
फोटो सौजन्य AI
यामध्ये २.८७ कोटी रुपयांच्या शेअर ट्रेडिंग फसवणूक प्रकरणात मुंबईतील बोरिवली येथून दोघांना अटक करण्यात आली. या टोळीचे धागेदोरे हाँगकाँग आणि दुबईतील सायबर फसवणूक नेटवर्कशी जोडले असल्याचे तपासात समोर आले आहे.
एका व्यक्तीला इन्स्टाग्रामवरील जाहिरात आणि टेलिग्राम समूहाच्या माध्यमातून बनावट ‘एफटीएमओ’ ट्रेडिंग प्लॅटफॉर्मशी जोडण्यात आले, त्यानंतर ३३ वेगवेगळ्या व्यवहारांतून त्याच्याकडून २.८७ कोटी रुपये गुंतवून घेत फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील काकासाहेब मोहन दरुंडे याला पोलिसांनी १५ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. तो विविध खासगी कंपन्यांची चालू कॉर्पोरेट बैंक खाती हाताळून ती सायबर फसवणूक करणाऱ्या मुख्य सूत्रधारांना उपलब्ध करून देत असल्याचे तपासात उघड झाले.
Nagpur News : पाणीटंचाईचे संकट गडद; लवकरच कपात ;तोतलाडोह आणि कन्हानमधील जलसाठा निम्म्यावर
राष्ट्रीय तपास संस्थेचा (एनआयए) अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीला डिजिटल अटकेची भीती दाखवत १ कोटी ४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली. दिनेश अंबाभाई रावरिया (३२, रा. सांताक्रूझ पश्चिम, मुंबई) आणि अरविंद कानजी गाला (४५, रा. ताडदेव रोड, मुंबई) अशी आरोपीची नावे आहेत. शनिवारी पोलिसांनी मुंबईतून दोघांना अटक करून त्यांच्याकडून दोन मोबाइल जप्त केले. न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणातील पीडिताला ८ लाख ५० हजार रुपये परत मिळवून देण्यातही पोलिसांना यश आले आहे.
Nagpur News : बांधकाम सुरु असताना गणेशपेठेत क्रेन कोसळली; दोघांचा मृत्यू
दरुडेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने मुंबईतील बोरिवली परिसरात सहा दिवस ठाण मांडले. एका आरोपीला फूड डिलिव्हरीचे पार्सल आल्याचा बहाणा करून घराबाहेर बोलावण्यात आले. त्यानंतर बोरिवली पोलिसांच्या मदतीने राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील ब्यावर येथील भूपेंद्र महावीर जैन (३२) आणि योगेश पारसमल जैन (३७) यांना अटक करण्यात आली.
न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासात फसवणुकीची रक्कम आरबीएल बँकेच्या एका कॉर्पोरेट खात्यातून अवघ्या २४ सेकंदांत ३९ व्यवहारांद्वारे ३८ बैंक खात्यांत व्वळविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. इंटरनेट बैंकिगसाठी वापरण्यात आलेले मोबाइल क्रमांकाचे सिमकार्ड आणि मोबाइल संचही आरोपीकडून मिळाले, पोलिसांनी आरोपींकडून सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीचे हॉंगकॉंग आणि दुबईतील सायबर फसवणूक नेटवर्कशी संपर्क असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.