Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक

इंटेलचे CEO लिप-बू टॅन यांनी भारतीय EV कंपनी अल्ट्राव्हायोलेटमध्ये गुंतवणूक करत सल्लागाराची जबाबदारीही स्वीकारली आहे. $85 millionच्या फंडिंगनंतर कंपनी उत्पादन वाढवणार असून 2027 मध्ये अमेरिकन मार्केटमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 26, 2026 | 10:38 AM
भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक
Follow Us
Follow Us:
  • इंटेलचे CEO लिप-बू टॅन यांनी अल्ट्राव्हायोलेटमध्ये गुंतवणूक करत सल्लागार म्हणूनही जबाबदारी स्वीकारली आहे.
  • नव्या $85 million फंडिंगमधून उत्पादन वाढवण्यासोबत Tesseract आणि Shockwaveच्या विकासाला वेग मिळणार आहे.
  • अल्ट्राव्हायोलेट 2027 मध्ये अमेरिकन मार्केटमध्ये प्रवेश करण्यासोबत जागतिक EV प्लॅटफॉर्म विकसित करणार आहे.
भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी अल्ट्राव्हायोलेटने जागतिक विस्ताराच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. कंपनीने तब्बल $85 millionची नवीन गुंतवणूक उभारली असून इंटेलचे CEO लिप-बू टॅन यांनीही या फंडिंग राऊंडमध्ये वैयक्तिक गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे, टॅन आता अल्ट्राव्हायोलेटमध्ये सल्लागार म्हणूनही काम करणार आहेत.

या नव्या भांडवलाचा वापर प्रोडक्शन क्षमता वाढवण्यासाठी, नवीन इलेक्ट्रिक वाहन प्लॅटफॉर्म विकसित करण्यासाठी आणि परदेशातील विस्तारासाठी केला जाणार आहे. अल्ट्राव्हायोलेट सध्या भारतासोबत 20 युरोपीय देशांमध्ये उपस्थित आहे. कंपनीने 2027 मध्ये अमेरिकन मार्केटमध्ये प्रवेश करण्याचे लक्ष्य ठेवले असून, त्यानंतर लॅटिन अमेरिका आणि दक्षिण-पूर्व आशियातील देशांमध्ये विस्ताराचीही तयारी आहे.

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

कंपनीच्या सध्याच्या उत्पादनांमध्ये F77 आणि X-47 या इलेक्ट्रिक मोटरसायकलींचा समावेश आहे. नव्या गुंतवणुकीमुळे या मॉडेल्सचे उत्पादन वाढवण्यासोबतच Tesseract इलेक्ट्रिक स्कूटर आणि Shockwave एंड्युरो मोटरसायकलच्या विकासाला वेग मिळणार आहे. Tesseractच्या लॉन्चचे लक्ष्य 2027च्या सुरुवातीकडे असल्याचे इन्वेस्टरसकडून सांगण्यात आले आहे.

अल्ट्राव्हायोलेटचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कंपनी अनेक टेक्नोलॉजी स्वतः विकसित करते. बॅटरी आर्किटेक्चर, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, वाहन प्लॅटफॉर्म आणि सॉफ्टवेअरवर कंपनीने स्वतःची क्षमता उभी केली आहे. तिची तांत्रिक क्षमता 48V ते 400Vपर्यंतच्या बॅटरी आर्किटेक्चरला सपोर्ट करते. X-47 मध्ये रडारवर आधारित सेफ्टी टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे.

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

प्रोडक्शन वाढवण्यासाठी तामिळनाडूतील होसूर येथे नवीन प्लांट उभारण्याची योजना आहे. कंपनी या प्रकल्पासाठी सुमारे ₹779 कोटी गुंतवणूक करणार असून, पूर्ण विस्तारानंतर वार्षिक उत्पादन क्षमता 5 लाख युनिट्सपर्यंत नेण्याचे नियोजन आहे. या क्षमतेमुळे अल्ट्राव्हायोलेटला प्रीमियम इलेक्ट्रिक मोटरसायकलींसोबत मोठ्या ग्राहकवर्गासाठी उत्पादने तयार करण्यास मदत होऊ शकते.

इंटेलच्या CEOचा सहभाग आणि मोठ्या फंडिंगनंतर अल्ट्राव्हायोलेट आता केवळ भारतीय EV कंपनी न राहता ग्लोबली आपली ओळख निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पुढील टप्प्यात प्रोडक्शन, नवीन मॉडेल्स आणि निर्यात या तिन्ही आघाड्यांवर कंपनीची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे.

Web Title: Intel ceo invests in ultraviolette ahead of us launch auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 10:38 AM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे
1

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
2

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
3

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर
4

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.