फोटो सौजन्य: Social Media
भारतात विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर होत असतात. अनेक ऑटो कंपन्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये सुद्धा कार ऑफर करत असतात. आपल्या देशात एसयूव्ही कारबद्दल खूप क्रेझ आहे. एसयूव्ही कारमध्ये अनेक दमदार फीचर्स असतात जे या कारला इतर कारपेक्षा वेगळे बनवते.
देशात अनेक एसयूव्ही कार लोकप्रिय आहेत. पण त्यातही टोयोटा फॉर्च्युनरच्या लोकप्रियतेची सर दुसऱ्या कारला नाही. अनेक सेलिब्रेटीज आणि नेतेमंडळी ही एसयूव्ही वापरताना दिसतात, याचे कारण म्हणजे त्यातील सेफ्टी फीचर्स.
Kia Syros Vs Skoda Kylaq: कोणती कॉम्पॅक्ट एसयूव्ही खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर?
आजही टोयोटा फॉर्च्युनरचा मालक असणे हे आपल्याकडे प्रतिष्ठेचे मानले जाते. ही एक मोठ्या आकाराची एसयूव्ही आहे. पण आता ही एसयूव्ही खरेदी करणे महागले आहे. जर तुम्ही टोयोटा फॉर्च्युनर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कंपनीने या मोठ्या आकाराच्या एसयूव्हीची किंमत 50000 रुपयांनी वाढवली आहे.
टोयोटा फॉर्च्युनरच्या स्टॅंडर्ड GR-S व्हेरियंटची किंमत 50 हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे, तर 2.8-लिटर, डिझेल इंजिन ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल असलेल्या 4×2 आणि 4×4 व्हेरियंटची किंमत 40 हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. याशिवाय, 2.7-लिटर पेट्रोल मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक 4×2 व्हेरियंटच्या किंमतीत 35 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, टोयोटा फॉर्च्युनरची किंमत सध्या 33.78 लाख रुपये ते 51.94 लाख रुपये एक्स-शोरूम दरम्यान आहे. टोयोटा फॉर्च्युनर 4×2 आणि 4×4 ड्राइव्हट्रेनसह अनेक व्हेरियंटमध्ये येते.
MG ने वाढवल्या ‘या’ कारच्या किंमती, ग्राहकांचा खिस्सा होणार अजूनच रिकामा
टोयोटा कंपनीच्या प्रसिद्ध फॉर्च्युनर कारमध्ये अनेक सेफ्टी फीचर्स समाविष्ट आहेत. या कारचे शक्तिशाली इंजिन आणि रंगीत पर्याय या कारला आणखी चांगले बनवतात. फॉर्च्युनर कारमध्ये ७ सीटर सुविधा आहे जी सात व्हेरियंटमध्ये आणि दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
टोयोटा फॉर्च्युनर 7-सीटर एसयूव्ही पहिल्यांदा 2009 मध्ये भारतात लाँच करण्यात आली होती. यानंतर, टोयोटाने फॉर्च्युनर जीआर स्पोर्ट व्हेरियंट जोडून आपल्या लाइनअपचा विस्तार करण्यास कंपनीने सुरुवात केली.
टोयोटा फॉर्च्युनरच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यात एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करते. याशिवाय, फॉर्च्युनरमध्ये 360 डिग्री पार्किंग कॅमेरा, वायरलेस चार्जिंग, किक-टू-ओपन पॉवर्ड टेलगेट आणि अँबियंट लाइटिंग सारखे फीचर्स देखील उपलब्ध आहेत.
प्रत्येक राज्यासाठी फॉर्च्युनरचा वेटिंग पिरियड वेगवेगळ्या डीलर्स आणि व्हेरियंटनुसार बदलू शकतो. त्याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या टोयोटा डीलरशी संपर्क साधू शकता.