Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kia Seltos चे 2 नवीन मॉडेल्स लवकरच लाँच होण्याची शक्यता; जाणून घ्या अपेक्षित किंमत

किया सेल्टॉसला भारतीय मार्केटमध्ये चॅंन्गली मागणी मिळते आहे. हीच मागणी लक्षात घेत आता कंपनी या कारचे दोन नवीन मॉडेल्स लवकरच लाँच करण्याची अपेक्षा आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 01, 2026 | 07:23 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • किआच्या अनेक कार भारतात लोकप्रिय
  • Kia Seltos ला विशेष मागणी
  • लवकरच नवीन मॉडेल येण्याची शक्यता
Kia Seltos चे दोन नवीन टॉप व्हेरिएंट्स लाँच होण्याच्या तयारीत आहे, ज्यांना GTX(O) आणि X-Line(O) अशी नावे दिली जाऊ शकतात. या व्हेरिएंट्सची माहिती Bharat NCAP क्रॅश टेस्टशी संबंधित कागदपत्रांतून समोर आली आहे. मात्र, कंपनीच्या अधिकृत यादीत अजून या मॉडेल्सचा समावेश करण्यात आलेला नाही.

योग्य वेळी घेतलेला निर्णय

Kia चा हा निर्णय Seltos साठी योग्य वेळेत घेतलेला मानला जात आहे. एका वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार, २०२६ हे वर्ष या SUV साठी खास ठरले असून आतापर्यंत ६ लाखांहून अधिक गाड्यांची विक्री झाली आहे. तसेच, या कारला ५-स्टार सेफ्टी रेटिंगही मिळाली आहे. त्यामुळे नवीन व्हेरिएंट्सच्या मदतीने Seltos अधिक लोकप्रिय करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

Tata Motors ची ऐतिहासिक कामगिरी, ‘इतक्या’ लाख वाहनांच्या विक्रीसह आर्थिक वर्ष 26 मध्ये नवा विक्रम!

नवीन व्हेरिएंट्सचा डिझाइन

सध्याच्या टॉप मॉडेल्सप्रमाणे GTX(O) आणि X-Line(O) व्हेरिएंट्सही प्रीमियम आणि आकर्षक डिझाइनसह येण्याची शक्यता आहे. GT-Line व्हर्जनमध्ये दमदार बंपर, अलॉय व्हील्स आणि हिरव्या रंगाचे ब्रेक कॅलिपर्स मिळू शकतात. तर X-Line व्हेरिएंटमध्ये खास मॅट पेंट आणि काळ्या रंगातील डिझाइन एलिमेंट्स कायम राहण्याची अपेक्षा आहे.

संभाव्य फीचर्स

या नवीन व्हेरिएंट्समध्ये फीचर्सकडे विशेष लक्ष दिले जाऊ शकते. Kia पुन्हा एकदा हेड-अप डिस्प्ले फीचर देऊ शकते, जे जुन्या Seltos मध्ये होते पण नवीन मॉडेलमध्ये नव्हते. याशिवाय डॅशकॅम, एअर प्युरिफायर आणि मेमरी फंक्शनसारखे फीचर्सही देण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हे मॉडेल्स अधिक प्रीमियम ठरू शकतात.

सेफ्टी आणि टेक्नोलॉजी

NDTV च्या माहितीनुसार, या मॉडेल्समध्ये सुरक्षिततेवर विशेष भर दिला जाईल. ६ एअरबॅग्स, ESC, चारही चाकांवर डिस्क ब्रेक आणि ३६०-डिग्री कॅमेरासारखे फीचर्स कायम ठेवले जातील. यासोबतच लेव्हल-२ ADAS तंत्रज्ञानही देण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हे मॉडेल्स अधिक सुरक्षित आणि प्रगत बनतील.

Maruti Dzire vs Honda Amaze: कोणती Sedan Car कमी पैश्यात देते सुसाट मायलेज? जाणून घ्या

इंजिन आणि संभाव्य किंमत

या दोन्ही नवीन व्हेरिएंट्समध्ये दोन इंजिन पर्याय मिळू शकतात. एक १.५-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन ७-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह आणि दुसरे १.५-लिटर डिझेल इंजिन ६-स्पीड गिअरबॉक्ससह येऊ शकते. Kia हे GTX(O) आणि X-Line(O) व्हेरिएंट्स मे किंवा जून २०२६ दरम्यान लॉन्च करू शकते, ज्यांची किंमत अंदाजे १९ ते २२ लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

Web Title: Kia seltos two new models may launch know expected price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 07:23 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Kia Seltos

संबंधित बातम्या

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!
1

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!
2

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!
3

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स
4

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.