कायनेटिक ग्रीन आणि एक्स्पोनंट एनर्जीमध्ये सहयोग (Photo Credit - X)
या सहयोगांतर्गत कायनेटिक ग्रीनचे लोकप्रिय एल३ मॉडेल्स जसे, सेफर स्मार्ट, सेफर शक्ती आणि सुपर डीएक्स या इलेक्ट्रिक वेईकल्समध्ये आता १५-मिनिट रॅपिड चार्जिंग तंत्रज्ञान आहे, जे लहान ब्रेक्सदरम्यान जलद चार्जिंग देते आणि दैनंदिन ऑपरेटिंग तास जवळपास ३० टक्क्यांनी वाढवते.
एल५ श्रेणीमधील अपवादात्मक पेलोड व रेंजसाठी ओळखली जाणारी हाय-स्पीड परफॉर्मन्स लॉजिस्टिक्स वेईकल एल५एन सेफर जम्बो लोडर १५-मिनिट चार्जिंगच्या माध्यमातून जलद टर्नअराऊंड वेळ देते, ज्यासह व्यक्ती व मालक-ऑपरेटर्स आणि ताफा ऑपरेटर्सना अधिक ट्रिप्स, अधिक कमाई आणि वाढीव परताव्यांची खात्री मिळते. तसेच, जवळपास ५० किमी/तास गतीची क्षमता असलेली आणि आंतरशहरीय लांब अंतरासाठी डिझाइन करण्यात आलेली आगामी एल५एम पॅसेंजर व्हेरिएण्टमध्ये देखील हे प्रगत चार्जिंग तंत्रज्ञान असेल, ज्यासह दैनंदिन वापर वाढेल.
FASTag युजर्सने लक्ष द्या! NHAI ने KYV प्रोसेस बनवली अगदी सोपी, आता फक्त करावं लागेल ‘हे’ काम
अत्याधुनिक बॅटरी तंत्रज्ञान, स्मार्ट चार्जिंग नेटवर्क आणि इंटेलिजण्ट सॉफ्टवेअर असलेला एक्स्पोनण्ट एनर्जीचा मालकीहक्काचा फूल-स्टॅक प्लॅटफॉर्म १५-मिनिट रॅपिड चार्जिंग व मालमत्तेचे आजीवन मूल्य वाढवणा-या उद्योगामधील अग्रणी ३०००-सायकल वॉरंटीसह कायनेटिक ग्रीनला सक्षम करते. हे संयुक्त सोल्यूशन एक्स्पोनण्टच्या वाढत्या चार्जिंग नेटवर्कमध्ये विनासायास चार्जिंगसाठी डिझाइन करण्यात आले आहे, तर एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म प्रत्यक्ष चार्ज ट्रॅकिंगची स्थिती, अंदाजित मेन्टेनन्स अलर्टस् आणि फ्लीट ऑप्टिमायझेशनसाठी डेटा विश्लेषण देतो.
या घोषणेबाबत मत व्यक्त करत कायनेटिक ग्रीनच्या संस्थापिका व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुलज्जा फिरोदिया मोटवानी म्हणाल्या, ”हा सहयोग भारतातील इलेक्ट्रिक तीन-चाकी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण क्षण आहे. भारतातील शहरी लास्ट माइल मोबिलिटीचे आधारस्तंभ ई-रिक्षा व कार्गो कार्टसमध्ये देशातील पहिल्या १५-मिनिट फूल चार्ज सोल्यूशनची भर करत आम्ही मालक ऑपरेटर्स, लहान व मोठ्या फ्लीट ऑपरेटर्सना अनपेक्षित अपटाइम आणि कार्यक्षमता संपादित करण्यास सक्षम करत आहोत. आमच्या ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाने ग्राहकांना सर्वोत्तम मालकीहक्क खर्च देण्याकरिता आमच्या एल३ ई३ डब्ल्यू श्रेणीसाठी या विशेष धोरणात्मक सहयोगाला चालना दिली. हा सहयोग हरित गतीशीलतेचे लोकशाहीकरण करण्याप्रती, शाश्वत परिवहन सर्वांसाठी सहजसाध्य व किफायतशीर करण्याप्रती, तसेच भारतातील ईव्ही पायाभूत सुविधेच्या विकासाला गती देण्याप्रती आमच्या मिशनला चालना देतो.”
एक्स्पोनण्ट एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संस्थापक श्री. अरूण विनायक म्हणाले, ”एक्स्पोनण्ट एनर्जीमध्ये आमचे ईव्हींना सोपे पर्याय करण्याचे, म्हणजेच वास्तविक ऑपरेटर्ससाठी वास्तविक समस्यांचे निराकरण करण्याचे मिशन आहे. हा सहयोग आम्हाला आमचा रॅपिड चार्जिंग प्लॅटफॉर्म भारतातील ई३डब्ल्यूच्या संपूर्ण पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करण्याची सुविधा देतो, ज्यामध्ये एल५ व एल३ श्रेणी आहेत. यासह ऑपरेटर्सना अद्वितीय गती, विश्वसनीयता व सर्वोत्तम सुविधा मिळतात आणि इलेक्ट्रिक परिवहनाच्या भविष्यासाठी ब्लूप्रिंट तयार होते.”
त्वरित कायनेटिक ग्रीन ग्राहकांना पाठिंबा देण्यासाठी एक्स्पोनण्ट एनर्जीचे चार शहरांमधील १६० हून अधिक चार्जिंग स्टेशन्सचे नेटवर्क ई३डब्ल्यू ताफ्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. पुढील १२ महिन्यांमध्ये या पायाभूत सुविधा झपाट्याने प्रमुख मेटो आणि द्वितीय / तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये विस्तारित होतील. एक्स्पोनण्टचे क्लाऊड-आधारित चार्जिंग डॅशबोर्ड देखील कायनेटिक ग्रीनच्या ताफा व्यवस्थापन अॅपमध्ये एकीकृत करण्यात येईल, ज्यासह ऑपरेटर्स शुल्क निर्धारित करण्यास, मार्ग सानुकूल करण्यास आणि सहजपणे वेईकल अपटाइम वाढवण्यास सक्षम होतील.
या सहयोगाचा गतीशील चार्जिंग एकीकृत ई३डब्ल्यू सोल्यूशन्समध्ये कायनेटिक ग्रीनच्या नेतृत्वाला गती देण्याचा मनसुबा आहे, तसेच एल३ श्रेणीमध्ये उच्च विकासावर आणि भारतातील ई३डब्ल्यू क्षेत्रातील अग्रणी कंपनी म्हणून कायनेटिक ग्रीनचे स्थान स्थापित करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.






