Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राडा होणार! पोरं नाय ऐकणार! 5.76 लाखांच्या Kawasaki Ninja 500 समोर Aprilia RS 457 कशी टिकणार?

५.७६ लाखांची कावासाकी निन्जा ५०० आणि अप्रिलिया आरएस ४५७ मधील ही जबरदस्त टक्कर रस्त्यावर नक्कीच राडा करणार आहे! या दोन्ही सुपरबाईक्सपैकी नेमकी कोणती गाडी तुमचा खरा गेम बदलणार? चला पाहूयात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 01, 2026 | 08:21 AM
राडा होणार! पोरं नाय ऐकणार! 5.76 लाखांच्या Kawasaki Ninja 500 समोर Aprilia RS 457 कशी टिकणार?
Follow Us
Follow Us:
  • अप्रिलिया आरएस ४५७ ची किंमत सुमारे ४.२२ लाख रुपये असून तिचे वजन १७५ किलो आहे.
  • कावासाकी निन्जा ५०० ची किंमत ५.७६ लाख रुपये असून यात ४५१ सीसी ट्विन-सिलेंडर इंजिन आहे.
  • अप्रिलियामध्ये ट्रॅक रायडिंगसाठी उत्तम फीचर्स मिळतात तर निन्जा ५०० चा ब्रँड रुबाब वेगळा आहे.

इंडियन ऑटोमोबाईल मार्केटमध्ये सध्या सुपरबाईक्सचा विषय निघाला की एकाच नावाची चर्चा रंगते – Kawasaki Ninja 500! ५.७६ लाख रुपये एक्स-शोरूम किंमतीत लाँच झालेली ही जपानी जादुगिरी किमया रस्त्यावर उतरण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. पण खरी मज्जा तेव्हा येते जेव्हा या बाईकची तुलना मार्केटमधील तिची कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या Aprilia RS 457 सोबत केली जाते. किंमत, पॉवर आणि फीचर्सच्या या वन टू वन महायुद्धात कोण कोणावर भारी पडणार, याचा हा थरारक आणि इंटरेस्टिंग आढावा…

अप्रिलिया आरएस ४५७ ची एक्स-शोरूम किंमत सुमारे ४.२२ लाख रुपयांपासून सुरू होते, जी कावासाकी निन्जा ५०० च्या तुलनेत बरीच economical ठरू शकते. परफॉर्मन्सचा विचार केला तर, अप्रिलियामध्ये ४५७ सीसीचे पॅरलल-ट्विन लिक्विड-कूल्ड इंजिन दिले आहे, जे सुमारे ४७.५ पीएस पॉवर आणि ४३.५ एनएम टॉर्क जनरेट करते. दुसरीकडे, कावासाकी निन्जा ५०० मध्ये ४५१ सीसीचे ट्विन-सिलेंडर इंजिन आहे, जे ४५.४ पीएस पॉवर आणि ४२.६ एनएम टॉर्क प्रदान करते. पॉवरच्या बाबतीत अप्रिलिया किंचित पुढे सरकते.

2027 Kawasaki Ninja 500: भारतीय बाजारात दाखल झाली २०२७ कावासाकी निन्जा ५००! पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

डिझाईन आणि वजनाच्या बाबतीत बोलायचे तर, अप्रिलिया आरएस ४५७ चे वजन १७५ किलो आहे आणि ती अल्युमिनियम पेरिमेटर फ्रेमवर आधारित आहे, जी ट्रॅक रायडिंगसाठी एकदम भारी मानली जाते.

तर कावासाकी निन्जा ५०० चे वजन १७१ किलो असून ती ट्रेलिस फ्रेमवर उभी आहे. निन्जा ५०० मधील रिलॅक्स रायडिंग पोझिशन लांबच्या प्रवासासाठी अतिशय सुखाची ठरते, पण फीचर्सच्या बाबतीत ती थोडी मागे पडते कारण त्यात राईड मोड्स किंवा क्विक-शिफटरसारख्या आधुनिक गोष्टींचा अभाव आहे.

Ather Konarc vs Bajaj Chetak C3501: बजेटमधील किंमत आणि फीचर्समध्येही बेस्ट! कोणती इलेक्ट्रिक स्कूटर ठरेल तुमच्या कुटुंबासाठी टॉप?

थोडक्यात सांगायचे तर, जर बजेट आणि आक्रमक ट्रॅक परफॉर्मन्स हवा असेल, तर अप्रिलिया आरएस ४५७ तुमचे मन जिंकेल. पण कावासाकीचा ब्रँड व्हॅल्यू, तिचा जपानी भरवसा आणि निन्जा ब्रँडची क्रेझ वेगळीच आहे. त्यामुळे पोरं नक्कीच संभ्रमात पडणार की खिशातला खर्च बघून अप्रिलिया निवडायची की रुबाबात कावासाकीच्या स्वारीवर स्वार व्हायचे!

Web Title: Kawasaki ninja 500 vs aprilia rs 457 comparison auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 08:21 AM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

स्प्लेंडरचा जलवा कायम, पल्सर-प्लॅटिनाला जोरदार झटका! सप्टेंबरच्या बाईक मार्केटमध्ये काय घडलं?
1

स्प्लेंडरचा जलवा कायम, पल्सर-प्लॅटिनाला जोरदार झटका! सप्टेंबरच्या बाईक मार्केटमध्ये काय घडलं?

टाटा सिएराच्या प्लॅटफॉर्मवर येणार जीपची नवीन SUV! पण री-बॅजिंग नाही, डिझाइन असणार एकदम वेगळे
2

टाटा सिएराच्या प्लॅटफॉर्मवर येणार जीपची नवीन SUV! पण री-बॅजिंग नाही, डिझाइन असणार एकदम वेगळे

पियाजिओ २०२७ मध्ये भारतात आणणार खास ‘मेड-इन-इंडिया’ इलेक्ट्रिक स्कूटर! जाणून घ्या सविस्तरपणे
3

पियाजिओ २०२७ मध्ये भारतात आणणार खास ‘मेड-इन-इंडिया’ इलेक्ट्रिक स्कूटर! जाणून घ्या सविस्तरपणे

नवरात्रीत वाहन विक्रीचा धुरळा!! अवघ्या 9 दिवसांत भारतात 10.32 लाख वाहनांची विक्री
4

नवरात्रीत वाहन विक्रीचा धुरळा!! अवघ्या 9 दिवसांत भारतात 10.32 लाख वाहनांची विक्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.