फोटो सौजन्य: iStock
2024 मध्ये अनेक नवीन कार भारतीय बाजरात दाखल झाल्या. या नवीन वाहनांना ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. 2024 मध्ये कित्येक कारच्या विक्रीत वाढ झाल्या. पण काही कार अशा देखील आहेत, ज्यांच्याकडे ग्राहकांनी ढुंकूनही पाहिले नाही. चला या दुर्लक्षित कारबद्दल जाणून घेऊया.
2024 मध्ये ऑटोमोबाईल उद्योगाने अनेक नवीन टप्पे गाठले आहेत. मागील वर्षात 1,89,12,959 दुचाकी विकल्या गेल्या. दुसरीकडे, २०२४ च्या कॅलेंडर वर्षात 10,04,856 चारचाकी वाहने विकली गेली. तर २०२३ च्या कॅलेंडर वर्षात हा आकडा 10,04,856 युनिट्स होता. ४० वर्षांत प्रथमच, मारुती सुझुकी इंडिया नंबर-१ कारच्या स्थानावरून घसरली. तर टाटा पंच ही देशातील नंबर-१ कार बनली. पण याच 2024 मध्ये काही कार अशा आहेत ज्या वर्षभर ग्राहकांसाठी आसुसलेल्या होत्या. आज आपण या कारबद्दल जाणून घेऊया. तसेच, २०२५ मध्ये या कारचे भविष्य काय असेल त्याबद्दल जाणून घेऊयात.
अखेर उद्या Hyundai Creta Electric होणार लाँच, Auto Expo 2025 मध्ये किंमतीबाबत होईल खुलासा
2024 मध्ये एकीकडे टाटा पंच, मारुती वॅगनआर, मारुती स्विफ्ट, मारुती एर्टिगा, महिंद्रा स्कॉर्पिओ, ह्युंदाई क्रेटा सारख्या अनेक मॉडेल्सच्या विक्रीत मोठी वाढ झाली. तर दुसरीकडे स्कोडा सुपर्ब, महिंद्रा मराझो, ह्युंदाई आयोनिक ५, टोयोटा वेलफायर, ह्युंदाई टक्सन, टोयोटा कॅमरी, फोक्सवॅगन टिगुन, होंडा सिटी, रेनॉल्ट क्विड, मारुती सियाझ, टाटा टिगोर, मारुती एस-प्रेसो यासारख्या मॉडेल्सच्या विक्रीत घट झाली. यामध्ये असे अनेक मॉडेल आहेत ज्यांची किंमत खूप जास्त आहे, ज्यामुळे या कारची विक्री मर्यादित राहिली. त्याच वेळी, 2024 च्या अखेरीस काही मॉडेल्सची विक्री घसरली.
भारतीयांची आवडती Toyota Fortuner झाली महाग, व्हेरियंटनुसार वाढल्या किंमती
2024 च्या शेवटच्या 6 महिन्यांत म्हणजेच जुलै ते डिसेंबर या काळात सर्वात कमी विक्री झालेल्या कारबद्दल बोलायचे झाले तर, 4000 पेक्षा कमी विक्री झालेल्या कारच्या यादीत अनेक मॉडेल्सचा समावेश आहे. यामध्ये सर्वात कमी विक्री होणाऱ्या कारपैकी काही महागड्या मॉडेल्सचाही समावेश आहे. उदाहरणार्थ, टोयोटा वेलफायरची सुरुवातीची किंमत 1.22 कोटी रुपये, स्कोडा सुपर्बची किंमत 54 लाख रुपये, टोयोटा कॅमरीची किंमत 48 लाख रुपये, ह्युंदाई आयोनिक 5 ची किंमत 46 लाख रुपये, फोक्सवॅगन टिगुनची किंमत 35 लाख रुपये आणि ह्युंदाई टक्सनची किंमत 30.36 लाख रुपये आहे.
दुसरीकडे, काही मॉडेल्स असे देखील आहेत ज्यांची किंमत लोकांच्या बजेटमध्ये असून सुद्धा त्यांच्या विक्रीत वाढ झाली नाही. उदाहरणार्थ, रेनॉल्ट क्विडची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत फक्त 4.70 लाख रुपये आहे. मारुती अल्टो K10 नंतर ही देशातील दुसरी सर्वात स्वस्त कार आहे. असे असूनही, त्याची विक्री वर्षभर थंड राहिली होती. दुसरीकडे, मारुती सियाझची किंमत 9.40 लाख रुपयांपासून सुरू होते आणि महिंद्रा मराझोची किंमत 14.59 लाख रुपयांपासून सुरू होते. या दोन्ही कारची विक्री देखील धीम्या गतीने सुरु होती.