फोटो सौजन्य: iStock
भारतीय ग्राहकांना एसयूव्ही सेगमेंटमध्ये विविध कंपन्यांच्या कार्स आवडत असतात. ह्युंदाई देखील अनेक वर्षांपासून एसयूव्ही सेगमेंटमध्ये चांगल्या कार ऑफर करत आहे. विशेषतः ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू आणि एक्सेटर सारख्या कार विक्रीत अव्वल स्थानावर पोहोचल्या आहेत. आता कंपनी पुन्हा एकदा तीन नवीन एसयूव्ही लाँच करण्याची तयारी करत आहे. यामध्ये एक हायब्रिड क्रेटा, एक फेसलिफ्ट व्हेन्यू आणि एक अपडेटेड टक्सन यांचा समावेश आहे. चला या कार्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
ह्युंदाई व्हेन्यूचे फेसलिफ्ट व्हर्जन नवीन डिझाइन आणि इंटिरिअर अपडेट्ससह येणार आहे. ही कार भारतीय रस्त्यांवर टेस्टिंग दरम्यान अनेक वेळा दिसली आहे. यावरून असा अनुमान लावू शकतो की ही कार लवकरच लाँच होईल.
या कारला एक नवीन एक्सटिरिअर लूक मिळेल ज्यामध्ये अपडेटेड ग्रिल, हेडलॅम्प आणि टेललॅम्प डिझाइन समाविष्ट असू शकते. त्याच्या इंटिरिअरमध्ये देखील बदल दिसून येतील, जसे की नवीन डॅशबोर्ड, अपहोल्स्ट्री आणि टचस्क्रीन डिस्प्ले.
Hyundai, Tata की Maruti? जून 2025 मध्ये कोणती Sub-4 मीटर एसयूव्ही होती नंबर 1?
या कारचे इंजिन पूर्वीसारखेच राहील – 1.2 लीटर पेट्रोल, 1.0 लीटर टर्बो आणि 1.5 लीटर डिझेल. ही फेसलिफ्ट 2025 च्या अखेरीस किंवा 2026 च्या सुरुवातीला लाँच केली जाऊ शकते. ही एसयूव्ही विशेषतः अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांना परवडणारी आणि आधुनिक कॉम्पॅक्ट एसयूव्ही हवी आहे.
Hyundai Creta आता हायब्रिड व्हर्जनमध्ये सादर केली जाणार जी अधिक फ्युएल एफिशियंट आणि पर्यावरणपूरक असेल. या नवीन Creta मध्ये पेट्रोल इंजिनसह इलेक्ट्रिक मोटरचा हायब्रिड सेटअप मिळेल, जो ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक सुलभ करेल आणि चांगले मायलेज देखील देईल.
डिझाइनमध्ये नवीन हेडलॅम्प, बंपर आणि इंटिरिअर अपग्रेड्स दिसून येतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे मॉडेल 2026 पर्यंत भारतीय ऑटो बाजारात लाँच केली जाऊ शकते.
अरेरेरे किती वाईट ! Fortuner सोबत भिडायला गेलेल्या ‘या’ SUV ला एका सुद्धा ग्राहकाने खरेदी केले नाही
आता भारतीय ऑटो बाजारात Hyundai च्या प्रीमियम SUV Tucson चे फेसलिफ्ट व्हर्जन प्रवेश करण्यास सज्ज होत आहे. हे मॉडेल आधीच आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. या कारला नवीन मस्क्युलर डिझाइन, ग्लोबल स्टाइलिंग फ्रंट आणि एलईडी लाईट्स मिळण्याची अपेक्षा आहे. त्याच्या इंटिरिअरमध्ये एक मोठा टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि प्रीमियम मटेरियल वापरला जाईल.
या कारच्या इंजिन पर्यायांमध्ये कोणतेही मोठे बदल होणार नाहीत. या एसयूव्हीचे लाँचिंग 2025 किंवा 2026 पर्यंत होऊ शकते. टक्सन फेसलिफ्ट अशा ग्राहकांसाठी आदर्श असेल जे फीचर्सपूर्ण, प्रीमियम आणि स्टायलिश एसयूव्ही शोधत आहेत.