Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टाटा मोटर्सची मोठी झेप! कार विक्रीत 40% वाढ, इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांची पसंती

टाटा मोटर्सने आर्थिक वर्ष 2026-27 च्या दुसऱ्या तिमाहीत 2 लाखांपेक्षा जास्त पॅसेंजर कारची विक्री केली. कंपनीचा महसूल 50.9% वाढून 20,423 कोटी रुपयांवर पोहोचला. इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये कंपनीने 43% वाटा मिळवला असून ऑक्टोबरमध्येही 75,400 कारची विक्री केली.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 15, 2026 | 05:46 PM
Tata Motors Records 40% Sales Growth and Revenue Milestone (फोटो सौजन्य-AI एआय)

Tata Motors Records 40% Sales Growth and Revenue Milestone (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • टाटा मोटर्सने दुसऱ्या तिमाहीत 2 लाखांपेक्षा जास्त पॅसेंजर कारची विक्री करत 40% वाढ नोंदवली.
  • इलेक्ट्रिक कार विक्रीत 90% वाढ झाली असून नोंदणीमध्ये कंपनीचा वाटा 43% पर्यंत पोहोचला आहे.
  • ऑक्टोबर 2026 मध्ये कंपनीने 75,400 कार विकल्या, जो आतापर्यंतचा सर्वोच्च मासिक विक्री आकडा ठरला.

भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये टाटा मोटर्सने पुन्हा एकदा आपली पकड मजबूत केली आहे. आर्थिक वर्ष 2026-27 च्या जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही महसूल नोंदवला आहे. या काळात कंपनीचा महसूल 20,423 कोटी रुपयांवर पोहोचला असून मागच्या वर्षाच्या तुलनेत त्यात 50.9% वाढ झाली आहे. तर पॅसेंजर कारच्या विक्रीतही 40% वाढ नोंदवण्यात आली आहे.

कंपनीने या तिमाहीत 2 लाखांपेक्षा जास्त पॅसेंजर कारची विक्री केली. वाहन नोंदणीच्या Vahan आकडेवारीनुसार, टाटा मोटर्सने भारतीय पॅसेंजर व्हेईकल मार्केटमध्ये 14.3% वाट्यासह दुसरे स्थान कायम ठेवले. विशेष म्हणजे, इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये कंपनीच्या विक्रीत 90% वाढ झाली. इलेक्ट्रिक कार नोंदणीमध्ये कंपनीचा वाटा 43% पर्यंत पोहोचला आहे. मागच्या तिमाहीच्या तुलनेत यात 380 बेसिस पॉइंट्सची वाढ झाली.

भारतात इलेक्ट्रिक कार विक्रीचा नवा विक्रम! 2026 मध्ये 3 लाखांचा टप्पा पार, टाटा मोटर्स आघाडीवर

कंपनीच्या विक्रीमध्ये इलेक्ट्रिक आणि सीएनजी कारचा वाटाही मोठा राहिला. एकूण पॅसेंजर कार विक्रीपैकी 23% कार इलेक्ट्रिक होत्या, तर 28% कार सीएनजीवर चालणाऱ्या होत्या. म्हणजेच पर्यायी फ्युलवर चालणाऱ्या कारचा एकत्रित वाटा 50% पेक्षा जास्त झाला आहे.

पण वाढत्या विक्रीसोबत कंपनीसमोर नफ्याचे प्रमाण टिकवण्याचे आव्हानही आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि परकीय चलनातील चढ-उतारामुळे कंपनीच्या खर्चात वाढ झाली. त्यामुळे EBITDA आणि EBIT मार्जिनमध्ये घट झाली. तरीही कंपनीने सकारात्मक रोख प्रवाह कायम ठेवला असून तिमाहीअखेर चांगली नेट कॅश पोझिशन राखली.

यावर्षीच्या भारतातील टॉप 10 EV Brands!  टाटा पहिल्या क्रमांकावर, महिंद्राची मोठी झेप; MGला टाकले मागे!

