चारचाकी गाड्यांवर 1 टक्क्यांनी करवाढ करण्यात येणार आहे
महाराष्ट्रात कारच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अनेक ऑटो कंपन्या राज्यात कार्यरत आहेत, ज्या बजेट फ्रेंडली आणि उत्तम फीचर्स असणाऱ्या कार ऑफर करत असतात. आपण सगळेच जाणतो की कार खरेदी करताना आपल्याला अनेक कर द्यावे लागते, ज्यामुळे कारची किंमत वाढते.
जर तुम्ही सुद्धा कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. याचे कारण म्हणजे आता तुमच्या स्वप्नातील कार खरेदी करताना तुम्हाला अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत. आज महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प सादर झाला आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. यात त्यांनी राज्य सरकार चारचाकी गाड्यांवर 1 टक्क्यांची करवाढ करणार असल्याचे सांगितले आहे.