Kia Carens Clavis चे दोन नवीन मॉडेल्स मार्केटमध्ये लाँच
Kia इंडियाने आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रिक एमपीव्ही कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीच्या श्रेणीचा विस्तार करत दोन नवीन ट्रिम्स HTX ई आणि HTX ई (ER) लाँच केल्या आहेत. या मॉडेल्सची किंमत अंदाजे ₹१९.९९ लाख (एक्स-शोरूम) आणि ₹२१.९९ लाख (एक्स-शोरूम) अशी जाहीर करण्यात आली आहे.
भारतामधील कियाची पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक व्हेईकल असलेल्या कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीला ग्राहकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत असून, या नव्या ट्रिम्सच्या लाँचमुळे कंपनीने आपल्या ईव्ही लाइनअपला अधिक बळकटी दिली आहे. ही वाहने शहरी कुटुंबांसह तरुण व्यावसायिकांमध्ये लोकप्रिय ठरत असून, प्रगत तंत्रज्ञान, लक्झरी इंटिरियर्स आणि विश्वासार्ह परफॉर्मन्स यांचे उत्तम मिश्रण देतात.
HTX ई ट्रिममध्ये ४२ kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे, तर HTX ई (ER) व्हेरिएंटमध्ये ५१.४ kWh बॅटरीचा पर्याय आहे. या गाड्या अनुक्रमे ४०४ किमी आणि ४९० किमी पर्यंतची रेंज देतात. फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानामुळे गाडी फक्त ३९ मिनिटांत १०% ते ८०% पर्यंत चार्ज होते. दोन्ही मॉडेल्समध्ये ९९ kW आणि १२६ kW मोटर पर्याय असून, २५५ Nm टॉर्क निर्माण करते.
नवीन HTX ई ट्रिममध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, तीनही रांगांसाठी LED लॅम्प्स, सर्व खिडक्यांसाठी ऑटो अप/डाऊन सुविधा, वायरलेस चार्जर, दोन-टोन टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टीयरिंग, तसेच सीट-बॅक फोल्डिंग टेबल दिले गेले आहे.
इंटिरिअरमध्ये लेदरेट सीट्स, एअर प्युरिफायर (वायरस प्रोटेक्शनसह), मल्टी-कलर मूड लाइटिंग आणि सोलार ग्लाससारख्या लक्झरी सुविधा देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे प्रवास अधिक आरामदायी आणि प्रीमियम वाटतो.
कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीमध्ये सहा एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), हिल स्टार्ट असिस्ट (HAC) यांसारखी १८ प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. इंटिरिअरमध्ये २६.६२ इंचाचा ड्युअल पॅनोरॅमिक डिस्प्ले आणि ९० कनेक्टेड कार फीचर्समुळे ड्रायव्हिंग अधिक स्मार्ट आणि सहज अनुभव मिळतो.
Diwali 2025 मध्ये ‘हे’ काम करा, 100 टक्के वाहनांना फटाका टच सुद्धा करणार नाही
किया इंडियाकडे सध्या ११,००० हून अधिक चार्जिंग पॉइंट्स असलेला “K-Charge” प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये लाइव्ह चार्जर उपलब्धता आणि रूट प्लॅनिंगची सुविधा आहे. देशभरातील १०० पेक्षा अधिक डिलरशिप्स डीसी फास्ट चार्जर्सने सुसज्ज असून, २५० हून अधिक EV वर्कशॉप्स कार्यरत आहेत.
किया इंडियाचे विक्री व विपणनाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रमुख अतुल सूद म्हणाले, “सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी अधिक पर्याय उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या पहिल्या मेड-इन-इंडिया ईव्हीला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे आम्हाला हे नवीन ट्रिम्स आणण्याची प्रेरणा मिळाली. ही वाहने इलेक्ट्रिक मोबिलिटी अधिक सहजसाध्य, आरामदायी आणि प्रशंसनीय करण्यासाठी डिझाइन केली गेली आहेत.”