फोटो सौजन्य: Gemini
भारतात विविध सेगमेंटमध्ये बाईक ऑफर केल्या जातात. यातही 350 CC मधील बाईक्सला दमदार मागणी मिळताना दिसते. त्यात आता नवीन GST दरांमुळे त्यांच्या किमती देखील कमी झाल्या आहेत. यामुळे बाईक खरेदीदार आणि ऑटो इंडस्ट्रीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 350 CC सेगमेंटमध्ये अनेक दुचाकी उत्पादक कंपन्यांनी दमदार बाईक ऑफर केल्या आहेत. या सेगमेंटमध्ये Honda CB350 बाईक तर खूप लोकप्रिय आहे.
भारतात होंडाने बाईक आणि स्कूटर सेगमेंटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहे. नुकतेच कंपनीने होंडा CB350C चे एक स्पेशल व्हर्जन लाँच केले आहे. चला या नवीन बाईकच्या फीचर्स, किंमत आणि डिलिव्हरीबद्दल जाणून घेऊयात.
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने भारतीय बाजारात होंडा CB350C चे स्पेशल एडिशन लाँच केले आहे. कंपनीने त्याच्या इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
‘या’ कॉम्पॅक्ट SUV वर झाली ताबडतोड टॅक्स कपात! आता होणार लाखोंची बचत
कंपनीकडून दिलेल्या माहितीनुसार, या बाईकच्या स्पेशल एडिशनमध्ये स्पेशल एडिशन स्टिकर आणि नवीन ग्राफिक्स अनेक पार्ट्सवर लावण्यात आले आहेत. त्यासोबतच रिअर ग्रॅब रेलला क्रोम फिनिश देण्यात आले आहे. या एडिशनमध्ये सीटला काळा आणि तपकिरी रंगातील फिनिश मिळते. याशिवाय रेबेल रेड मेटॅलिक आणि मॅट ड्यून ब्राउन असे दोन कलर ऑप्शन देण्यात आले आहेत.
होंडाने या बाईकमध्ये 348.36cc क्षमतेचं सिंगल-सिलेंडर इंजिन दिलं आहे. यामधून 15.5 kW पॉवर आणि 29.5 Nm टॉर्क निर्माण होतो. यासोबतच 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
या बाईकमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामध्ये डिजिटल-ऍनालॉग मीटर, असिस्ट व स्लिपर क्लच, होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (HSTC), ड्युल-चॅनेल ऍब्स, आणि LED हेडलाइट्स व इंडिकेटर्सचा समावेश आहे.
होंडाने स्पेशल एडिशन 2.01 लाख (एक्स-शोरूम) किंमतीत भारतीय बाजारात लाँच केलं आहे. या बाईकची बुकिंग सुरू झाली आहे आणि डिलिव्हरी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल.
CB 350C ही Honda द्वारे 350cc सेगमेंटमध्ये ऑफर केली जाते, जी Royal Enfield, Yezdi, आणि Jawa सारख्या बाईक उत्पादकांच्या बाईकशी स्पर्धा करेल.