लाज असल्यामुळे संपूर्ण डिझाइन स्पष्ट झालेले नाही. पण सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत नवीन SUV अधिक चौकोनी आणि उंच दिसत आहे. यामध्ये फ्लॅटर रूफलाइन, जास्त सरळ रिअर विंडशील्ड आणि रुंद मागील भाग पाहायला मिळतो. पुढील बाजूला मोठी आयताकृती ग्रिल आणि त्यामध्ये ब्लॉकसारखे एलिमेंट्स दिले जाण्याची शक्यता आहे.
लाइटिंग सेटअपमध्ये स्प्लिट हेडलॅम्प डिझाइन कायम राहू शकते. वरच्या बाजूला स्लिम LED DRL आणि खाली मुख्य हेडलॅम्प दिले जातील. फ्रंट बंपरच्या खालच्या भागात रडार सेन्सर दिसत असून, टॉप व्हेरिएंटमध्ये लेव्हल 2 ADAS टेक्नोलॉजी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे ड्रायव्हिंगदरम्यान सुरक्षिततेसाठी वेगवेगळे असिस्ट फीचर्स मिळू शकतात.
साइड प्रोफाइलमध्ये नवीन डिझाइनचे अलॉय व्हील्स आणि ORVM वर 360-डिग्री कॅमेऱ्यासाठी कॅमेरा पॉड्स दिसतात. काही टेस्टिंग मॉडेलमध्ये फ्लश-टाइप डोअर हँडल्सही पाहायला मिळाले आहेत. मागील बाजूला प्रत्येक कोपऱ्यात तीन हॉरिझॉन्टल LED एलिमेंट्स, रुंद रिअर ग्लास आणि रूफ स्पॉयलर दिला जाऊ शकतो.
ह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशनकडून कलाकारांसाठी 60 लाखांचे अनुदान; ‘आर्ट फॉर होप’चा सीझन 6 सुरू
इंटीरियरमध्येही मोठे बदल अपेक्षित आहेत. नवीन मोठी सेंट्रल इन्फोटेन्मेंट स्क्रीन, स्लिम डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नवीन स्टीअरिंग व्हील आणि अपडेटेड कंट्रोल्स मिळू शकतात. याशिवाय मागील प्रवाशांसाठी आर्मरेस्ट आणि कपहोल्डर्स दिले जातील. व्हाइट आणि ग्रे ड्युअल-टोन थीमसह ह्युंदाईचे Pleos Connect सॉफ्टवेअरही मिळण्याची शक्यता आहे.
नवीन क्रेटा ह्युंदाईच्या K3 प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. हाच प्लॅटफॉर्म नवीन किया सेल्टोसमध्येही वापरला जातो. इंजिनमध्ये 1.5-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल, 1.5-लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन कायम राहण्याची शक्यता आहे. याशिवाय 1.5-लिटर स्ट्राँग हायब्रिड इंजिनचा पर्यायही मिळू शकतो. असे झाल्यास मारुती ग्रँड विटारा, टोयोटा हायरायडर आणि टाटा सिएरा यांसारख्या SUV सोबत क्रेटाची स्पर्धा आणखी वाढेल.
Ans: सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या जनरेशनची ह्युंदाई क्रेटा 2027 मध्ये भारतीय मार्केटमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनीने लाँचची तारीख जाहीर केलेली नाही.
Ans: यामध्ये 1.5-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल, 1.5-लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन कायम राहण्याची शक्यता आहे. याशिवाय 1.5-लिटर स्ट्राँग हायब्रिड इंजिनही मिळू शकते.
Ans: नवीन क्रेटामध्ये लेव्हल 2 ADAS, 360-डिग्री कॅमेरा, मोठी इन्फोटेन्मेंट स्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नवीन LED लाइटिंग आणि Pleos Connect सॉफ्टवेअर मिळण्याची शक्यता आहे.






