
फोटो सौजन्य: Gemini
आजही रस्त्यावरून एखादी कावासाकीची बाईक जाताना दिसली की अनेक जणांच्या नजर त्यावर रोखल्या जातात. नुकतेच कंपनीने त्यांच्या दोन बाईकवर डिस्काउंट जाहीर केले आहे.
जपानी बाईक उत्पादक कंपनी कावासाकी त्यांच्या काही बाईक्सवर खास ऑफर देत आहे. कंपनी ग्राहकांना कॅशबॅक व्हाउचरच्या स्वरूपात फायदे देत आहे. हे व्हाउचर एक्स-शोरूम किमतीत रिडीम करता येतात. कंपनी ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत देत आहे. नोव्हेंबर 2025 Ninja 500, Ninja 1100SX, Ninja 300 आणि MY25 Versys-X 300 वर डिस्काउंट मिळत आहे. कोणत्या कावासाकी मोटरसायकलवर किती बेनिफिट्स दिले जात आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
कावासाकी आपल्या या बाईकवर तब्बल 20,000 रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स देत आहे. या बाईकमध्ये 451cc लिक्विड-कूल्ड, पॅरेलल-ट्विन इंजिन देण्यात आले असून, ते 45 bhpची पॉवर आणि 42.6 Nmचा टॉर्क निर्माण करते. यात 6-स्पीड गिअरबॉक्स, तसेच असिस्ट आणि स्लिपर क्लच दिला आहे. याशिवाय, ट्रेलिस फ्रेम, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क, डिस्क ब्रेक्ससह ड्युअल-चॅनल ABS, आणि ब्लूटूथ-सपोर्टेड डिजिटल डिस्प्लेही उपलब्ध आहे.
कावासाकीने आपल्या या प्रीमियम बाईकवर 55,000 रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे. यात 1,099cc इनलाइन-फोर, लिक्विड-कूल्ड इंजिन असून, ते 135 bhpची पॉवर आणि 113 Nmचा टॉर्क निर्माण करते. या बाईकमध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स, बाय-डायरेक्शनल क्विकशिफ्टर, तसेच ट्रॅक्शन कंट्रोल, क्रूज कंट्रोल, मल्टिपल राईड मोड्स आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी असलेला TFT कन्सोल मिळतो.
Ninja 300 ही कार 5000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. यात 296 सीसी, लिक्विड-कूल्ड, पॅरलल-ट्विन इंजिन आहे जे 38.9 bhp आणि 26.1 एनएम टॉर्क निर्माण करते. यात सहा-स्पीड गिअरबॉक्स, असिस्ट आणि स्लिपर क्लच, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि युनि-ट्रॅक रिअर मोनोशॉक आहे. यात ड्युअल-चॅनेल एबीएस आणि विश्वासार्ह ट्विन-सिलेंडर परफॉर्मन्स देखील आहे.
Kawasaki आपल्या Versys-X 300 च्या 2025 मॉडेलवर 25000 रुपयांपर्यंतचा फायदा देत आहे. या अॅडव्हेंचर-टूरर बाईकमध्ये 296cc पॅरेलल-ट्विन इंजिन देण्यात आले आहे, जे 38.8 bhpची पॉवर आणि 26 Nmचा टॉर्क निर्माण करते. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही बाईक अत्यंत उपयुक्त मानली जाते.
FASTag युजर्सने लक्ष द्या! NHAI ने KYV प्रोसेस बनवली अगदी सोपी, आता फक्त करावं लागेल ‘हे’ काम
यात हाय-टेंसाईल स्टील बॅकबोन फ्रेम, लाँग-ट्रॅव्हल सस्पेन्शन, 19-इंच फ्रंट व्हील, आणि 17 लिटरची मोठी फ्युएल टॅंक असे फीचर्स देण्यात आले आहेत.