प्रोडक्ट पोर्टफोलिओमध्ये टाटा मोटर्सने टाटा एरिस, कर्व्ह सिरीज X, सिएरा लिजेंड सिरीज आणि सिएरा डार्क एडिशन सादर केल्या. ऑक्टोबर 2026 मध्ये कंपनीने 75,400 पॅसेंजर कारची विक्री करत आतापर्यंतचा सर्वोच्च मासिक विक्री आकडा नोंदवला. याशिवाय, कंपनीने आपल्या संपूर्ण इलेक्ट्रिक कार पोर्टफोलिओसाठी बॅटरी-अ‍ॅज-अ-सर्व्हिस (BaaS) प्रोग्रामचा विस्तार केला.

दरम्यान, टाटा मोटर्सने स्टेलँटिससोबत वाहन आर्किटेक्चर आणि ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजीसाठी सामंजस्य करार केला आहे. परदेशात टाटा ऑस्प्रे (नेक्सॉन) दक्षिण आफ्रिकेत दाखल झाली. दुसरीकडे, टाटा मोटर्सच्या JLR विभागाने 5.9 अब्ज पौंड महसूल नोंदवला. रेंज रोव्हर इलेक्ट्रिक, रेंज रोव्हर स्पोर्ट इलेक्ट्रिक आणि जग्वार टाइप 01 ही मॉडेल्स सादर करण्यात आली असून ग्राहकांना त्यांची डिलिव्हरी 2027 च्या सुरुवातीपासून मिळण्याची योजना आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: टाटा मोटर्सने आर्थिक वर्ष 2026-27 च्या दुसऱ्या तिमाहीत किती महसूल मिळवला?

    Ans: टाटा मोटर्सने जुलै ते सप्टेंबर 2026 या कालावधीत 20,423 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला. मागच्या वर्षाच्या तुलनेत यात 50.9% वाढ झाली.

  • Que: टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक कार विक्रीत किती वाढ झाली?

    Ans: दुसऱ्या तिमाहीत टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक पॅसेंजर कारच्या विक्रीत मागच्या वर्षाच्या तुलनेत 90% वाढ झाली. इलेक्ट्रिक कार नोंदणीमध्ये कंपनीचा वाटा 43% होता.

  • Que: ऑक्टोबर 2026 मध्ये टाटा मोटर्सने किती कार विकल्या?

    Ans: ऑक्टोबर 2026 मध्ये कंपनीने 75,400 पॅसेंजर कारची विक्री केली. हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वोच्च मासिक विक्री आकडा आहे.

Web Title: Tata motors q2 fy27 sales revenue electric cars growth auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • automobile
  • Electric Cars
  • tata motors

संबंधित बातम्या

नवीन टोयोटा फॉर्च्युनरचा 1 डिसेंबरला होणार ग्लोबल डेब्यू; 2027 मध्ये भारतात एन्ट्री, ADAS टेक्नोलॉजीसह मिळणार नवा अवतार?
1

नवीन टोयोटा फॉर्च्युनरचा 1 डिसेंबरला होणार ग्लोबल डेब्यू; 2027 मध्ये भारतात एन्ट्री, ADAS टेक्नोलॉजीसह मिळणार नवा अवतार?

नोव्हेंबरमध्ये Hyundai कार्सवर मोठ्या डिस्काउंटचा पाऊस! ग्राहकांना मिळणार 1.2 लाखांपर्यंत सूट
2

नोव्हेंबरमध्ये Hyundai कार्सवर मोठ्या डिस्काउंटचा पाऊस! ग्राहकांना मिळणार 1.2 लाखांपर्यंत सूट

Kia India ची ₹18,000 कोटींची मोठी गुंतवणूक! आंध्र प्रदेशात नवीन प्लांट, प्रोडक्शन कॅपसिटी वाढणार
3

Kia India ची ₹18,000 कोटींची मोठी गुंतवणूक! आंध्र प्रदेशात नवीन प्लांट, प्रोडक्शन कॅपसिटी वाढणार

JSW Motors ची AWS सोबत मोठी पार्टनरशिप! Connected Car Data आता भारतातच सुरक्षित राहणार
4

JSW Motors ची AWS सोबत मोठी पार्टनरशिप! Connected Car Data आता भारतातच सुरक्षित राहणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.