Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय बाजारात लाँच होण्यापूर्वी Jetour T2 Plug-In Hybrid SUV ला परदेशात मिळाला मोठा अपडेट! जाणून घ्या माहिती

भारतात लवकरच पदार्पण करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय आलिशान एसयूव्हीच्या डिझाइन आणि तंत्रज्ञानात परदेशात मोठे बदल करण्यात आले आहेत. या नवीन लूक आणि जबरदस्त ड्रायव्हिंग रेंजमुळे आगामी काळात भारतीय प्रीमिअम कार सेगमेंटमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 14, 2026 | 10:20 PM
भारतीय बाजारात लाँच होण्यापूर्वी Jetour T2 Plug-In Hybrid SUV ला परदेशात मिळाला मोठा अपडेट! जाणून घ्या माहिती
Follow Us
Follow Us:
  • भारतात लवकरच येणाऱ्या जेटूर T2 एसयूव्हीच्या परदेशी मॉडेलमध्ये डिझाइन आणि फीचर्सचे मोठे अपडेट्स करण्यात आले आहेत.
  • या एसयूव्हीमध्ये नवीन गोलाकार हेडलॅम्प्स, बॉडी-कलर बंपर आणि आधुनिक एलईडी लाईट स्ट्रिप सारखे आकर्षक बदल मिळतील.
  • दमदार प्लग-इन हायब्रिड इंजिन आणि १६० किमीपर्यंतच्या इलेक्ट्रिक रेंजसह ही कार भारतीय बाजारात आव्हान उभे करेल.

चीनची प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी ‘जेटूर’ आपल्या लोकप्रिय ‘T2’ या SUV चे नवीन आणि अत्याधुनिक मॉडेल चीनी बाजारात लाँच करण्याच्या तयारीत आहे. ‘चेंगडू मोटर शो’मध्ये सार्वजनिकरीत्या प्रदर्शित होणाऱ्या या ५-सीटर गाडीला चीनमध्ये ‘ट्रॅव्हलर ७’ असे नाव देण्यात आले आहे. भारतामध्ये ‘JSW मोटर्स’च्या माध्यमातून ही प्रीमिअम प्लग-इन हायब्रिड SUV भारतीय ऑटोमोबाईल बाजारात प्रवेश करणार असल्याने हा नवीन अपडेट अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

डिझाइन आणि लूक मधील लक्षवेधी बदल

नवीन जेटूर T2 च्या बाह्य डिझाइनमध्ये अनेक मोठे आणि आकर्षक बदल करण्यात आले आहेत. या गाडीत जुन्या चौकटी हेडलाइट्सऐवजी नवीन गोलाकार हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत, जे एका बारीक एलटीडी लाईट स्ट्रिपने जोडलेले आहेत. बोनेटवर ‘Jetour’ नाव नवीन पद्धतीने कोरण्यात आले आहे. याशिवाय, जुना ब्लॅक रंगाचा बंपर हटवून आता बॉडी-कलर बंपर देण्यात आला आहे, ज्यामुळे गाडीचा समोरचा भाग अधिक आकर्षक आणि प्रीमियम दिसतो. गाडीच्या मागील बंपरमध्येही सुटसुटीत आणि आधुनिक बदल करण्यात आले आहेत.

Volkswagen  India: १० लाखांपेक्षा कमी किमतीत येतेय फोक्सवॅगनची नवीन कॉम्पॅक्ट SUV! पाहा काय असतील फीचर्स

दमदार हायब्रिड इंजिन आणि ड्रायव्हिंग रेंज

या नव्या मॉडेलमध्ये चेरी कंपनीची ‘i-DM Dual Mode’ प्लग-इन हायब्रिड सिस्टीम वापरण्यात आली आहे. यामध्ये १.५-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटरचा मिलाफ आहे, जो मिळून ३६० PS पॉवर आणि ६१० Nm टॉर्क जनरेट करतो. आंतरराष्ट्रीय बाजारात याचा ऑल-व्हील ड्राइव्ह प्रकारही उपलब्ध आहे, जो ४६२ PS पॉवर देतो. यामध्ये २७.२ kWh आणि ४३.२४ kWh क्षमतेचे बॅटरी पॅक पर्याय मिळतात, जे अनुक्रमे १०० किमी आणि १६० किमी पर्यंतची पूर्णपणे इलेक्ट्रिक रेंज देतात. याशिवाय १.५-लिटर आणि २.०-लिटरचे निव्वळ पेट्रोल इंजिन पर्यायही उपलब्ध राहतील.

Royal Enfield: नवीन फीचर्ससह लाँच झाली ‘Royal Enfield Continental GT 650′; ३.५८ लाखांपासून किंमत सुरू

भारतीय बाजारातील आगमन

भारतीय ऑटोमोबाईल बाजारात JSW मोटर्स ही कार सीकेडी रुपात आयात करून असेंबल करू शकते. भारतात ही कार प्रामुख्याने तिच्या प्लग-इन हायब्रिड व्हर्जनमध्ये सादर केली जाण्याची दाट शक्यता आहे. भारतीय प्रीमिअम SUV सेगमेंटमध्ये ही कार लाँच झाल्यावर तिच्या लक्झरी डिझाइन आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे इतर मोठ्या कंपन्यांच्या गाड्यांना तगडी स्पर्धा निर्माण होईल.

Web Title: Jetour t2 plug in hybrid suv india launch update auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 10:20 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • SUV

संबंधित बातम्या

Ultraviolette Shockwave चं लाँच पुढे ढकललं; आता Q1 2027 मध्ये येणार ही इलेक्ट्रिक बाइक
1

Ultraviolette Shockwave चं लाँच पुढे ढकललं; आता Q1 2027 मध्ये येणार ही इलेक्ट्रिक बाइक

Suzuki Hayabusa Special Edition लाँच; किंमत ₹19.90 लाख, नव्या टेक्नोलॉजीसह झाली आणखी खास
2

Suzuki Hayabusa Special Edition लाँच; किंमत ₹19.90 लाख, नव्या टेक्नोलॉजीसह झाली आणखी खास

Honda QC3 की Ather Konarc? ₹1.45 लाखांच्या आत कोण देतं जास्त रेंज आणि भन्नाट फीचर्स? कोण आहे वरचढ
3

Honda QC3 की Ather Konarc? ₹1.45 लाखांच्या आत कोण देतं जास्त रेंज आणि भन्नाट फीचर्स? कोण आहे वरचढ

Simple OneS इलेक्ट्रिक स्कूटर भारतात बंद! 190 किमी रेंजसह आलेली स्कूटर आता मार्केटमधून गायब; जाणून घ्या काय आहे कारण
4

Simple OneS इलेक्ट्रिक स्कूटर भारतात बंद! 190 किमी रेंजसह आलेली स्कूटर आता मार्केटमधून गायब; जाणून घ्या काय आहे कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.