छत्रपती संभाजीनगरहून मागवलेल्या एअर पिस्टलच्या पार्सलचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती; उन्हात पडलेले पार्सल, आदळआपट आणि घर्षणामुळे स्फोट झाल्याचा संशय…पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची माहिती…लातूर शहरातील उद्योग भवन परिसरात असलेल्या उमाटे कुरिअर सर्व्हिसमध्ये पार्सलचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. कुरिअरमधील सामानाची चढ-उतार सुरू असतानाच अचानक झालेल्या या स्फोटात एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की कुरिअरच्या वाहनाचे छत आणि काचा निखळून पडल्या. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.
एअर पिस्टलच्या पार्सलचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती…
लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथून लातूरमधील एका बंदूक घरासाठी काही एअर पिस्टल मागवण्यात आल्या होत्या. संबंधित पार्सल दोन दिवस उन्हात पडून होते. त्यानंतर सामानाच्या चढ-उतारादरम्यान झालेली आदळआपट आणि घर्षणामुळे स्फोट झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही….वाहनाचे मोठे नुकसान…जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार…..नेहमीप्रमाणे कुरिअरमधील सामान उतरवण्याचे काम सुरू असताना अचानक मोठा स्फोट झाला. यात पार्सल उतरवणारा कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली…पार्सल कोणी आणि कोणासाठी मागवले? पोलिसांकडून तपास सुरू…
संबंधित पार्सलमध्ये नेमक्या किती एअर पिस्टल होत्या, काडतुसांची संख्या किती होती, हे पार्सल कोणी आणि कोणासाठी मागवले होते, याची सविस्तर माहिती पोलीस घेत आहेत. स्फोटामागील नेमके कारण शोधण्यासाठी सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले…..आमच्याकडे आलेल्या पार्सल बाबत आम्ही कोणतीही माहिती ठेवत नाहीत.. आलेलं पार्सल योग्य पत्त्यावर पोहोचवणे एवढेच आमचं काम आहे. घटना आमच्यासाठी अतिशय धक्कादायक आहे.. एक कर्मचारी गंभीर जखमी एकाला किरकोळ मार लागलाय. अशी माहिती उमाटे कुरिअर सर्विस संचालक उमाकांत उमाटे यांनी दिली आहे. या घटनेबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलीस अधीक्षकांनी केले आहे.