
फोटो सौजन्य: iStock
भारतात बनवलेल्या Hyundai Grand i10 ला ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (GNCAP) कडून 0-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. ही रेटिंग विशेषतः दक्षिण आफ्रिकेत विकल्या जाणाऱ्या मॉडेलसाठी आहे, परंतु या अहवालाने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे कारण या कारचे डिझाइन भारतात मोठ्या प्रमाणात सारखीच आहे. ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (GNCAP) द्वारे घेतलेल्या Hyundai Grand i10 च्या क्रॅश टेस्टचे निकाल जाणून घेऊयात.
Royal Enfield Classic 350 विरुद्ध Harley-Davidson X440 T, कोणती बाईक सरस? जाणून घ्या
Hyundai Grand i10 ला प्रौढ प्रवाशांच्या संरक्षणात 0/34 गुण मिळाले. बाल प्रवाशांच्या संरक्षणात 28.57/49 गुण मिळाले. ह्युंदाई ग्रँड आय10 च्या फ्रंटल इम्पॅक्ट टेस्टने फ्रंटल क्रॅश टेस्टमध्ये (64 किमी/तास) कंपनीला विचार करायला लावणारे निकाल दाखवले. शिवाय, डोके आणि मानेचे चांगले संरक्षण दिसून आले. ड्रायव्हर आणि प्रवाशांच्या डोक्याचे आणि मानेचे संरक्षण पुरेसे झाले.
ड्रायव्हर आणि प्रवाशांच्या गुडघ्यांना मर्यादित संरक्षण मिळाले. पायाच्या संरक्षणाबाबत, उजव्या पायाला (टिबिया) चांगले संरक्षण मिळाले, तर डाव्या पायालाही पुरेसे संरक्षण मिळाले.
2 लाखांचं Down Payment आणि नवी कोरी Tata Sierra ची थेट होम डिलिव्हरी, जाणून घ्या EMI?
GNCAP ने कारचा फूटवेल आणि संपूर्ण बॉडीशेल अस्थिर घोषित केला आहे, म्हणजेच अपघातात ते अतिरिक्त भार सहन करण्यास असमर्थ आहे. कोणत्याही कारसाठी ही सर्वात गंभीर बाब मानली जाते.
साईड इम्पॅक्ट टेस्टमध्ये ही कार अपयशी ठरली. साइड क्रॅश टेस्टमध्ये परिस्थिती चांगली नव्हती. तथापि, डोके आणि पेल्व्हिसचे संरक्षण चांगले असल्याचे आढळून आले. पोटाचे संरक्षण चांगले होते, परंतु छातीचे संरक्षण पूर्णपणे शून्य होते. शिवाय, वाहनाच्या साइड हेड प्रोटेक्शन (जसे की साइड एअरबॅग्ज) नसल्यामुळे साइड पोल टेस्ट घेण्यात आली नाही.