फोटो सौजन्य: @MotorOctane (X.com)
भारतात जेव्हा ग्राहक कार खरेदी करत असतो, तेव्हा तो फक्त कारचे फीचर्स आणि किंमतच बघत नाही तर त्याच्या कुटुंबाला ही कार सूट होईल का? हे देखील तपासात असतो. त्यातही जर तुमची जॉईंट फॅमिली असेल तर 7 सीटर कार खरेदी करणेच योग्य.
मार्केटमध्ये अनेक उत्तम 7 सीटर कार्स आहेत. जसे की Ertiga आणि Innova. पण जर तुम्ही एर्टिगा किंवा इनोव्हा कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर थोडा वेळ थांबा. कारण किया मोटर्स येत्या मे 2025 मध्ये त्यांची नवीन 7 सीटर कार लाँच करणार आहे.
गेल्या काही वर्षांत किया मोटर्सच्या 7-सीटर एमपीव्ही कॅरेन्सला खूप मोठे यश मिळाले. मारुती एर्टिगा नंतर ही तिच्या सेगमेंटमध्ये दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे. कंपनी गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या फेसलिफ्ट मॉडेलची टेस्टिंग करत आहे. आता नवीन माहितीनुसार, या कारचे फेसलिफ्ट मॉडेल मे महिन्यात लाँच केले जाऊ शकते. कंपनी 8 किंवा 9 मे रोजी 2025 कॅरेन्स लाँच करेल अशीही अपेक्षा आहे. कियाच्या या एमपीव्हीमध्ये नवीन फीचर्ससह अपडेटेड डिझाइन तसेच रिफ्रेश केलेले इंटिरिअर मिळणार आहे.
Mahindra च्या 2 इलेक्ट्रिक एसयूव्हीवर तुटून पडले लोकं, 6 महिन्यांवर पोहोचला वेटिंग पिरियड
अपडेटेड Kia Carens आणि Carens EV मध्ये ट्रायंग्युलर LED हेडलाइट्स असतील, जे आगामी Kia EV6 प्रमाणेच असतील. यात कनेक्टेड एलईडी डीआरएल, नवीन डिझाइन केलेले फ्रंट आणि रियर बंपर आणि पूर्ण-रुंदीचे टेललाइट्स मिळण्याची अपेक्षा आहे. फेसलिफ्ट केलेल्या कॅरेन्सला नवीन अलॉय व्हील्स मिळू शकतात, तर त्याच्या इलेक्ट्रिक कारमध्ये एरोडायनामिकली डिझाइन केलेले अलॉय व्हील्स मिळतील. तसेच, इलेक्ट्रिक कारला ICE कॅरेन्सच्या तुलनेत बंद ग्रिल मिळेल.
हिट नाही तर सुपरहिट आहे ‘ही’ कार, परफॉर्मन्सच्या बाबतीत भल्याभल्यांना सोडेल मागे
किआ कॅरेन्सच्या फेसलिफ्ट केलेल्या इंटिरिअरला आधुनिक डॅशबोर्ड आणि वेगवेगळ्या रंगांच्या सीट अपहोल्स्ट्रीसह नवीन लूक मिळण्याची अपेक्षा आहे. इलेक्ट्रिक व्हर्जन्समध्ये सस्टेनेबल मटेरियल्सचा वापर असेल आणि केबिनची थीम वेगळी असेल. दोन्ही कारच्या डॅशबोर्डवर मोठा 12.3-इंचाचा ड्युअल-स्क्रीन सेटअप, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जर आणि पॅनोरॅमिक सनरूफ सारखी फीचर्स उपलब्ध असतील.
त्याच वेळी, प्रवाशांच्या सुरक्षेबद्दल बोलायचे झाले तर, या कारमध्ये 6 एअरबॅग्ज, ESC, 360-डिग्री कॅमेरा आणि फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर लेव्हल-2 ADAS सारखी फीचर्स आहेत.