Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyundai Venue vs Kia Syros: टॉप व्हेरिएंटमध्ये कोणती SUV मारते टॉप! जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि बरंच काही

भारतीय ऑटो बाजारात एसयूव्हीला सर्वाधिक मागणी मिळते. यातही या सेगमेंटमध्ये Hyundai Venue आणि Kia Syros एकमेकांसोबत स्पर्धा करत असतात. मात्र, दोघांपैकी बेस्ट एसयूव्ही कोणती? चला जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 18, 2026 | 10:08 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • एसयूव्ही कारला नेहमीच चांगली मागणी
  • Hyundai Venue आणि Kia Syros या दोन्ही लोकप्रिय एसयूव्ही
  • टॉप व्हेरिएंटमध्ये कोणती एसयूव्ही मारते बाजी?
नव्या जनरेशनची Hyundai Venue आता अधिक प्रगत फीचर्स आणि अपडेटेड डिझाइनसह बाजारात दाखल झाली आहे. विशेष म्हणजे, ही SUV Kia Syros च्या K1 प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली असली, तरीही दोन्ही कार्सचा लुक आणि फील पूर्णपणे वेगळा आहे.

Hyundai Venue चे डिझाइन अधिक मस्क्युलर असून, रस्त्यावर दमदार उपस्थिती निर्माण करते. तर दुसरीकडे Kia Syros चे टॉलबॉय डिझाइन तिला अधिक अर्बन आणि कॉम्पॅक्ट लुक देते, जो शहरातील वापरासाठी अधिक सोयीस्कर मानला जातो.

किंमत आणि इंजिन पर्याय

नव्या Hyundai Venue चा टॉप व्हेरिएंट HX 10 असून तो 1.0 लिटर टर्बो पेट्रोल DCT आणि 1.5 लिटर डिझेल ऑटोमॅटिक इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. दुसरीकडे, Kia Syros चा टॉप मॉडेल HTX+ (O) हाही याच इंजिन आणि ट्रान्समिशन कॉम्बिनेशनमध्ये येतो. किंमतीच्या बाबतीत दोन्ही SUVs ची एक्स-शोरूम किंमत जवळपास समान आहे; मात्र काही अतिरिक्त फीचर्समुळे Syros ही Venue च्या तुलनेत किंचित महाग पडू शकते.

फास्ट चार्जिंग, 212 KM रेंज आणि टॅबलेटसारखा मोठा डिस्प्ले! रोजच्या प्रवासासाठी ‘ही’ Electric Scooter

एक्सटीरियर आणि डायमेंशन्स

डायमेंशन्सच्या बाबतीत Kia Syros ही Venue पेक्षा थोडी आघाडीवर आहे. Syros चा व्हीलबेस 2,550 मिमी असून तो Venue पेक्षा 30 मिमी अधिक आहे. तसेच तिची उंचीही 15 मिमी जास्त असल्याने मागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना अधिक हेडरूम मिळते. Syros मध्ये 17-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत, तर Venue मध्ये 16-इंच अलॉय व्हील्स मिळतात. मात्र Venue चा फ्रंट ग्रिल आणि DRL डिझाइन तिला अधिक स्पोर्टी आणि SUVसारखा लुक देतात.

इंटीरियर आणि फीचर्समधील फरक

दोन्ही SUVs फीचर्सने परिपूर्ण असल्या तरी, या बाबतीत Kia Syros एक पाऊल पुढे आहे. Hyundai Venue मध्ये टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, वायरलेस चार्जिंग, पॉवर्ड ड्रायव्हर सीट आणि प्रीमियम ऑडिओ सिस्टमसारखी फीचर्स मिळतात. तर Kia Syros मध्ये 5-इंच AC कंट्रोल डिस्प्ले, रिअर सीट बेस वेंटिलेशन, एअर प्युरिफायर, स्लायडिंग रिअर सीट्स आणि पॅनोरमिक सनरूफ यांसारखी अधिक प्रगत फीचर्स देण्यात आली आहेत, जी Venue मध्ये उपलब्ध नाहीत.

बाईक प्रेमींनो ही संधी सोडू नका! फक्त 1.13 लाखात मिळतेय Kawasaki ची सर्वात स्वस्त बाईक, मायलेज तर एकदम भारी

सेफ्टी आणि ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजी

सुरक्षेच्या बाबतीत दोन्ही SUVs जवळपास समान पातळीवर आहेत. दोन्ही कार्समध्ये लेव्हल-2 ADAS, 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, पॅडल शिफ्टर्स, विविध ड्राइव्ह मोड्स आणि अ‍ॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. Venue ची मजबूत बिल्ड क्वालिटी आणि Syros चा स्थिर K1 प्लॅटफॉर्म या दोन्ही SUVs सुरक्षित बनवतात.

Web Title: Hyundai venue vs kia syros which top variant suv is best in features price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 10:08 PM

Topics:  

  • automobile
  • hyundai Motors
  • Kia Motors

संबंधित बातम्या

Jawa All Stars 42 Bobber Launched: जावा ऑल स्टार्स ४२ बॉबर मार्केटमध्ये लाँच!  किंमत २.०८ लाख रुपयांपासून सुरु
1

Jawa All Stars 42 Bobber Launched: जावा ऑल स्टार्स ४२ बॉबर मार्केटमध्ये लाँच!  किंमत २.०८ लाख रुपयांपासून सुरु

Maruti Suzuki New Baleno Launched: सुझुकीची नवी बलेनो ६.०९ लाखांमध्ये लाँच; पाहा फीचर्स आणि बरंच काही
2

Maruti Suzuki New Baleno Launched: सुझुकीची नवी बलेनो ६.०९ लाखांमध्ये लाँच; पाहा फीचर्स आणि बरंच काही

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स
3

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!
4

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.