जिओ आणणार नवी ई-सायकल (फोटो सौजन्य - Instagram/iStock)
भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ इलेक्ट्रिक वाहन (EV) बाजारात मोठी एन्ट्री करणार आहे. जिओने अलीकडेच इलेक्ट्रिक सायकलचे मॉडेल सादर केले आहे. जे एका चार्जिंगमध्ये ८० ते १०० किलोमीटर अंतर कापण्यास उपयुक्त ठरते. सामान्य लोकांचे आरोग्य आणि पर्यावरण लक्षात घेऊन डिझाइन केलेली ही ई-सायकल लवकरच लाँच केली जाईल असे सांगण्यात आले आहे.
कंपनीच्या मते, ही जिओ सायकल स्पोर्टी आणि स्टायलिश आहे. पुरुषांसोबत महिलाही ही सायकल सहजपणे चालवू शकतील. स्टायलिश एलईडी लाईट्स, डिजिटल डिस्प्ले आणि डायमंड फ्रेम आकर्षक लुक देतात. या ई-सायकलमध्ये लिथियम-लोखंडी बॅटरी बसवण्यात आली आहे. त्यामुळे, ई-सायकल हलकी आणि दीर्घकाळ टिकणारी आहे. ही बॅटरी दीर्घकाळ टिकेल असंही सांगण्यात आले आहे.
काय आहेत खास फिचर्स
7 Seater Car ज्याच्यासमोर टोयोटा इनोव्हादेखील पडते फिकी, किंमत वाचून त्वरीत खरेदीसाठी निघाल
ग्रामीण भागासाठीही उत्तम
जिओची ही ई-सायकल हाय-टेक आणि स्टायलिश आहे. पर्यावरणासोबतच सामान्य लोकांचे आरोग्य आणि बजेट लक्षात घेऊन ते डिझाइन करण्यात आले आहे. शहरातील तरुणांसाठी हे खूप सोयीस्कर असेल असे जिओचे म्हणणे आहे. ग्रामीण भागासाठीही हा एक उत्तम पर्याय असू शकतो असेही यावेळी सांगण्यात आले आहे. यामुळे तरूण मुलांसाठीही ही खास डिझाईन करण्यात आल्याचं समोर आलं आहे. याची आता बाजारात कशी मागणी असणार आहे याकडेही लोकांचे लक्ष लागून राहिले आहे तर या ई-सायकलचा उपयोग कशा पद्धतीने करण्यात येऊ शकतो हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे. तसंच ही ई-सायकल आता बाजारात आल्यानंतर किती बिझनेस जिओला मिळवून देणार याकडेही तज्ज्ञांचे लक्ष लागून राहिले आहे.