फोटो सौजन्य: iStock
कुठल्याही देशाची सुरक्षितता त्याच्याकडे असणाऱ्या सैन्यबळावरून ठरत असते. भारताकडे देखील उत्तम सैन्य दल आहे, ज्यांना वेळोवेळी देशाचे संरक्षण करून शत्रू राष्ट्राला पाणी पाजले आहे. तसेच, भारतीय सैन्य हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे सैन्य आहे.
भारतीय सैन्य जगभर त्याच्या ताकद आणि तंत्रज्ञानासाठी ओळखले जाते. आधुनिक शस्त्रांसोबतच, सैन्याकडे अशी काही दमदार कार्स आहेत जे ते आपल्या संरक्षणासाठी वापरत असतात. या कार्स सामान्य लोक देखील वापरू शकतात. विशेषतः या कार्स सैन्याच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आल्या आहेत, जे कठीण परिस्थितीतही उत्कृष्ट परफॉर्मन्स देतात. चला अशा 5 कार्सबद्दल जाणून घेऊयात, ज्या भारतीय सैन्यासाठी वापरली जातात. तसेच या कार्स सामान्य लोक देखील खरेदी करू शकतात.
ही एसयूव्ही भारतीय सैन्याच्या ताफ्यातील एक महत्त्वाचा भाग बनली आहे. लष्कराने 2023 मध्ये ही एसयूव्ही आपल्या ताफ्यात समाविष्ट केली होती. भारतीय सैन्याच्या गरजांनुसार ही कार डिझाइन करण्यात आली आहे, ज्यामध्ये 4×4 ड्राइव्ह, ऑलिव्ह ग्रीन रंग आणि ब्लॅकआउट लाईट्स सारख्या फीचर्सचा समावेश आहे.
टाटा सफारी स्टॉर्म GS800 ही कार खासकरून भारतीय सैन्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, जी 800 किलो पर्यंतचे पेलोड वाहून नेण्यास सक्षम आहे. त्यात 4×4 ड्राइव्ह आणि एअर कंडिशनिंग सारखे फीचर्स आहेत. या कारची मजबूत बांधणी आणि आरामदायी राइड या कारला एक उत्तम ऑप्शन बनवते.
हा एक पॉवरफुल पिकअप ट्रक आहे, जो 2023 मध्ये भारतीय लष्कराच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आला होता. 13,000 फूट उंचीवर आणि -15 डिग्री सेल्सिअस तापमानात टेस्टिंग केल्यानंतर त्याचा ताफ्यात समावेश करण्यात आला.
2018 मध्ये भारतीय सैन्यात याचा समावेश करण्यात आला होता. या एसयूव्हीला लाइट स्ट्राइक व्हेईकल म्हणून निवडण्यात आले होते. या एसयूव्हीमध्ये 4×4 ड्राइव्ह, स्नॉर्केल आणि डिफरेंशियल लॉक सारखे फीचर्स आहेत. गस्त आणि ऑपरेशनसाठी सैन्य या एसयूव्हीचा वापर करते.
तुमची पावसाळी रायडींग मोहीम बनवा आणखीन सुरक्षित! ‘या’ टिप्स करा फॉलो
ही कार नुकतेच भारतीय सैन्यात समाविष्ट करण्यात आले आहे. ही इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस (ITBP) द्वारे वापरले जाते. तसेच या कारचा अधिकृतपणे केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात (CAPF) समाविष्ट करण्यात आले आहे.