फोटो सौजन्य: @MahindraBolero/X.com
भारतीय बाजारात SUV गाड्यांना नेहमीच मोठी मागणी असते. ही वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन अनेक ऑटो कंपन्या सतत नवीन आणि दमदार SUV मॉडेल्स बाजारात आणत आहेत. मात्र, SUV म्हटले की आजही ग्राहकांची पहिली पसंती Mahindra च्या गाड्यांनाच मिळते. कंपनीच्या SUV गाड्या त्यांच्या हाय परफॉर्मन्स आणि विश्वासार्हतेसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. नुकतेच कंपनीने त्यांच्या 2 लोकप्रिय एसयूव्ही अपडेट केल्या आहेत.
महिंद्राने नवीन Bolero आणि Bolero Neo फेसलिफ्ट मॉडेल्स लाँच केले आहेत. नवीन एसयूव्हीमध्ये अनेक बदल झाले असले तरी, त्यांचे एकूण स्वरूप तेच आहे. महिंद्राने सांगितले की हे बदल मुख्यत्वे ग्राहकांच्या मागणीवर आधारित आहेत.
फेसलिफ्टेड महिंद्रा बोलेरो निओ आणि बोलेरो निओची किंमत मागील मॉडेलसारखीच आहे. बोलेरो निओची किंमत 8.49 लाख ते 9.99 लाख रुपये आहे. बोलेरोची किंमत 7.99 लाख ते 9.69 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. महिंद्राने दोन्ही एसयूव्हीच्या इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. मात्र, सुधारित हँडलिंगसाठी सस्पेंशन कंपनीच्या नवीन ‘राइडफ्लो टेक’ नुसार ट्यून केले आहे.
भारतीयांची लाडकी TVS Raider नव्या रूपात होणार लाँच, ‘हे’ 5 मोठे बदल मिळतील पाहायला
नवीन Mahindra Bolero Neo च्या फ्रंट डिझाइनमध्ये नवीन ग्रिल बसवून याला एक फ्रेश लुक देण्यात आला आहे. या ग्रिलमध्ये हॉरिझॉन्टल स्लॅट्स आणि क्रोम फिनिशिंग दिल्यामुळे कार अधिक प्रीमियम दिसते. यात दोन नवीन कलर ऑप्शन्स, Jeans Blue आणि Concrete Grey जोडले गेले आहेत, जे SUV च्या नवीन N11 व्हेरिएंट मध्ये उपलब्ध असतील. हा नवीन टॉप-एंड N11 व्हेरिएंट ड्युअल-टोन पेंट आणि नवीन 16-इंच अलॉय व्हील्स सह येतो.
कारच्या इंटिरिअरमध्ये Lunar Grey रंगाची थीम दिली गेली आहे. हा रंग फक्त N11 ट्रिम मध्ये उपलब्ध असेल, तर लोअर व्हेरिएंटमध्ये पूर्वीप्रमाणे Mocha Brown शेड मिळत राहील. याशिवाय, सीट्समध्ये आता अधिक चांगली कुशनिंग देण्यात आली असून सोयीसाठी एक USB-C चार्जिंग पोर्ट सुद्धा जोडण्यात आला आहे.
Bolero Neo च्या N10 आणि N11 व्हेरिएंट्स मध्ये आता 8.9-इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम आणि रियर-व्यू कॅमेरा अशी नवी फीचर्स देण्यात आली आहेत.
नव्या Mahindra Bolero Facelift मध्ये कंपनीने Stealth Black नावाचा नवीन पेंट शेड सादर केला आहे, जो सर्व व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असणार आहे. बोलेरोमध्ये आता नवीन डिझाइनची ग्रिल देण्यात आली असून त्यात आकर्षक क्रोम हायलाइट्स जोडले आहेत.
याशिवाय या एसयूव्हीत एक नवीन B8 व्हेरिएंट सादर करण्यात आला आहे. या टॉप-स्पेक B8 व्हेरिएंटमध्ये डायमंड-कट अलॉय व्हील्स, नवे फॉग लॅम्प्स, टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, USB-C चार्जिंग पोर्ट, लेदर सीट कव्हर्स आणि अधिक आरामदायक सीट कुशनिंग सारखे फीचर्स दिली गेली आहेत.