
फोटो सौजन्य: Pinterest
देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी सात-सीटर पर्यायासह मारुती एर्टिगा ऑफर करते. ही एमपीव्ही तिच्या सेगमेंटमध्ये सर्वात लोकप्रिय आहे. गेल्या महिन्यात, या बजेट एमपीव्हीच्या एकूण 16586 युनिट्स देशभरात विकल्या गेल्या, तर 2024 मध्ये याच कालावधीत 16056 युनिट्स विकल्या गेल्या होत्या.
2025 मध्ये ‘या’ Cars चा वेगळाच जलवा! ग्राहकांनी शोरूमबाहेर रांगा लावून बुक केली कार
महिंद्रा भारतीय बाजारपेठेत स्कॉर्पिओ ऑफर करते. कंपनीची ही 7-सीटर एसयूव्हीला गेल्या महिन्यात सर्वाधिक मागणी होती. आकडेवारीनुसार, या सात-सीटर एसयूव्हीच्या 15885 युनिट्स गेल्या महिन्यात विकल्या गेल्या, गेल्या वर्षी याच कालावधीत 12195 युनिट्स विकल्या गेल्या.
महिंद्रा बोलेरो गेल्या महिन्यात सर्वाधिक मागणी असलेल्या 7-सीटर कारपैकी एक होती. या एसयूव्हीने 2024 मध्ये याच कालावधीत 10611 युनिट्स विकल्या गेल्या, तर 2024 मध्ये याच कालावधीत 5921 युनिट्स विकल्या गेल्या.
बजाज ऑटोकडून पुणे पोलीस दलासाठी विशेष बाईक्स! सानुकूलित केलेली डोमिनार केली सादर
वाहन निर्माता Toyota कडून दीर्घकाळापासून Innova ही लोकप्रिय MPV बाजारात उपलब्ध आहे. ही लक्झरी MPV आपल्या सेगमेंटमधील सर्वाधिक पसंतीची गाडी मानली जाते. मागील महिन्यात या कारच्या एकूण 9900 युनिट्सची विक्री झाली आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत 9700 युनिट्स विक्रीची नोंद झाली होती.
मागील महिन्यात सर्वाधिक मागणी असलेल्या 7-सीटर कार्सच्या यादीत Kia Carens ने देखील स्थान मिळवले आहे. देशभरात या MPV ची 3681 युनिट्स विक्री झाली आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत 2626 युनिट्सची विक्री झाली होती.