Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका मुलीच्या शिक्षणासाठी जपानने ३ वर्षे सुरू ठेवले होते रेल्वे स्टेशन; नफ्या-तोट्यापेक्षा शिक्षणाचे महत्त्व केले होते अधोरेखित!

नफ्या-तोट्याची गणितं बाजूला ठेवून एका छोट्याशा निर्णयापोटी अख्ख्या ट्रेनचं वेळापत्रक बदलल्याची थक्क करणारी गोष्ट तुम्ही कधी ऐकली आहे का? नेनेमकं असं काय घडलं होतं आणि का घेतला गेला हा अभूतपूर्व निर्णय? चला जाणून घेऊया!

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 13, 2026 | 07:36 PM
एका मुलीच्या शिक्षणासाठी जपानने ३ वर्षे सुरू ठेवले होते रेल्वे स्टेशन; नफ्या-तोट्यापेक्षा शिक्षणाचे महत्त्व केले होते अधोरेखित!
Follow Us
Follow Us:
  • जपानमधील ‘क्यू-शिराताकी’ रेल्वे स्टेशन एका शाळकरी मुलीच्या शिक्षणासाठी ३ वर्षे विशेष स्वरूपात सुरू ठेवण्यात आले होते.
  • मुलीला शाळेत सोयीचे व्हावे म्हणून तिच्या वेळेनुसार दररोज सकाळी ७:१५ आणि संध्याकाळी ५:०८ वाजता ट्रेन थांबायची.
  • मार्च २०१६ मध्ये मुलीचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच रेल्वे प्रशासनाने हे स्टेशन अधिकृतपणे कायमचे बंद केले.

आजच्या युगात जिथे प्रत्येक गोष्ट नफा, तोटा आणि व्यावसायिक गणितांवर तोलली जाते, तिथे एका शाळकरी मुलीच्या शिक्षणासाठी संपूर्ण रेल्वे स्टेशन सुरू ठेवल्याचे ऐकले तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. परंतु, ही कोणतीही कल्पनाविलास नसून जपानमध्ये घडलेली एक सत्य आणि अत्यंत भावूक घटना आहे.

काय आहे ही हृदयस्पर्शी घटना?

जपानमधील उत्तरेकडील ‘होक्काइडो’ या बेटावरील एका अत्यंत दुर्गम भागात ‘क्यू-शिराताकी’ नावाचे एक छोटे रेल्वे स्टेशन होते. या परिसरात लोकसंख्या अत्यंत कमी असल्याने आणि प्रवासी संख्या कमी झाल्यामुळे जपान रेल्वेने हे स्टेशन कायमचे बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

परंतु, जेव्हा रेल्वे अधिकाऱ्यांना समजले की, या स्टेशनचा वापर ‘काना हाराडा’ नावाची एक उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनी रोज शाळेत जाण्या-येण्यासाठी करते, तेव्हा त्यांनी आपला निर्णय बदलला.

Fools Gold: जपानला समुद्रात समुद्राखाली 700 मीटरवर ‘अदृश्य सोने’; ज्वालामुखीच्या खडकांमध्ये अणू पातळीवर दडलेय अफाट सोने

मुलीच्या शालेय वेळेनुसार ठरले रेल्वेचे वेळापत्रक

रेल्वे प्रशासनाने केवळ ते स्टेशन सुरूच ठेवले नाही, तर ट्रेनचे वेळापत्रकही थेट त्या मुलीच्या शाळेच्या वेळेनुसार तयार केले. तिला वेळेवर शाळेत पोहोचता यावे यासाठी दररोज सकाळी ७:१५ वाजता ट्रेन स्टेशनवर यायची. शाळा सुटल्यानंतर तिला घरी परतता यावे यासाठी संध्याकाळी ५:०८ वाजता एक ट्रेन तिथे थांबायची. या स्टेशनवर रोजची एकमेव नियमित प्रवासी ती मुलगीच असायची. जर तिची ही ट्रेन चुकली असती, तर तिला शाळेत पोहोचण्यासाठी इतर कोणताही सोपा पर्याय उपलब्ध नव्हता.

पदवी मिळेपर्यंत सुरू राहिला प्रवास

जपानी रेल्वेने तब्बल तीन वर्षे हे स्टेशन केवळ त्या एका मुलीसाठी सुरू ठेवले. मार्च २०१६ मध्ये जेव्हा कानाचे शालेय शिक्षण पूर्ण झाले आणि तिने पदवी प्राप्त केली, तेव्हाच रेल्वेने अधिकृतपणे या स्टेशनवरून सेवा कायमची बंद केली.

Japan Economy: ना पेट्रोल, ना गॅसचे साठे; चारही बाजूनी समुद्रांनी वेढलेला तरीही कसा बनला जपान इतका समृद्ध देश?

जगभरातून कौतुकाचा वर्षाव

ही गोष्ट जेव्हा सोशल मीडियाद्वारे जगभर पसरली, तेव्हा लोकांनी जपानी प्रशासनाच्या या निर्णयाचे मनापासून कौतुक केले. व्यावसायिक तोटा सहन करून एका नागरिकाच्या- विशेषतः एका विद्यार्थिनीच्या शिक्षणाला प्राधान्य देण्याची जपानची ही संस्कृती मानवतेचे एक उत्कृष्ट उदाहरण ठरली.

Web Title: Japan railway station kept open for single girl student education story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 07:34 PM

Topics:  

  • education
  • Japan
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Kuril Islands: वादग्रस्त कुरिल बेटांवर पुतिन यांचे पाऊल अन् रशिया-जपानमधील 81 वर्षांचा वाद पुन्हा पेटला, वाचा इनसाइड स्टोरी
1

Kuril Islands: वादग्रस्त कुरिल बेटांवर पुतिन यांचे पाऊल अन् रशिया-जपानमधील 81 वर्षांचा वाद पुन्हा पेटला, वाचा इनसाइड स्टोरी

JNVST Admission: अनेक विद्यार्थी नवोदय प्रवेशापासून वंचित; खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी!
2

JNVST Admission: अनेक विद्यार्थी नवोदय प्रवेशापासून वंचित; खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी!

Granthapal Din: ग्रंथांचे महत्त्व कालातीत; श्रीराम वाचनालयात ग्रंथपाल दिन आणि सत्कार सोहळा थाटात संपन्न!
3

Granthapal Din: ग्रंथांचे महत्त्व कालातीत; श्रीराम वाचनालयात ग्रंथपाल दिन आणि सत्कार सोहळा थाटात संपन्न!

हर हर महादेव! श्रावण महिन्यानिमित्त आप्तेष्ट आणि मित्रमैत्रिणींना पाठवा मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा
4

हर हर महादेव! श्रावण महिन्यानिमित्त आप्तेष्ट आणि मित्रमैत्रिणींना पाठवा मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.