Buldhana Adgaon Raja Water Crisis
मागीलवर्षी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आयोजित आमसभेत ग्रामस्थांनी गावातील पाणीप्रश्न मांडला होता. त्यावेळी प्रशासनाने ८ दिवसात पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तब्बल वर्ष उलटूनही हे आश्वासन पूर्ण झाले नाही. दरम्यान, धरणातून विहिरीपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले. परंतु, वीजजोडणीचे काम रखडल्याने संपूर्ण योजना अडगळीत पडली. पाण्याची व्यवस्था होऊनही केवळ वीजजोडणीअभावी ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यावेळी गटविकास अधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांनी ८ दिवसात पाणीपुरवठा सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात युवा नेते प्रदीप बिल्होरे, रामदास कहाळे, प्रकाश सोनुने, अतिशराजे जाधव, रुस्तुमराव झोरे, श्याम काळे, गैबी राठोड, संजय शेवाळे, संजय कहाळे आदींची उपस्थिती होती.
प्रशासनाच्या या दिरंगाईकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी ३० ऑक्टोबर रोजी निवेदन दिले होते. सोमवार पयत पाणीपुरवठा सुरू न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, तरीही प्रश्न मार्गी न लागल्याने संतप्त ग्रामस्थांनी पंचायत समिती गाठून प्रशासनाला जाब विचारला.
पाणीटंचाईमुळे आडगाव राजा येथील नागरिकांना दैनंदिन गरजांसाठी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जलवाहिनीचे काम पूर्ण होऊनही वीजजोडणीअभावी योजना बंद असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली आहे. आता प्रशासनाने दिलेल्या आठ दिवसांच्या मुदतीत पाणीपुरवठा सुरू न केल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याची शक्यता आहे.
Washim: नाकाबंदीत पोलिसांच्या जाळ्यात चोर अडकला! चोरीची दुचाकी जप्त; आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता
Ans: पिंपरखेड बुद्रुक येथील धरणातून गावातील विहिरीपर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र, वीजजोडणीअभावी पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.
Ans: वर्षभरापासून प्रशासनाकडून आश्वासने मिळत असूनही पाणीपुरवठा सुरू न झाल्याने ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
Ans: गटविकास अधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांनी आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले.






