फोटो सौजन्य: @HyundaiIndia (X.com)
भारतात ग्राहकांच्या मागणीनुसार विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर होत असतात. कधी कोणी एसयूव्ही खरेदी करतं तर कोणी हॅचबॅक कार. मात्र,या सर्वात Mid Size Sedan Car ला सुद्धा चांगली डिमांड मिळते. यामुळे अनेक ऑटो कंपन्या या सेगमेंटमध्ये दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर करत असतात. अशीच एक कार म्हणजे Hyundai Verna.
ह्युंदाईने भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये दमदार कार ऑफर केल्या आहेत. अशातच, जर तुम्ही कंपनीच्या मिड साईज सेडान कार म्हणून देण्यात येणाऱ्या ह्युंदाई व्हर्नाचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट करून कार घरी आणू इच्छित असाल, तर तुम्हाला दरमहा किती ईएमआय भरावा लागेल. त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
ह्युंदाई व्हर्नाचा बेस व्हेरिएंट म्हणून EX ऑफर केली जाते. या कारच्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 11.07 लाख रुपये आहे. जर ही कार राजधानी दिल्लीमध्ये खरेदी केली तर आरटीओसाठी सुमारे 1.10 लाख रुपये आणि इंश्युरन्ससाठी सुमारे 53 हजार रुपये द्यावे लागतील. याशिवाय, टीसीएस शुल्क म्हणून 11074 रुपये द्यावे लागतील. त्यानंतर Hyundai Verna on road price सुमारे 12.82 लाख रुपये होते.
जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी केला तर बँक फक्त एक्स-शोरूम किमतीवर फायनान्स करेल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 10.82 लाख रुपये वित्तपुरवठा करावा लागेल. जर बँक तुम्हाला 9 टक्के व्याजदरासह 7 वर्षांसाठी 10.82 लाख रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील 7 वर्षांसाठी दरमहा 17420 रुपये ईएमआय भरावा लागेल.
जर तुम्ही बँकेकडून 10.82 लाख रुपयांचे कार लोन 7 वर्षांसाठी 9 टक्के व्याजदराने घेतले तर तुम्हाला दरमहा 17420 रुपये ईएमआय भरावे लागतील. अशा परिस्थितीत, 7 वर्षांत तुम्हाला Hyundai Verna साठी व्याज म्हणून सुमारे 3.80 लाख रुपये द्यावे लागतील. त्यानंतर तुमच्या कारची एक्स-शोरूम, ऑन रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 16.63 लाख रुपये होईल.
हुंडई व्हर्नाला मध्यम आकाराची सेडान कार म्हणून देते. कंपनीची ही कार बाजारात Skoda Slavia, Honda City,Volkswagen Virtus, शी थेट स्पर्धा करते.