फोटो सौजन्य: iStock
गेल्या काही महिन्यांपासून, Tesla भारतात एंट्री मारणार असे बोलले जात होते. यामुळे कारप्रेमींच्या नजरा सुद्धा टेस्लाच्या कारकडे लागल्या होत्या. एवढेच काय तर मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर सुद्धा टेस्लाचे कार टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली होती. यानंतर अखेर टेस्लाने 15 जुलै 2025 रोजी भारतातील त्यांची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच केली.
मुंबईतील BKC शोरूममध्ये टेस्लाची मॉडेल वाय भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. या कारच्या लाँचिंगच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. चला या कारच्या वैशिष्ट्यांद्दल जाणून घेऊयात.
Tesla Model Y मध्ये कंपनीने अनेक उत्तम फीचर्स दिले आहे. यात 15.4 इंच टचस्क्रीन, उत्तम सीट्स, अँबियंट लाइट्स, रियर व्हील ड्राइव्ह, नऊ स्पीकर्स, एईबी, ब्लाइंड स्पॉट कोलिजन वॉर्निंग, टिंटेड ग्लास रूफ असे अनेक उत्तम फीचर्स आहेत. यासोबतच, त्यात दोन बॅटरी पर्याय देण्यात आले आहेत, जे 500 ते 622 किलोमीटरची रेंज देतात. ही कार 59.89 लाख ते 67.89 लाख रुपयांच्या किमतीत उपलब्ध करून देण्यात आले आहे.
Jeep Compass आणि Meridian चा Trail Edition झाला लाँच, किती आहे किंमत?
चला जाणून घेऊयात की Tesla Model Y आल्याने कोणत्या कारचे टेन्शन वाढणार आहे.
भारतात टेस्लाला सर्वात मोठे आव्हान देऊ शकणाऱ्या इलेक्ट्रिक कारमध्ये BYD Sealion 7 चा समावेश आहे. BYD Sealion 7 मध्ये 12 स्पीकर्स, वायरलेस फोन चार्जर, वॉटर ड्रॉप टेल लॅम्प, 15.6 इंच फिरणारी इन्फोटेनमेंट सिस्टम, व्हेंटिलेटेड आणि हीटेड सीट्स, 128 रंगांचे अँबियंट लाइट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, हेड-अप डिस्प्ले असे अनेक फीचर्स आहेत. एका चार्जमध्ये या कारला 567 NEDC रेंज मिळते. याची किंमत 48.9 लाख रुपयांपासून ते 54.90 लाख रुपयांपर्यंत आहे.
Hyundai Ioniq 5 मध्ये सुद्धा अनेक उत्तम फीचर्स पाहायला मिळतात. तसेच ही कार 631 किमी पर्यंत चालवता येते. यात दोन 12.3 इंच स्क्रीन, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, हीटेड आणि व्हेंटिलेटेड सीट्स, बोस ऑडिओ सिस्टम अशी अनेक फीचर्स आहेत. त्याची एक्स-शोरूम किंमत 46.05 लाख रुपयांपासून सुरू होते.
25 हजारांच्या पगारात सुद्धा खरेदी करता येईल Royal Enfield Hunter 350, असा असेल हिशोब
ह्युंदाई प्रमाणेच, किया देखील भारतीय बाजारात Kia EV6 ऑफर करते. या कारमध्ये ऑल व्हील ड्राइव्ह, 12.3 इंच डिस्प्ले, मेरिडियन ऑडिओ सिस्टम, V2L सारखे अनेक फीचर्स आहेत. यामध्ये बसवलेली बॅटरी 708 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. त्याची एक्स-शोरूम किंमत 65.97 लाख रुपये आहे.