India’s Top Electric Car Brands 2026 (फोटो सौजन्य-AI एआय)
भारतातील Electric Car Market मध्ये 2026 च्या जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्यांच्या कालावधीत टाटा मोटर्सने आपले पहिले स्थान कायम राखले आहे. विशेष म्हणजे, महिंद्रा इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत मोठी वाढ नोंदवत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. यामुळे JSW एमजी मोटर इंडियाला तिसऱ्या प्लेसवर समाधान मानावे लागले. वाहन पोर्टलच्या 4 नोव्हेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशात या काळात एकूण 2,93,877 इलेक्ट्रिक कारची नोंदणी झाली.
टाटा मोटर्सने 1,16,732 इलेक्ट्रिक कारची नोंदणी करत 39.7 टक्के मार्केट शेअर मिळवला. तर महिंद्राने 67,023 युनिट्सची नोंदणी केली. मागच्या वर्षी याच कालावधीत महिंद्राची विक्री 29,934 युनिट्स होती. म्हणजेच कंपनीने तब्बल 124 टक्के वाढ नोंदवली. बीई 6, एक्सईव्ही 9ई, एक्सईव्ही 9एस आणि एक्सयूव्ही 3एक्सओ ईव्ही या मॉडेल्सचा कंपनीला फायदा झाला. दुसरीकडे, MG मोटरने 55,082 इलेक्ट्रिक कारची नोंदणी केली.
या लिस्टमध्ये व्हिनफास्टने 15,468 युनिट्ससह चौथे स्थान मिळवले. मारुती सुझुकी 12,051 युनिट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. किया 7,029 युनिट्ससह सहाव्या, तर बीवायडी 6,490 युनिट्ससह सातव्या क्रमांकावर आहे. ह्युंदाईने 5,791 युनिट्सची नोंदणी करत आठवे प्लेस मिळवले. BMW 4,132 युनिट्ससह नवव्या आणि मर्सिडीज-बेंझ 1,387 युनिट्ससह दहाव्या क्रमांकावर आहे.
बीवायडीने मागच्या वर्षीच्या 5,555 युनिट्सच्या तुलनेत यंदा 16.8 टक्के वाढ नोंदवली. तर ह्युंदाईच्या नोंदणीत 12.5 टक्क्यांची घट झाली. भारतात बीवायडी अॅटो 3, ईमॅक्स 7, सील आणि सीलायन 7 ही मॉडेल्स विकते. तर ह्युंदाईकडे क्रेटा इलेक्ट्रिक आणि आयोनिक 5 हे ऑप्शन आहेत. मारुती सुझुकीच्या ई विटाराचाही विक्रीत सहभाग आहे.
बॅटरी भाड्याने घ्या आणि कार चालवा! सिट्रॉन e-C3X चा भारतीय बाजारात मास्टरस्ट्रोक!
ऑक्टोबर 2026 मध्ये एकूण 36,911 इलेक्ट्रिक कारची नोंदणी झाली. यात टाटा मोटर्सने 14,654, महिंद्राने 8,541 आणि एमजीने 5,938 युनिट्सची नोंद केली. विशेष म्हणजे, ऑक्टोबरमध्ये कियाने 1,395 युनिट्ससह मारुती सुझुकीला मागे टाकले. तर टाटा आणि महिंद्रा या दोन कंपन्यांचा एकत्रित मार्केट शेअर 62.5 टक्के राहिला. ऑक्टोबरमधील एकूण नोंदणी मागच्या वर्षीच्या याच महिन्यापेक्षा 76 टक्क्यांनी जास्त होती.






