Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिंद्राचा ट्रॅक्टर विक्रीवाढीचा अंदाज घटवला! FY27 मध्ये वाढ जवळपास शून्य; मान्सूनचा फटका

महिंद्राने FY27 साठी ट्रॅक्टर मार्केटच्या वाढीचा अंदाज 5% वरून जवळपास शून्यावर आणला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कमी पाऊस, धरणांमधील घटता पाणीसाठा आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा ट्रॅक्टर विक्रीवर कसा परिणाम होऊ शकतो? जाणून घ्या सविस्तर.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 10, 2026 | 06:49 PM
Mahindra Tractor Sales Forecast Cut Amid Weak Monsoon (फोटो सौजन्य-AI एआय)

Mahindra Tractor Sales Forecast Cut Amid Weak Monsoon (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • महिंद्राने FY27 मधील ट्रॅक्टर मार्केट वाढीचा अंदाज 5% वरून जवळपास शून्यावर आणला.
  • दुसऱ्या तिमाहीत कंपनीची ट्रॅक्टर विक्री 6% घटून सुमारे 1.16 लाख युनिट्सवर आली.
  • SUV व्यवसायासाठी महिंद्रा FY27 अखेर दरमहा 82,000 वाहनांच्या प्रोडक्शनचे उद्दिष्ट ठेवत आहे.

महिंद्रा अँड महिंद्राने आर्थिक वर्ष 2027 साठी देशातील ट्रॅक्टर मार्केटच्या वाढीचा अंदाज 5% वरून जवळपास शून्यावर आणला आहे. कमकुवत मान्सून, धरणांमधील घटलेला पाणीसाठा आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरील दबाव यामुळे Mahindra Tractor Growth FY27 च्या अंदाजात बदल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, देशातील ट्रॅक्टर मार्केटमध्ये महिंद्राचा वाटा जवळपास 43% आहे. त्यामुळे कंपनीच्या या निर्णयाकडे संपूर्ण कृषी वाहन क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी संचालक आणि ऑटो व फार्म सेक्टरचे सीईओ राजेश जेजुरिकर यांनी सांगितले की, पावसाची स्थिती अपेक्षेपेक्षा जास्त बिघडली आहे. धरणांमधील पाणीसाठाही कमी आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही भागांना दुष्काळाचा फटका बसला असून महाराष्ट्र हे ट्रॅक्टर विक्रीसाठी मोठे मार्केट आहे. शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांच्या खर्चात भर पडली आहे.

महिंद्रा XUV 3XO ZNG ला Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग! पाहा सविस्तरपणे

याचा परिणाम कंपनीच्या विक्रीतही दिसून आला. आर्थिक वर्ष 2027 च्या दुसऱ्या तिमाहीत महिंद्राच्या ट्रॅक्टर विक्रीत मागच्या वर्षाच्या तुलनेत 6% घट झाली. या काळात कंपनीने सुमारे 1.16 लाख ट्रॅक्टर विकले. ट्रॅक्टर व्यवसायातील मार्जिन 300 बेसिस पॉइंट्सने कमी होऊन 17.6% राहिले. कंपनीच्या एकत्रित नफ्यात फार्म सेक्टरचा वाटा 32% वरून 23% झाला.

पेरणी आणि कापणीची कामे उशिरा झाल्याने शेतकऱ्यांकडे पैसा येण्यासही विलंब होणार आहे. त्यामुळे ट्रॅक्टर खरेदी पुढे ढकलली जाऊ शकते. रब्बी हंगामातील पेरणीही उशिरा होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे ट्रॅक्टर मार्केट असून मध्य प्रदेशातील मागणी सुधारत आहे. राजस्थानमधील स्थिती तुलनेने स्थिर आहे. अन्नधान्याच्या किमती वाढल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला आधार मिळू शकतो, असेही कंपनीने म्हटले आहे.

