2025 मध्ये 'या' Cars चा वेगळाच जलवा!
भारतात, गेल्या काही वर्षांपासून एसयूव्हीची मागणी सातत्याने वाढत आहे. मात्र, गेल्या वर्षी लहान कार्सनेही धमाकेदार कामगिरी केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारतात Mercedes ने एकाच वेळी लाँच केल्या ‘या’ 2 लक्झरी कार! जाणून घ्या किंमत
भारतात दरमहा लाखो वाहने विकली जातात, ज्यामध्ये चारचाकी वाहने या विक्रीचा मोठा वाटा उचलतात. एसयूव्ही सेगमेंटमध्ये, त्यानंतर एमपीव्ही सेगमेंटमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. मात्र, 2025 मध्ये एंट्री-लेव्हल छोट्या कार्सचाही कमबॅक झाला आहे.
रिपोर्टनुसार तब्बल 6 वर्षांनंतर भारतीय कार बाजारात छोट्या कार्सची बाजारातील हिस्सेदारी वाढली आहे. ऑक्टोबर 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीत हॅचबॅक कार्सने एकूण विक्रीत 24.4 टक्के योगदान दिले आहे. त्याचवेळी 2025 च्या पहिल्या नऊ महिन्यांत हे योगदान 23.5 टक्के इतके होते.
मारुती सुझुकीकडून भारतात एंट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये अनेक हॅचबॅक कार्स ऑफर केल्या जातात. यामध्ये Maruti Alto K10, Maruti S-Presso, Maruti Celerio आणि Maruti Wagon R यांचा समावेश आहे. उपलब्ध माहितीनुसार, या कालावधीत मारुतीच्या हॅचबॅक कार्सच्या विक्रीत तब्बल 92 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली गेली आहे. मागणी इतकी वाढली आहे की या कार्सचा वेटिंग पीरियड 1 ते 2 महिने इतका झाला आहे.
या सेगमेंटमध्ये Tata Motors कडून Tata Tiago ही कार ऑफर केली जाते. तर Hyundai कडून Grand Nios i10 उपलब्ध आहे. याशिवाय Renault देखील Kwid या कारची विक्री करते. माहितीनुसार, Tata Tiago च्या विक्रीतही 22 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
सप्टेंबर 2025 मध्ये केंद्र सरकारने जीएसटी दरांमध्ये कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर छोट्या कार्सवरील 28 टक्के जीएसटी कमी करून 18 टक्के करण्यात आला. जीएसटीत झालेल्या या कपातीमुळे छोट्या कार्सच्या किमतीत 25 ते 30 टक्क्यांपर्यंत घट झाली. याच कारणामुळे या सेगमेंटमधील कार्सच्या विक्रीत झपाट्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.






