Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KTM 390 Adventure R लवकरच होणार लाँच! ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीसह मिळणार जबरदस्त फीचर्स

KTM ने देशात अनेक उत्तम ॲडव्हेंचर बाईक ऑफर केल्या आहेत. आता त्यांचे हेच ॲडव्हेंचर बाईक सेगमेंट अजून उत्तम करण्यासाठी KTM 390 Adventure R बाईक लाँच होणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 22, 2025 | 06:40 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात लवकरच KTM 390 Adventure R बाईक लाँच होणार
  • बाईक 399cc इंजिनने सुसज्ज असणार
  • अंदाजे किंमत 4 लाख रुपये
भारतात ॲडव्हेंचर बाईक्सना सुद्धा चांगली मागणी मिळताना दिसते. याच मागणीकडे नीट लक्ष देत अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या दमदार बाईक ऑफर करत असतात. अशीच एक आघाडीची ऑटो कंपनी म्हणजे KTM.

भारतात अनेक वर्षांपासून KTM ने दमदार बाईक्स ऑफर केल्या आहेत. तरुणांमध्ये तर कंपनीच्या बाईक विशेष लोकप्रिय आहेत. आता केटीएम भारतात त्यांच्या ॲडव्हेंचर बाईक लाइनअपचा विस्तार करण्याची तयारी करत आहे. कंपनी लवकरच भारतीय बाजारात KTM 390 Adventure R लाँच करणार आहे. ही बाईक अशा रायडर्ससाठी डिझाइन केली आहे ज्यांना 390 Adventure पेक्षा अधिक ऑफ-रोड क्षमता आणि अधिक हार्डकोर सेटअप हवा आहे. या केटीएम बाईकमध्ये कोणते खास फीचर्स असतील त्याबद्दल जाणून घेऊयात.

Aprilia RS 457 च्या लूकमध्ये आकर्षक भर! मिळाले ‘हे’ 3 नवीन कलर

इंजिन

KTM 390 Adventure R मध्ये कंपनीचे 399cc, सिंगल-सिलेंडर LC4c इंजिन आहे. हे इंजिन 45.2 hp आणि 39 Nm टॉर्क निर्माण करते. हे 6-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिपर क्लचसह जोडलेले आहे, जे हायवे आणि ऑफ-रोड दोन्हीवर सहज रायडिंगसाठी उपयुक्त आहे. हे तेच पॉवर युनिट आहे जे KTM त्यांच्या मध्यम आकाराच्या परफॉर्मन्स बाईक्समध्ये वापरते.

ऑफ-रोडिंगसाठी बाईकचे हार्डवेअर अपग्रेड

390 Adventure R ला स्टॅंडर्ड मॉडेलपेक्षा वेगळे करणारी गोष्ट म्हणजे त्याचे ऑफ-रोड-केंद्रित हार्डवेअर. यात 21-इंच फ्रंट आणि 18-इंच रियर व्हील सेटअप आहे. सस्पेंशन ट्रॅव्हल 230 मिमी (पूर्वी 200 मिमी) आहे. ग्राउंड क्लीयरन्स 272 मिमी असेल आणि सीटची उंची 870 मिमी असेल. हे बदल स्पष्टपणे दर्शवतात की बाईक खडबडीत रस्त्यांवर, पायवाटांवर आणि कठीण ऑफ-रोड परिस्थितीत अधिक उत्तमरीत्या चालेल.

Maruti Suzuki चा प्लॅन ठरला! 2029 पर्यंत नवीन हायब्रीड MPV लाँच करणार, जाणून घ्या फीचर्स

अ‍ॅडव्हान्स तंत्रज्ञानाचा भरपूर वापर

आंतरराष्ट्रीय-स्पेक KTM 390 Adventure R मध्ये हेवी-ड्युटी स्पोक्ड व्हील्स आणि Mitas Enduro Trail E07+ टायर्स दिले जातात. मात्र, भारत-स्पेक मॉडेलला कोणते टायर्स मिळतील, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सस्पेन्शनबाबत बोलायचे झाले तर, फ्रंटला 43 mm WP Apex Open Cartridge फोर्क देण्यात आला आहे, ज्यामध्ये कंप्रेशन आणि रिबाउंड अ‍ॅडजस्टमेंटची सुविधा आहे. मागील बाजूस WP Apex स्प्लिट पिस्टन शॉक मिळतो. हा संपूर्ण सस्पेन्शन सेट-अप प्रो-लेव्हल ऑफ-रोड कंट्रोल देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.

किंमत आणि सेगमेंटमधील स्थान

KTM ने अद्याप अधिकृत किंमत जाहीर केलेली नसली तरी KTM 390 Adventure R ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 4 लाख रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. ही बाईक लाँच झाल्यानंतर KTM ची 390 Adventure रेंज पूर्ण होईल, ज्यामध्ये 390 Adventure X, स्टँडर्ड 390 Adventure आणि नवीन 390 Adventure R यांचा समावेश असेल.

Web Title: Ktm 390 adventure r soon launch in india know price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 06:40 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • bike

संबंधित बातम्या

Aprilia RS 457 च्या लूकमध्ये आकर्षक भर! मिळाले ‘हे’ 3 नवीन कलर
1

Aprilia RS 457 च्या लूकमध्ये आकर्षक भर! मिळाले ‘हे’ 3 नवीन कलर

Maruti Suzuki चा प्लॅन ठरला! 2029 पर्यंत नवीन हायब्रीड MPV लाँच करणार, जाणून घ्या फीचर्स
2

Maruti Suzuki चा प्लॅन ठरला! 2029 पर्यंत नवीन हायब्रीड MPV लाँच करणार, जाणून घ्या फीचर्स

1 लाखाचं डाउन पेमेंट आणि Hyundai Exter CNG थेट शोरूमधून दारात उभी, EMI फक्त…
3

1 लाखाचं डाउन पेमेंट आणि Hyundai Exter CNG थेट शोरूमधून दारात उभी, EMI फक्त…

अजबच! Made In India असून देखील ‘ही’ बाईक भारतीयांना खरेदी करता येणार नाही
4

अजबच! Made In India असून देखील ‘ही’ बाईक भारतीयांना खरेदी करता येणार नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.