Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कारमधील केबलच्या कटकटीपासून सुटका! Jio ने लाँच केले नवीन ‘JioCarSync’ गॅजेट; आता वायरलेस होणार Apple Car Play आणि Android Auto

Jio ने भारतात JioCarSync गॅजेट लाँच केले आहे, ज्यामुळे तुमची साधी कार आता स्मार्ट आणि वायरलेस होईल. जाणून घ्या या उपकरणाची किंमत, फीचर्स आणि वापरण्याची पद्धत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 08, 2026 | 04:30 PM
Jio ने लाँच केले नवीन 'JioCarSync' गॅजेट (Photo Credit- X)

Jio ने लाँच केले नवीन 'JioCarSync' गॅजेट (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • कारमधील केबलच्या कटकटीपासून सुटका!
  • Jio ने लाँच केले नवीन ‘JioCarSync’ गॅजेट
  • आता वायरलेस होणार Apple Car Play आणि Android Auto
मुंबई: कारमध्ये बसल्यानंतर प्रत्येक वेळी स्मार्टफोन केबलने इन्फोटेनमेंट सिस्टमला जोडण्याचा कंटाळा अनेक ड्रायव्हर्सना येतो. युजर्सची हीच अडचण ओळखून रिलायन्स जिओच्या (Jio) ‘JioThings’ या आयओटी (IoT) युनिटने भारतात आपले नवीन इन-कार गॅजेट ‘JioCarSync’ लाँच केले आहे. या छोट्याशा उपकरणामुळे जुन्या वायर असलेल्या Apple CarPlay आणि Android Auto सिस्टमला आता सहजपणे ‘वायरलेस’ करता येणार आहे.

केबलशिवाय 5 सेकंदात कनेक्टिव्हिटी

जिओच्या दाव्यानुसार, JioCarSync हे अत्यंत वेगवान तंत्रज्ञानावर आधारित आहे. कार स्टार्ट केल्यानंतर अवघ्या 5 सेकंदांच्या आत हे गॅजेट आपोआप तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट होते. यामुळे प्रत्येक वेळी मॅन्युअली फोन पेअर करण्याची किंवा केबल शोधण्याची गरज उरणार नाही. जे लोक रोज ड्रायव्हिंग करताना नेव्हिगेशन, कॉलिंग किंवा म्युझिक स्ट्रीमिंगचा वापर करतात, त्यांच्यासाठी हे गॅजेट वरदान ठरणार आहे.

Jio just launched something really useful
for your car.
JioCarSync — just ₹2,399. What it does:
→ Converts your wired CarPlay or
Android Auto into WIRELESS
→ Connects in under 5 seconds
→ Bluetooth 5.3 + 5GHz Wi-Fi
→ Retains steering wheel controls
→ Supports voice… pic.twitter.com/VnFkWQTNXW
— Tech & Deals 🇮🇳 (@ViraanshB) May 7, 2026

EV की पेट्रोल कार? ५०० किमी प्रवासासाठी कोणता पर्याय स्वस्त? पाहा खर्चाचे संपूर्ण गणित

कारच्या सर्व कंट्रोल्सवर मिळणार ताबा

JioCarSync चे वैशिष्ट्य म्हणजे हे गॅजेट केवळ कनेक्टिव्हिटी देत नाही, तर कारच्या मूळ सिस्टमशी पूर्णपणे सुसंगत आहे. युजर्स या उपकरणाच्या माध्यमातून कारमधील स्टीयरिंग कंट्रोल्स, टचस्क्रीन आणि इनबिल्ट माईकचा वापर करू शकतात. याशिवाय Google Maps नेव्हिगेशन, म्युझिक आणि व्हॉइस कमांड्स यांसारख्या सुविधा केबलशिवाय मिळतील. विशेष म्हणजे, यात ‘Siri’ आणि ‘Google Assistant’ या दोन्ही व्हॉइस असिस्टंटचा सपोर्ट देण्यात आला आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि डिझाइन

हे गॅजेट आकाराने लहान असले तरी तांत्रिकदृष्ट्या अतिशय सक्षम आहे. सर्व प्रकारच्या कारमध्ये वापरता यावे यासाठी यात USB Type-A आणि USB Type-C अशा दोन्ही इंटरफेसचा सपोर्ट आहे. कंपनी बॉक्समध्ये अतिरिक्त Type-C डोंगल देखील देत आहे. वेगवान आणि स्थिर कनेक्शनसाठी यात ‘Bluetooth 5.3’ आणि ‘5GHz Wi-Fi’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे गाणी ऐकताना किंवा नेव्हिगेशन वापरताना कोणताही अडथळा जाणवत नाही.

किंमत आणि उपलब्धता

जिओने आपल्या या नाविन्यपूर्ण उत्पादनाची किंमत ग्राहकांच्या खिशाला परवडणारी ठेवली आहे. भारतात JioCarSync ची किंमत 2,399 रुपये निश्चित करण्यात आली आहे. हे गॅजेट सध्या ई-कॉमर्स वेबसाइट ‘Amazon’ वर खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनी या उत्पादनावर १ वर्षाची वॉरंटी देखील देत आहे. हे उपकरण ‘प्लग अँड प्ले’ (Plug and Play) प्रकारातील आहे, म्हणजेच यासाठी कारमध्ये कोणतेही तांत्रिक बदल करण्याची किंवा वायर कापण्याची गरज नाही. फक्त युएसबी पोर्टमध्ये हे गॅजेट लावा आणि तुमच्या कारमध्ये वायरलेस कनेक्टिव्हिटीचा आनंद घ्या.

Range Rover SV च्या किमतीत 75 लाखांपर्यंत कपात! ग्राहकांना मोठा दिलासा

Web Title: Jio launches jiocarsync wireless apple carplay android auto gadget price features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • auto news
  • car care tips
  • jio

संबंधित बातम्या

Top 5 SUV: बजेट फक्त 10 लाख, 5 ढाँसू कार्स; आताच तपशील पाहून घ्या
1

Top 5 SUV: बजेट फक्त 10 लाख, 5 ढाँसू कार्स; आताच तपशील पाहून घ्या

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स
2

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
3

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

JSW GreenTech ची इलेक्ट्रिक कमर्शियल मोबिलिटीमध्ये दमदार एन्ट्री; ‘AMPSTAR’ ब्रँड लाँच
4

JSW GreenTech ची इलेक्ट्रिक कमर्शियल मोबिलिटीमध्ये दमदार एन्ट्री; ‘AMPSTAR’ ब्रँड लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.