
JSW Combat SUV Launch in India: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
भारतात गाड्यांची मार्केट खूप मोठी आहे आणि आता यात एक नवीन मोठा खेळाडू येतोय, JSW ग्रुप. स्टीलमध्ये मोठं नाव असलेला JSW ग्रुप आता थेट कार बनवणार आहे. 4 डिसेंबर 2026 ला कंपनी अधिकृतपणे एंट्री करणार आहे आणि त्यांची पहिली गाडी लोकांसमोर येणार आहे.या नवीन ब्रँडचं नाव असणार आहे JSW Motors आणि पहिल्या गाडीचं नाव आहे ‘कॉम्बॅट’. JSW Combat SUV Launch in India:
ही एक प्रीमियम प्लग-इन हायब्रिड SUV असणार आहे. खरं तर ही गाडी चायनाची Jetour T2 आहे, तिलाच थोडं बदलून भारतात कॉम्बॅट नावाने आणत आहेत. लाँचच्या आधीच तिच्या इंटिरियरचे काही फोटो लीक झाले आहेत, चला बघूया आत काय आहे.
एकदम प्रीमियमलीक झालेल्या फोटोंवरून बघितलं तर आतलं सगळं Jetour T2 सारखंच ठेवलंय. आतमध्ये फोर-स्पोकचं भारी स्टिअरिंग व्हील आहे, मधला लोगो झाकून ठेवला आहे जेणेकरून कोणी बघू नये. पूर्ण कॅबिनमध्ये ड्युअल-टोन कलर वापरला आहे, त्यामुळे एकदम महागडी वाटते.
डॅशबोर्डच्या मधोमध एक मोठी टचस्क्रीन आहे, जवळपास 15.6 इंचाची. म्हणजे टॅबसारखी मोठी स्क्रीन. ड्रायव्हरसाठी 10.25 इंचाचा डिजिटल मीटर आहे. फिचर्सची तर लिस्टच मोठी आहे. पुढच्या दोन्ही सीट्स इलेक्ट्रिक आहेत, त्यात मेमरी फंक्शन पण आहे. सीटला हवा पण लागते, गरमीत कामाचं फिचर आहे. म्युझिकसाठी सोनीचे 12 स्पीकर आहेत. 540 डिग्री कॅमेरा म्हणजे गाडीच्या खालचं पण दिसेल. आणि सेफ्टीसाठी लेव्हल 2 ADAS पण असणार आहे. भारतीय लोकांना काय आवडतं हे बघून कंपनी अजून काही बदल करेल.
कॉम्बॅट बाहेरून बघितली तर एकदम रांगडी आणि दणकट दिसते. चौकोनी बॉक्ससारखी डिझाइन आहे, जी आजकाल खूप चालते. थार, डिफेंडरसारखा लूक आहे. गाडीची बाजू आणि मागचा भाग फोटोत स्पष्ट दिसतोय. उंची चांगली आहे, ऑफ-रोडिंगसाठी बनवली आहे असं वाटतं.वरती रूफ रेल्स आहेत, दाराला साधं हँडल आहे, मोठे आरसे आणि खाली साइड स्टेप्स पण दिल्या आहेत म्हणजे चढायला सोपं जाईल. समोर सपाट बोनट, चौकोनी हेडलाईट आणि सरळ उभी फ्रंट आहे, त्यामुळे गाडी एकदम आक्रमक दिसते.
साईज पण मोठीही SUV 20 इंचाच्या मोठ्या अलॉय व्हीलवर धावते. मागच्या दारावर सुटं चाक लावलंय, त्याला चौकोनी कव्हर आहे. साईज बघायची झाली तर लांबी 4,785 mm, रुंदी 2,006 mm आणि उंची 1,880 mm असू शकते. व्हीलबेस 2,800 mm आणि ग्राउंड क्लिअरन्स 220 mm आहे, म्हणजे कुठेही जाईल. 5 लोक आरामात बसतील आणि मागे 752 लिटरची मोठी बूट स्पेस आहे, सामान कितीही टाका.
सगळ्यांना उत्सुकता आहे इंजिनची. यात Jetour T2 i-DM सारखंच प्लग-इन हायब्रिड इंजिन असणार आहे. म्हणजे पेट्रोल + बॅटरी. चार्ज करून चालवता येईल आणि पेट्रोलवर पण. रेंज पण जबरदस्त असणार आहे असं बोललं जातंय.
JSW ने आधीच MG Motor सोबत हातमिळवणी केली आहे आणि स्कोडा फोक्सवॅगनसोबत पण बोलणी चालू होती. आता स्वतःचा ब्रँड काढत आहेत. सुरुवातीला ही गाडी CBU म्हणून बाहेरून आणतील, म्हणजे तयार गाडी इम्पोर्ट करतील. नंतर हळूहळू भारतातच बनवायला सुरुवात करतील.
4 डिसेंबर 2026 ला लाँच झाल्यावर किंमत कळेल. पण एक गोष्ट नक्की, 40-50 लाखाच्या रेंजमध्ये जर ही आली तर फॉर्च्युनर आणि इतर प्रीमियम SUV ना भारी टक्कर देईल.