
New Generation Toyota Fortuner Global Debut (फोटो सौजन्य-AI एआय)
New Toyota Fortuner, Toyota Fortuner 2027 आणि Next Gen Toyota Fortuner या एसयूव्हीची सध्या ऑटोमोबाईल मार्केटमध्ये चर्चा सुरू आहे. टोयोटा आपली नवीन जनरेशन फॉर्च्युनर 1 डिसेंबर 2026 रोजी जागतिक स्तरावर सादर करणार आहे. टोयोटा दक्षिण आफ्रिकेने या डेब्यूची तारीख जाहीर केली आहे. भारतात ही नवीन एसयूव्ही 2027 मध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. 2016 पासून विक्रीत असलेल्या सध्याच्या जनरेशननंतर जवळपास 10 वर्षांनी फॉर्च्युनरमध्ये पूर्णपणे नवीन बदल पाहायला मिळणार आहेत.
डिझाइन आणि इंजिनमध्ये काय बदल होणार?
नवीन टोयोटा फॉर्च्युनरमध्ये 7-सीटर लेआउट कायम ठेवला जाण्याची शक्यता आहे. पण बाहेरील डिझाइन, केबिन आणि टेक्नोलॉजीमध्ये मोठे बदल केले जाऊ शकतात. सध्याचे 2.8-लिटर टर्बो डिझेल इंजिन नवीन मॉडेलमध्येही कायम राहण्याची शक्यता आहे. यामध्ये 48V माइल्ड हायब्रीड सिस्टीम म्हणजेच निओ ड्राइव्ह टेक्नोलॉजी मिळू शकते. काही आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये 2.7-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनचा पर्यायही कायम राहू शकतो. मॅन्युअल आणि टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळण्याची शक्यता आहे. फोर-व्हील ड्राइव्ह व्हेरिएंटमध्ये लो-रेंज ट्रान्सफर केसही दिला जाऊ शकतो.
नवीन केबिनमध्ये 12.3 इंचांचे डिस्प्ले
नवीन फॉर्च्युनरच्या केबिनमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. टॉप व्हेरिएंटमध्ये 12.3 इंचांचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 12.3 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम दिली जाऊ शकते. यासोबत वायरलेस स्मार्टफोन चार्जिंग, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल फ्रंट सीट्स, सीट व्हेंटिलेशन आणि अपडेटेड कनेक्टेड कार टेक्नोलॉजी मिळण्याची शक्यता आहे.
ADAS टेक्नोलॉजीमुळे वाढणार सेफ्टी
टेस्टिंगदरम्यान नवीन फॉर्च्युनर कॅमफ्लाजमध्ये दिसली आहे. समोरच्या बाजूला मोठी ग्रिल, उंच बोनट आणि नवीन हेडलॅम्प डिझाइन पाहायला मिळू शकते. मागच्या बाजूला नवीन टेलगेट आणि कनेक्टेड एलईडी टेललॅम्प मिळतील. सुरक्षेसाठी टोयोटा सेफ्टी सेन्स अंतर्गत लेव्हल 2 ADAS टेक्नोलॉजी दिली जाण्याची शक्यता आहे. यात अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग आणि लेन कीपिंग असिस्ट यांचा समावेश होऊ शकतो.
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्टमध्ये 5 नवीन बदल! डिजिटल डिस्प्ले आणि डॅशकॅमची चर्चा
भारतात कोणाशी होणार स्पर्धा?
भारतात लाँच झाल्यानंतर नवीन टोयोटा फॉर्च्युनरची स्पर्धा किया सोरेंटो, जीप मेरिडियन, एमजी मेजेस्टर, स्कोडा कोडियाक आणि फोक्सवॅगन टायरोन यांसारख्या एसयूव्हींशी होऊ शकते. सध्याच्या लॅडर फ्रेम प्लॅटफॉर्ममध्ये सुधारणा करून ऑफ-रोड क्षमता कायम ठेवण्यावर कंपनीचा भर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन फॉर्च्युनरमध्ये डिझाइन, सेफ्टी आणि हायब्रीड टेक्नोलॉजीचा किती बदल होतो, याकडे भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
Ans: टोयोटा नवीन फॉर्च्युनरचे जागतिक पदार्पण 1 डिसेंबर 2026 रोजी करणार आहे. टोयोटा दक्षिण आफ्रिकेने या तारखेची माहिती दिली आहे.
Ans: नवीन जनरेशन फॉर्च्युनर भारतात 2027 मध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. पण भारतातील नेमकी लाँच तारीख जाहीर झालेली नाही.
Ans: नवीन मॉडेलमध्ये 2.8-लिटर टर्बो डिझेल इंजिन आणि 48V माइल्ड हायब्रीड सिस्टीम मिळण्याची शक्यता आहे. काही मार्केटमध्ये 2.7-लिटर पेट्रोल इंजिनही दिले जाऊ शकते.