
JSW MG Motor FY26 Financial Results (फोटो सौजन्य-AI एआय)
JSW MG मोटरच्या आर्थिक वर्ष 2026 मधील निकालात एकीकडे उत्पन्नात 40% वाढ झाली, तर दुसरीकडे कंपनीला 930.86 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. JSW MG Motor FY26 Loss कमी झाला असला तरी कंपनीची आर्थिक स्थिती अजूनही दबावाखाली आहे. एमजी विंडसर EV च्या विक्रीमुळे कंपनीच्या उत्पन्नाला मोठी मदत झाली. पण वाढलेला घसारा आणि कर्जावरील खर्च यामुळे नफ्याच्या दिशेने वाटचाल करणे कंपनीसाठी कठीण ठरत आहे.
31 मार्च 2026 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीचे ऑपरेशन्समधून मिळालेले उत्पन्न 12,075.74 कोटी रुपयांवर पोहोचले. FY25 मध्ये हा आकडा 8,648.35 कोटी रुपये होता. म्हणजेच उत्पन्नात जवळपास 40% वाढ झाली. त्याचवेळी कंपनीचा निव्वळ तोटा 1,096.81 कोटी रुपयांवरून कमी होऊन 930.86 कोटी रुपये झाला. FY23 ते FY26 या 4 वर्षांतील कंपनीचा एकत्रित तोटा 3,440.88 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
महिंद्राचा ट्रॅक्टर विक्रीवाढीचा अंदाज घटवला! FY27 मध्ये वाढ जवळपास शून्य; मान्सूनचा फटका
कंपनीच्या आर्थिक स्थितीतील आणखी एक चिंतेची बाब म्हणजे तिची नेटवर्थ आता उणे 907.80 कोटी रुपये झाली आहे. FY25 मध्ये ती 6.20 कोटी रुपये सकारात्मक होती. रोख रक्कम आणि बँक बॅलन्समध्येही 58.4% घट झाली असून ती 372.24 कोटी रुपये राहिली. दुसरीकडे, लीज लायबिलिटी वगळता कंपनीचे कर्ज 3,388.70 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.
एमजी विंडसर EV मुळे कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहन विक्रीत FY26 मध्ये 66% वाढ झाली. वाहन विक्रीतून मिळालेले उत्पन्न 11,014.98 कोटी रुपयांवर गेले. देशातील रिटेल विक्रीही 14.1% वाढून 66,080 वाहनांवर पोहोचली. पण एकूण पॅसेंजर व्हेईकल मार्केटमधील कंपनीचा वाटा 1.40% इतकाच राहिला.
कंपनी आता प्रोडक्शन आणि स्थानिक पातळीवरील सुट्या भागांची खरेदी वाढवण्यावर भर देत आहे. FY27 मध्ये सुमारे 1,400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे. गुजरातमधील हॅलोल प्लांटची वार्षिक कॅपसिटी 1.2 लाखांवरून मार्च 2027 पर्यंत 1.6 लाख वाहनांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. विंडसरमधील स्थानिक भागांचा वाटा जवळपास 50% वरून 70% पर्यंत नेण्याचीही योजना आहे. FY27 मध्ये 4 नवीन मॉडेल्स आणण्याचे नियोजन आहे. त्यामुळे विक्री वाढवण्यासोबत तोटा कमी करून कंपनीला नफ्यात आणण्याचे मोठे आव्हान जेएसडब्ल्यू एमजी मोटरसमोर आहे
Ans: कंपनीला आर्थिक वर्ष 2026 मध्ये 930.86 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला. FY25 मधील 1,096.81 कोटी रुपयांच्या तोट्यापेक्षा हा आकडा कमी आहे.
Ans: FY26 मध्ये कंपनीचे ऑपरेशन्समधून मिळालेले उत्पन्न 40% वाढून 12,075.74 कोटी रुपये झाले. एमजी विंडसर EV च्या विक्रीने या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावली.
Ans: जेएसडब्ल्यू एमजी मोटरने FY27 मध्ये सुमारे 1,400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे नियोजन केले आहे. यात प्रोडक्शन कॅपसिटी वाढवणे आणि स्थानिक पातळीवरील सुट्या भागांची खरेदी वाढवणे यांचा समावेश आहे.