महिंद्रा SUV वर दिवाळी ऑफर्सचा धमाका! Scorpio N वर ₹1.50 लाखांपर्यंत डिस्काउंट, Thar आणि XUV 3XO वरही बचत

दुसरीकडे, महिंद्राचा वाहन व्यवसाय SUV मागणीमुळे पूर्ण कॅपसिटीपेक्षाही जास्त पातळीवर सुरू आहे. मार्च 2026 अखेरीस दरमहा 64,500 वाहनांचे प्रोडक्शन होत होते. हे प्रमाण FY27 अखेर 82,000, FY28 अखेर 92,000 आणि FY31 पर्यंत 1,32,000 युनिट्सपर्यंत नेण्याची योजना आहे. 2027 च्या पहिल्या सहामाहीत Nu_IQ प्लॅटफॉर्मवरील मॉडेल, नवीन इलेक्ट्रिक वाहन, लाइफस्टाइल मॉडेल, फेसलिफ्ट आणि हलके व्यावसायिक वाहन अशी 5 मॉडेल्स आणण्याची तयारी आहे. स्टील, रबर, धातू, तेल आणि चलनातील बदलांमुळे खर्च वाढल्याने वाहनांच्या किमतीत सुमारे 5%, तर फार्म उपकरणांच्या किमतीत 4% वाढ करण्यात आली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: महिंद्राने FY27 साठी ट्रॅक्टर मार्केटच्या वाढीचा अंदाज किती केला आहे?

    Ans: महिंद्राने आधीचा 5% वाढीचा अंदाज बदलून FY27 मध्ये ट्रॅक्टर मार्केटची वाढ जवळपास स्थिर राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे.

  • Que: महिंद्राच्या ट्रॅक्टर विक्रीत किती घट झाली?

    Ans: आर्थिक वर्ष 2027 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीची ट्रॅक्टर विक्री मागच्या वर्षाच्या तुलनेत 6% घटून सुमारे 1.16 लाख युनिट्सवर आली.

  • Que: महिंद्रा वाहनांचे प्रोडक्शन वाढवण्याची योजना काय आहे?

    Ans: कंपनीचे दरमहा वाहन प्रोडक्शन मार्च 2026 अखेरीस 64,500 युनिट्स होते. हे FY27 अखेर 82,000, FY28 अखेर 92,000 आणि FY31 पर्यंत 1,32,000 युनिट्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.

Web Title: Mahindra tractor growth fy27 outlook weak monsoon farm income auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 06:49 PM

Topics:  

  • automobile
  • Mahindra

संबंधित बातम्या

Upcoming 7-Seater SUVs India: भारतात येणार 6 नवीन 7-सीटर इलेक्ट्रिक आणि हायब्रिड SUV! टाटा ते ह्युंदाईपर्यंत कोणकोण आहेत फार्मात
1

Upcoming 7-Seater SUVs India: भारतात येणार 6 नवीन 7-सीटर इलेक्ट्रिक आणि हायब्रिड SUV! टाटा ते ह्युंदाईपर्यंत कोणकोण आहेत फार्मात

टाटा पंच CNG AMT ची मायलेज टेस्ट; 1 किलो गॅसमध्ये किती धावली ही SUV? जाणून घ्या
2

टाटा पंच CNG AMT ची मायलेज टेस्ट; 1 किलो गॅसमध्ये किती धावली ही SUV? जाणून घ्या

Luxury Electric Car Sales मध्ये 53.1% वाढ! BMW पहिल्या क्रमांकावर, Tesla ची मोठी झेप
3

Luxury Electric Car Sales मध्ये 53.1% वाढ! BMW पहिल्या क्रमांकावर, Tesla ची मोठी झेप

फोक्सवॅगनची नवीन कॉम्पॅक्ट SUV 2027 मध्ये येणार! स्कोडा कायलॅकच्या प्लॅटफॉर्मवर होणार निर्मिती
4

फोक्सवॅगनची नवीन कॉम्पॅक्ट SUV 2027 मध्ये येणार! स्कोडा कायलॅकच्या प्लॅटफॉर्मवर होणार निर्मिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.