फोटो सौजन्य: istock
आजच्या काळात, ADAS (Advanced Driver Assistance System) ने सुसज्ज असलेल्या कारने सुरक्षिततेच्या बाबतीत एक नवीन बदल घडवून आणला आहे. म्हणूनच आता ग्राहक केवळ फीचर्सनाच नाही तर त्यांच्या सेफ्टीलाही प्राधान्य देतात, विशेषतः जेव्हा कार कुटुंबासाठी खरेदी केली जाते. म्हणूनच आज आपण भारतातील 5 सर्वात परवडणाऱ्या ADAS फीचरने सुसज्ज असणाऱ्या कारबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांची किंमत 12 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. या कार्स केवळ उत्तम मायलेज देत नाहीत तर सुरक्षिततेच्या बाबतीतही चांगल्या आहेत.
ADAS सेफ्टी सिस्टम हे एक आधुनिक तंत्रज्ञान आहे, जे ड्रायव्हिंगला अधिक सुरक्षित बनवते. यामध्ये ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन डिपार्चर वॉर्निंग, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन यांसारखी अनेक स्मार्ट फीचर्स समाविष्ट आहेत. जे अपघात टाळण्यासाठी आणि ड्रायव्हरला नेहमी सतर्क ठेवण्यासाठी कार ऑटोमॅटिकपणे नियंत्रित करण्यास मदत करतात.
दमदार इंजिन, पण महागडी किंमत ! भारतात लवकरच लाँच होणार होंडाची ‘ही’ सुपर-डुपर बाईक
ADAS तंत्रज्ञान ड्रायव्हरला नेहमीच सतर्क ठेवते, अपघातांचा धोका कमी करते, ऑटोमॅटिक ब्रेकिंग सिस्टमद्वारे सुरक्षितता वाढवते आणि लेन बदलताना ड्रायव्हरला सावध करते. एखादे वाहन जवळ येताच किंवा लेन बदलण्याची परिस्थिती निर्माण होताच, ADAS सिस्टम चालकाला इशारा देते आणि गरज पडल्यास वाहनाला आपोआप ब्रेक लावून सुरक्षितता सुनिश्चित करते. चला ADAS फिचर असणाऱ्या काही बेस्ट कारबद्दल जाणून घेऊयात.
होंडा अमेझ ही भारतातील सर्वात परवडणारी ADAS सेडान आहे, ज्याची किंमत 9.70 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. ही कार 20 किमी प्रति लिटर पर्यंत मायलेज देते आणि पेट्रोल इंजिनसह येते. त्याच्या ZX व्हेरियंटमध्ये लेन कीप असिस्ट, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग आणि अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल सारखी फीचर्स आहेत, ज्यामुळे ती कुटुंबासाठी विशेषतः उत्तम पर्याय बनते.
ह्युंदाई व्हेन्यू ही भारतातील सर्वात परवडणारी ADAS SUV आहे, ज्याची किंमत 10.33 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. त्यामध्ये फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग आणि लेन डिपार्चर वॉर्निंग सारखे फीचर्स उपलब्ध आहेत. पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असलेली ही कार तिच्या सेफ्टी आणि विश्वासार्हतेसाठी लोकप्रिय आहे.
7 व्हेरियंटमध्ये लाँच झाली 2025 Kia Carens Clavis, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
किआ सोनेट ही एक प्रीमियम एसयूव्ही आहे जी 10 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. ही कार ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सारख्या ADAS फीचर्ससह येते. यातील सनरूफ, डिजिटल डिस्प्ले, बोस साउंड सिस्टम आणि व्हेंटिलेटेड सीट्स यासारख्या फीचर्समुळे ही कार तरुण ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे.
महिंद्रा XUV 3XO ही एक दमदार SUV आहे, ज्याची किंमत 10.25 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि ती 22 किमी प्रति लिटर पर्यंत मायलेज देते. यात लेव्हल-2 ADAS टेक्नॉलजी, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि ऑटोमॅटिक पार्किंग सारखी प्रगत फीचर्स आहेत. याशिवाय, पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल डिस्प्ले आणि ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल देखील त्यात उपलब्ध आहेत.
होंडा सिटी ही एक क्लासिक आणि प्रीमियम सेडान आहे, ज्याच्या ADAS व्हेरियंटची किंमत 12.37 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. यात लेन कीप असिस्ट आणि कोलिजन मिटिगेशन ब्रेकिंग सिस्टम सारखे लेव्हल-2 ADAS फीचर्स आहेत. पेट्रोल आणि हायब्रिड इंजिनसह येणारी ही कार सनरूफ, कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सारख्या फीचर्सनी सुसज्ज आहे.