Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel – Iran War चे पाकिस्तानला चटके! इंधनाच्या किमती थेट गगनाला भिडल्या, 1 लिटर पेट्रोलची किंमत तब्बल…

इस्रायल आणि इराणमधील तणावाचे चटके आता पाकिस्तानला सुद्धा बसण्यास सुरुवात झाली आहे. पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत साधारण 15 ते 20 टक्क्यांची वाढ झाली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 08, 2026 | 07:54 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • Israel – Iran War चा पाकिस्तानला फटका
  • पाकिस्तानात 1 लिटर डिझेलची किंमत 335.86 रुपये
  • पेट्रोलची किंमत 321.17 रुपये प्रति लिटर
इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा परिणाम अनेक देशातील इंधनाच्या किमतीवर होत आहे. यामुळे साहजिकच तेथील नागरिक हैराण झाले आहेत. या युद्धामुळे पाकिस्तानमध्ये देखील महागाईचा भडका उडाला आहे.

आधीपासूनच पाकिस्तान आर्थिक आणि राजकीय संकटांना सामोरे जात असतानाच इंधनाच्या किमतींमध्ये झालेल्या मोठ्या वाढीमुळे सामान्य नागरिकांची अडचण आणखी वाढली आहे. मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि हाय-स्पीड डिझेलच्या किमतीत एकाच वेळी तब्बल 55 पाकिस्तानी रुपये प्रति लिटरची वाढ केली आहे. ही वाढ इतकी मोठी आहे की देशात एका झटक्यात जवळपास 20 टक्क्यांपर्यंत दर वाढल्याचे पाहायला मिळाले. या निर्णयानंतर पाकिस्तानमध्ये नागरिकांमध्ये नाराजी आणि चिंता वाढताना दिसत आहे.

पहिली नोकरी, पहिली कार! Maruti Celerio की Tata Tiago, कोणती आहे बेस्ट?

नवीन दरांमुळे नागरिक हैराण

नवीन दरांनुसार पाकिस्तानमध्ये हाय-स्पीड डिझेलची किंमत आधी 280.86 पाकिस्तानी रुपये प्रति लिटर होती. ती आता वाढून 335.86 पाकिस्तानी रुपये प्रति लिटर झाली आहे. म्हणजेच एका झटक्यात सुमारे 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर पेट्रोलची किंमत 266.17 पाकिस्तानी रुपये प्रति लिटरवरून थेट 321.17 पाकिस्तानी रुपये प्रति लिटरपर्यंत वाढली आहे. म्हणजेच जवळपास 17 टक्क्यांची वाढ झाली आहे. इतक्या मोठ्या वाढीमुळे सामान्य नागरिकांसाठी वाहन चालवणे अधिक खर्चिक ठरण्याची शक्यता आहे.

Iran–Israel युद्धाचा पाकिस्तानवर परिणाम

पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री Ali Pervaiz Malik यांच्या मते ही समस्या केवळ पाकिस्तानपुरती मर्यादित नाही, तर ती आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे तसेच Iran, United States आणि Israel यांच्यात वाढलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेलपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

BYD ने Tesla ला फोडलाय घाम! फक्त 5 मिनिटाच्या चार्जिंगमध्ये मिळेल 400 किमीची रेंज, जाणून घ्या खास टेक्नॉलॉजी

पाकिस्तान मोठ्या प्रमाणात तेल आयातीसाठी Strait of Hormuz या मार्गावर अवलंबून आहे. सध्याच्या परिस्थितीत या मार्गावर धोका वाढल्यामुळे तेलपुरवठा आणि किमती दोन्हीवर परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सुमारे 50 ते 70 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारला पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवाव्या लागल्या आहेत.

पाकिस्तानमध्ये पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा

मीडिया रिपोर्ट्सनुसार या निर्णयानंतर पाकिस्तानमध्ये नागरिकांमध्ये भीती आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा दिसत आहेत. लोक शक्य तितक्या लवकर पेट्रोल भरून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण पुढील काळात किमती आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

2024–2025 च्या आकडेवारीनुसार पाकिस्तानमध्ये सुमारे 1.7 कोटी दुचाकी वाहने आणि जवळपास 70 लाख कार्स आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा थेट परिणाम कोट्यवधी वाहनधारकांवर होण्याची शक्यता आहे.

Web Title: Israel iran war impact on pakistan fuel petrol diesel price increased by 20 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 07:54 PM

Topics:  

  • automobile
  • Diesel Petrol Price
  • Iran-Israel War

संबंधित बातम्या

Oil Companies Loss: Diesel विक्रीतून कंपन्यांना होतोय 100 रुपयांचा तोटा; Petrol वर किती सोसावा लागतोय घाटा?
1

Oil Companies Loss: Diesel विक्रीतून कंपन्यांना होतोय 100 रुपयांचा तोटा; Petrol वर किती सोसावा लागतोय घाटा?

Car Care Tips: उन्हाच्या तडाख्यामुळे तुमची कार ठरू शकते ‘खर्चाचा बॉम्ब’; ही छोटी चूक पडेल महागात, जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स
2

Car Care Tips: उन्हाच्या तडाख्यामुळे तुमची कार ठरू शकते ‘खर्चाचा बॉम्ब’; ही छोटी चूक पडेल महागात, जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

Hyundai Venue Knight Edition खरंच पैसा वसूल आहे का? जाणून घ्या नवीन फीचर्स
3

Hyundai Venue Knight Edition खरंच पैसा वसूल आहे का? जाणून घ्या नवीन फीचर्स

Renault Duster, Tata Sierra की Kia Seltos, पॉवर आणि सेफ्टीत कोणती कार पुढे? खरेदी करण्याआधी जाणून घ्या ‘ही’ गोष्ट
4

Renault Duster, Tata Sierra की Kia Seltos, पॉवर आणि सेफ्टीत कोणती कार पुढे? खरेदी करण्याआधी जाणून घ्या ‘ही’ गोष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.