(फोटो सौजन्य-AI एआय)
3 व्हेरिएंटमध्ये CNG पर्याय
कॅरेन्स CNG केवळ Premium (O) व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, तर कॅरेन्स क्लॅव्हिस CNG ला HTE आणि HTE (O) असे 2 पर्याय मिळतात. कॅरेन्स CNG ची किंमत ₹12.11 लाख असून, कॅरेन्स क्लॅव्हिस HTE CNG ची किंमत ₹12.38 लाख आणि HTE (O) CNG ची किंमत ₹13.34 लाख आहे. HTE (O) व्हेरिएंट HTE पेक्षा ₹96,000 महाग आहे.
कियाच्या कारवर या सप्टेंबरमध्ये तब्बल ₹1.70 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स
1.5-लिटर इंजिन आणि 60-लिटर CNG टँक
या दोन्ही गाड्यांमध्ये किया चे Smartstream 1.5-लिटर पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे. CNG मोडमध्ये हे इंजिन 96 PS पॉवर आणि 123 Nm टॉर्क तयार करते. CNG टँकची क्षमता 60 लिटर आहे. विशेष म्हणजे, अतिरिक्त CNG सिस्टम बसवूनही कंपनीने स्पेअर व्हील कायम ठेवले आहे. त्यामुळे लांब प्रवास करणाऱ्या कस्टमर्ससाठी ही बाब उपयोगी ठरू शकते.
CNG साठी करण्यात आले बदल
CNG सिस्टमसोबत कंपनीने इंजिन कॅलिब्रेशनमध्येही बदल केले आहेत. तसेच सस्पेंशनमध्ये सुधारणा, 16-इंच व्हील्स आणि मोठे 16-इंच फ्रंट डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत. CNG हार्डवेअर बसवताना 3-रो सीटिंग कायम ठेवण्यासाठी तिसऱ्या रांगेच्या सीट-बॅक फ्रेममध्येही बदल करण्यात आला आहे.
पेट्रोल आणि CNGमध्ये सहज स्विच करता येणार
ड्रायव्हरला पेट्रोल आणि CNG मोडमध्ये बदलण्यासाठी स्वतंत्र फ्युल-चेंज स्विच देण्यात आला आहे. 4.2-इंच कलर TFT MID मध्ये CNG साठी स्वतंत्र Distance to Empty माहिती मिळते. त्यामुळे गाडी CNG वर किती अंतर धावू शकते, याचा अंदाज घेणे सोपे होते. सध्या या CNG मॉडेल्समध्ये Turbo Petrol किंवा Diesel इंजिनचा ऑप्शन उपलब्ध नाही.






