Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KTM च्या ‘या’ बाईक्स मार्केटला राम राम करण्याच्या तयारीत? ऑफिशियल वेबसाइट वरून सुद्धा गायब

भारतीय बाजारात KTM ने अनेक उत्तम बाईक ऑफर केल्या आहेत. पण आता कंपनी आपल्या दोन बाईक मार्केटमध्ये बंद करण्याच्या तयारीत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 04, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम बाईक उत्पादक कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांच्या आवश्यकता आणि मागणीनुसार बाईक उत्पादित करत असतात. पूर्वी बाईक खरेदी करताना ग्राहक फक्त त्याची किंमत आणि मायलेजवर जास्त लक्षकेंद्रित करत होते. पण आजचा ग्राहक बाईक खरेदी करताना बाईक्सच्या लूककडे सुद्धा लक्ष देतो. म्हणूनच तर भारतात स्पोर्ट बाईक्सची विक्री सुद्धा झपाट्याने वाढताना दिसत आहे.

भारतात अनेक उत्तम स्पोर्ट बाईक उत्पादक कंपन्या आहेत. यातीलच एक कंपनी म्हणजे केटीएम.

केटीएम इंडियाने भारतीय बाजारातून त्यांच्या 125 Duke आणि RC 125 बाईक्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने या दोन्ही बाईक्स त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून हटवला आहेत, ज्यामुळे हे मॉडेल्स आता विक्रीसाठी उपलब्ध राहणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. हा निर्णय घेण्यामागचे कारण म्हणजे या बाईक्सची कमी विक्री. केटीएम लवकरच 160 ड्यूक आणि आरसी 160 लाँच करू शकते अशा देखील मार्केटमध्ये अफवा आहेत.

125 Duke 2018 मध्ये लाँच करण्यात आली

KTM ने 2018 मध्ये भारतात 125 ड्यूक लाँच केली होती. त्यानंतर काही वर्षांनी आरसी 125 लाँच झाली. परंतु, अलिकडच्या काळात 160 सीसी सेगमेंटची लोकप्रियता वाढली आणि यामुळे कंपनी आता 125 सीसी मॉडेलऐवजी 160 सीसी मॉडेल सादर करण्याची योजना आखत आहे.

125 ड्यूक आणि आरसी 125 मध्ये 124.7 सीसी, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन होते जे 14.3 बीएचपी आणि 12 एनएम टॉर्क निर्माण करत होते. त्यात 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला होता, परंतु कमी मागणीमुळे कंपनी आता हे मॉडेल्स बंद करत आहे.

2025 KTM 390 Duke नवीन फीचर्ससह लाँच

केटीएमने 2025 मॉडेल अंतर्गत नवीन अपडेट्ससह 390 ड्यूक सादर केली आहे. यावेळी क्रूझ कंट्रोल आणि एक नवीन कलर ऑप्शन – एबोनी ब्लॅक जोडण्यात आला आहे. डाव्या हँडलबारवर असलेल्या नवीन स्विचगिअर तंत्रज्ञानाद्वारे क्रूझ कंट्रोल नियंत्रित केले जाऊ शकते.

इंजिनमध्ये कोणताच बदल नाही

नवीन केटीएम 390 ड्यूकमधील इंजिन स्पेसिफिकेशन पूर्वीसारखेच ठेवण्यात आले आहे. हे 399 सीसी, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे, जे 44.25 बीएचपी पॉवर आणि 39 एनएम टॉर्क जनरेट करते. पूर्वी त्याचे इंजिन 373 सीसी होते, जे नवीन जनरेशनमध्ये 399 सीसी पर्यंत वाढवण्यात आले. ही बाईक 6-स्पीड गिअरबॉक्स आणि बाय-डायरेक्शनल क्विकशिफ्टरसह येते.

2025 KTM 390 Duke चे दमदार फीचर्स

या बाईकमध्ये उपलब्ध असलेल्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यात 5-इंचाचा TFT डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, क्रूझ कंट्रोल, लाँच कंट्रोल आणि ट्रॅक मोड सारखी फीचर्स आहेत, जी रेसिंग अनुभव सुधारतात. याशिवाय, बाईकमध्ये सुपरमोटो एबीएस आणि कॉर्नरिंग एबीएस फीचर्स देण्यात आले आहेत. यासोबतच, क्विकशिफ्टर आणि सेल्फ-कॅन्सलिंग इंडिकेटर उपलब्ध आहेत. बाईकमध्ये पूर्णपणे अ‍ॅडजस्टेबल सस्पेंशन सिस्टीम देखील आहे, ज्यामुळे रायडिंग अधिक सुरळीत होते.

Web Title: Ktm will discontinue 125 duke and rc 125 bike due to low sales

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • sports Bike

संबंधित बातम्या

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश
1

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक
2

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?
3

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ
4

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.