फोटो सौजन्य: iStock
भारतात इलेक्ट्रिक कारला चांगली मागणी मिळत आहे. हीच वाढती मागणी पाहता आता अनेक कार उत्पदक कंपन्या इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर विशेष लक्ष देत आहे. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे ग्राहक देखील इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देत आहे. हल्ली अशा अनेक इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत, ज्या उत्तम रेंजसह हाय परफॉर्मन्स देतात. आता किया मोटर्स देखील इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहे.
‘या’ EV ने टाटाच्या कारचा उठवला बाजार ! मागील चार महिन्यात केली दमदार विक्री
दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी किआ एकापेक्षा जास्त इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीने सोशल मीडियावर पहिला व्हिडिओ टीझर रिलीज केला आहे. ज्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. टीझरमधून कोणत्या कारची माहिती मिळाली आहे? . या कार कधीपर्यंत सादर केल्या जाऊ शकतात? त्याबद्दल जाणून घेऊया.
किआ लवकरच तीन नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर करण्याची तयारी करत आहे. अलीकडेच, कंपनीने सोशल मीडियावर यासंबंधीचा पहिला व्हिडिओ टीझर (Kia EV Teaser) रिलीज केला आहे. ज्यामध्ये तिन्ही एसयूव्हीची माहिती मिळाली आहे.
किया ग्लोबलने सोशल मीडियावर पहिला व्हिडिओ टीझर रिलीज केला आहे. जवळजवळ ३६ सेकंदांच्या व्हिडिओ टीझरमध्ये तिन्ही एसयूव्हीच्या टेल लाईट्स, फ्रंट लूक, साइड प्रोफाइल आणि अलॉय व्हील्सची झलक दिसते. या टीझरमध्ये ईव्हीच्या इंटीरियरबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. परंतु हे प्लॅटफॉर्म बियॉन्ड व्हेईकल (PBV) वर विकसित केले जात आहेत. जे अमेरिकेतील लास वेगास येथे CES २०२४ मध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. यावेळी, कंपनीने त्यांच्या EV2 ची कॉन्सेप्ट देखील प्रदर्शित केली.
New Generation Creta मार्केटमध्ये राडा करणार, कधी होणार लाँच? चला जाणून घेऊया
कंपनीने जागतिक स्तरावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ टीझरमध्ये त्यांची नावे उघड केलेली नाहीत. पण सर्वात लहान एसयूव्ही EV2 च्या नावाने आणली जाऊ शकते, ज्याची कॉन्सेप्ट व्हर्जन आधीच प्रदर्शित केले गेले आहे. यानंतर, EV4 आणि PV5 नावाच्या नवीन इलेक्ट्रिक SUV सादर केल्या जातील.
किआ ग्लोबलने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या व्हिडिओ टीझरमध्ये तिन्ही एसयूव्हीची फक्त एक झलक दाखवण्यात आली आहे. पण कंपनी त्याचे उत्पादन व्हर्जन किआ 2.0 प्रमाणे डिझाइन करेल. त्याच धर्तीवर, कंपनीने प्रथम Kia EV9 लाँच केली होती. यानंतर, किआ सायरोस देखील त्याच डिझाइनसह लाँच करण्यात आली आहे.
याच्या लाँचिंगची माहिती कियाने टीझरमध्येच दिली आहे. व्हिडिओनुसार, या तीन इलेक्ट्रिक एसयूव्ही 27 फेब्रुवारी 2025 रोजी जागतिक स्तरावर लाँच केल्या जातील. भारतीय वेळेनुसार, या एसयूव्ही 27 फेब्रुवारी रोजी लाँच केल्या जाऊ शकतात. सध्या या एसयूव्ही भारतीय बाजारात आणण्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.