फोटो सौजन्य: iStock
दिवाळीचा सण हा प्रत्येकाच्याच घरी आनंद घेऊन येत असतो. या काळात अनेक जण आपल्या नातेवाईकांना व मित्रमैत्रिणींना भेटत असतो, त्यांच्यासाठी मिठाई आणि भेटवस्तू घेऊन जात असतो. या काळात अनेक जण नवीन कार सुद्धा विकत घेताना दिसतात, ज्यामुळे सर्वच ऑटो कंपनीज जास्तीतजास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या कार्सवर दमदार ऑफर्स देत असतात.
दिवाळीत अनेक कंपनीजच्या कार्सची विक्री होते. नुकतेच किया मोटर्सने ऑक्टोबरमधील आपला सेल्स रिपोर्ट जारी केला आहे. या सेल्स रेपोर्टकडे पाहता किया कंपनीची सुद्धा दिवाळी गोड झाली आहे असे बोलण्यास काही हरकत नाही.
Kia ही देशातील सध्याच्या प्रिमियम कार उत्पादक कंपनीजपैकी एक आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये कंपनीने 28,545 कार युनिट्स डिलिव्हरी केल्या आहेत, जे ऑक्टोबर 2023 मध्ये डिलिव्हरी केलेल्या 21,941 युनिट्सच्या तुलनेत 30% ची वार्षिक वाढ आहे. यामुळे खऱ्या अर्थाने किया कंपनीची दिवाळी गोड झाली आहे. एवढ्या कार्सची डिलिव्हरी केल्यानंतर कंपनीत सकारात्मक वातावरण आहे.
वाहन पोर्टलनुसार, 28,545 हून अधिक ग्राहकांनी (तेलंगणा वगळता) कियाच्या कार्सची डिलिव्हरी घेतली आहे. डिलिव्हरीमधील ही वाढ ग्राहकांच्या अनुभवाला प्राधान्य देण्याच्या कियाची वचनबद्धता दर्शवते. ऑक्टोबरमध्ये, 54 ग्राहकांनी अलीकडेच लाँच केलेल्या आलिशान किया कार्निव्हल लिमोझिन प्लससह दिवाळी साजरी केली.
ऑक्टोबर 2024 मध्ये, Kia India ने 22,753 युनिट्स बाहेर पाठवले होते, शिवाय, Kia च्या मेड इन इंडिया उत्पादनांना परदेशातही 2,042 युनिट्सची मागणी होती. हे यश आंतरराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह लँडस्केपमध्ये त्याच्या वाढत्या उपस्थितीला बळकट करून, विविध बाजारपेठांसाठी तयार केलेली उच्च-गुणवत्तेची, नाविन्यपूर्ण कार्स उपलब्ध करून देण्याची कियाची वचनबद्धता दर्शवते.
दरम्यान कंपनीचे सिनियर VP आणि हेड ऑफ सेल्स एंड मार्केटिंग, हरदीप सिंग ब्रार म्हणाले, “किया इंडिया वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी तत्पर वाहन डिलिव्हरीला प्राधान्य देत आहे, तसेच आमच्या डीलर्सशी जवळून काम करून अचूकपणे इन्व्हेंटरी व्यवस्थापित करण्यासाठी भागीदारांसोबत काम करत आहे. स्मार्ट इन्व्हेंटरी कंट्रोलसह त्वरित वितरण एकत्रित करून, आम्ही खात्री करतो की आमच्या ग्राहकांना त्यांच्या आवडत्या वाहनाची वेळेवर डिलिव्हरी मिळेल.