7 व्हेरियंटमध्ये लाँच झाली 2025 Kia Carens Clavis, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
किया इंडियाने आपली नवीन ‘बिग, बोल्ड फॅमिली कार’ किया कॅरेन्स क्लॅव्हिस भारतात ₹11.49 लाखांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केली आहे. ही एमपीव्ही आणि एसयूव्हीचा अनुभव एकत्र करणारी प्रीमियम गाडी आहे, जी विशेषतः भारतीय कुटुंबांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. तिचे आकर्षक एक्स्टिरीअर, प्रशस्त इंटिरीअर, प्रगत वैशिष्ट्ये आणि उच्च दर्जाची सुरक्षितता ही कॅरेन्स क्लॅव्हिसची खास वैशिष्ट्ये आहेत.
कियाच्या ‘Opposites United’ डिझाइन तत्त्वज्ञानानुसार तयार केलेल्या या कारमध्ये डिजिटल टायगर नोज फ्रंट, आइस क्यूब एलईडी हेडलॅम्प्स, आणि स्टारमॅप एलईडी कनेक्टेड टेललॅम्प्सचा समावेश आहे. 17-इंच क्रिस्टल-कट ड्युअल टोन अलॉय व्हील्स, सॅटिन क्रोम स्किड प्लेट्स आणि आयव्हरी सिल्व्हर ग्लॉस सारखा बॉडी कलर गाडीला खास प्रीमियम लुक देतात.
कहरच ! 15 लाखांच्या किमतीत फक्त 2 लोकांसाठीच बनवली गेली ‘ही’ इलेक्ट्रिक कार
कॅरेन्स क्लॅव्हिसचा इंटीरिअर देखील तितकाच आकर्षक आणि विचारपूर्वक डिझाइन केलेला आहे. यात 6 व 7-सीटर पर्याय, स्लायडिंग आणि वन-टच टंबल फंक्शन असलेल्या सीट्स, 64-कलर अॅम्बियंट लाइटिंग, ड्युअल पॅनोरॅमिक सनरूफ, 26.62-इंचाचा ड्युअल डिस्प्ले पॅनेल, 8-स्पीकर बोस साउंड सिस्टम, एअर प्युरिफायर आणि स्मार्ट रूफ-माउंटेड एअर वेंट्स यांचा समावेश आहे.
किया कॅरेन्स क्लॅव्हिस 1.5-लीटर स्मार्टस्ट्रीम जी1.5, जी1.5 टर्बो-GDi पेट्रोल आणि 1.5-लीटर CRDi VGT डिझेल इंजिन अशा तीन पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात मॅन्युअल व ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय दिले आहेत, जे ग्राहकांच्या विविध गरजांना पूरक आहेत.
ही कार HTE, HTE (O), HTK, HTK+, HTK+ (O), HTX आणि HTX+ अशा सात व्हेरियंटमध्ये आणि आयव्हरी सिल्व्हर ग्लॉस, ग्लेशियर व्हाइट पर्ल, अरोरा ब्लॅक, स्पार्कलिंग सिल्व्हर, इम्पेरियल ब्लू यासह आठ रंगांमध्ये उपलब्ध आहे.
याला म्हणतात अफलातून कार ! पेट्रोल संपलं तरी 80 Km पर्यंत धावणार, किंमत…
किया कॅरेन्स क्लॅव्हिस Level 2 ADAS तंत्रज्ञानासह येते, ज्यात स्मार्ट क्रूझ कंट्रोल, फ्रंट कोलिजन अव्हॉइडन्स, लेन कीपिंग असिस्ट, ब्लाइंड स्पॉट वॉर्निंग, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट यांसारखी 20 अॅक्टिव्ह सेफ्टी फिचर्स आहेत. शिवाय, 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, रिअर पार्किंग सेन्सर्स, हिल-स्टार्ट व डाउनहिल ब्रेक कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग यांसारखी 18 प्रगत सेफ्टी फीचर्स दिली आहेत.
कंपनीने ‘My Convenience’, ‘My Convenience Secure’ आणि ‘My Convenience Plus’ असे सर्व्हिस पॅकेजेस सादर केले आहेत, जे वेअर अँड टिअर कव्हरेज, मेंटेनन्स, एक्स्टेंडेड वॉरंटी आणि रोडसाइड असिस्टन्ससारख्या सर्व्हिस देतात.