फोटो सौजन्य: komaki.in
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढताना होत आहे. यावरून समजते की देशात इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांचा किती चांगला पाठिंबा मिळत आहे. आता तर टेस्ला सुद्धा मार्केटमध्ये आली आहे. मार्केटमध्ये इलेक्ट्रिक बाईक, कार आणि स्कूटर देखील ऑफर होत आहे.
भारतात खासकरून इलेक्ट्रिक बाईकला जास्त मागणी मिळत आहे. हीच मागणी लक्षात घेत अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या मार्केटमध्ये उत्तम रेंज आणि परफॉर्मन्स देणाऱ्या बाईक ऑफर करत आहे.
अशातच आता Komak Electric ने भारतात त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक क्रूझर बाइक्स रेंजर प्रो आणि रेंजर प्रो+ लाँच केल्या आहेत. रेंजर प्रोची किंमत 1.29 लाख रुपये आहे आणि रेंजर प्रो+ ची किंमत 1.39 लाख रुपये आहे, ज्यामध्ये 12,500 रुपयांच्या ॲक्सेसरीज देखील समाविष्ट आहेत. क्रूझर लूकसह प्रोफेशनल इलेक्ट्रिक बाईक हवी असलेल्या ग्राहकांना लक्षात घेऊन या बाईक्स सादर करण्यात आल्या आहेत. खरं तर, हे लाँचिंग कंपनीच्या ईव्ही सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्याच्या धोरणाचा एक भाग आहे.
Tesla Model Y भारतात लाँच झाल्याने ‘या’ ऑटो कंपन्यांचे टेन्शन वाढणार?
दोन्ही बाईकमध्ये 4.2 kW ची Lipo4 बॅटरी आहे. Ranger Pro एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 160 ते 220 किमी धावू शकते, तर Ranger Pro+ मध्ये 180 ते 240 किमीची रेंज आहे.
दोन्ही व्हेरिएंटमध्ये 5 किलोवॅटची हाय-टॉर्क मोटर आहे, जी फक्त 5 सेकंदात 0 पासून टॉप स्पीड गाठू शकते. शहरी रस्ते आणि महामार्ग दोन्हीसाठी ही बाईक चांगली आहे.
या नवीन कोमाकी बाईक्समध्ये टेलिस्कोपिक सस्पेंशन, ड्युअल डिस्क ब्रेक आणि बॅकरेस्टसह आरामदायी सीट्स आहेत. तसेच, मागील टेल लॅम्प गार्ड सारखे सेफ्टी फीचर्स देखील आहेत.
राइड सोपी आणि स्मार्ट करण्यासाठी, बाईकमध्ये फुल-कलर डिजिटल डॅशबोर्ड, क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स असिस्ट आणि ब्लूटूथ साउंड सिस्टम देखील आहे.
या बाईकची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांची 50-लिटर स्टोरेज स्पेस, जी दैनंदिन वापरात खूप उपयुक्त आहे. याशिवाय, त्यामध्ये मोबाइल चार्जिंग युनिट, पार्क असिस्ट, ऑटो रिपेअर स्विच, टर्बो मोड आणि रिअर प्रोटेक्शन गार्ड सारखे फीचर्स देखील प्रदान करण्यात आले आहेत.
कोमाकी इलेक्ट्रिक व्हेईकल्सच्या सह-संस्थापक गुंजन मल्होत्रा म्हणाल्या की कंपनीचे लक्ष नेहमीच पर्यावरणपूरक आणि टिकाऊ मोबिलिटी सोल्युशन्स प्रदान करण्यावर राहिला आहे. त्यांनी सांगितले की रेंजर प्रो आणि प्रो + विशेषतः लांब पल्ला, प्रगत तंत्रज्ञान आणि आरामदायी प्रवासासाठी डिझाइन करण्यात आले आहेत.