फोटो सौजन्य: X.com
भारतात नेहमीच बजेट फ्रेंडली बाईक्सना चांगली मागणी मिळताना दिसते. त्यातही जर त्या बाईकचा लूक स्टायलिश असेल तर मग त्या बाईकच्या विक्रीत हमखास वाढ होते. मार्केटमध्ये आपल्या अनेक उत्तम लूक असणाऱ्या बजेट फ्रेंडली बाईक दिसतील. यातीलच एक बाईक म्हणजे TVS Raider 125.
भारतातील लोकप्रिय बाईक्सपैकी एक असलेली TVS Raider 125 चा अपडेटेड व्हर्जन लाँच होऊ. या नवीन टीव्हीएस रेडरमध्ये फीचर्सपासून ते किंमतीपर्यंत पाच मोठे बदल असण्याची शक्यता असू शकता.
क्लासी लूक अन् दमदार परफॉर्मन्स! Triumph च्या ‘या’ 2 बाईक झाल्या स्वस्त
नवीन TVS Raider मध्ये पहिल्यांदाच ABS देण्यात येणार आहे. हे फक्त फ्रंट व्हीलवर काम करेल. याव्यतिरिक्त, बाईकमध्ये मागील डिस्क ब्रेक देखील आहे, जो चांगले ब्रेकिंग प्रदान करेल.
नवीन TVS Raider ला आता एक नवा ड्युअल-टोन रेड कलर मिळणार आहे. यात कॉन्ट्रास्टिंग व्हाइट स्ट्राइप्स आणि रेड पेंट केलेलं फ्रंट व्हील दिलं आहे, ज्यामुळे बाईक पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक दिसेल. मात्र, या बाईकमध्ये टॉप-स्पेक SX व्हेरिएंटप्रमाणे TFT डिस्प्ले मिळणार नाही, त्याऐवजी जुनंच LCD इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलं जाईल.
नवीन TVS Raider मध्ये जुन्या मॉडेलच्या तुलनेत अधिक रुंद टायर दिले जाण्याची शक्यता आहे. यात नवे फॅटर टायर असतील, जे 90 सेक्शन फ्रंट आणि 110 सेक्शन रियर आहे, जे आधीच्या 80 आणि 100 सेक्शन टायरपेक्षा मोठे आहेत. यामुळे बाईकची स्ट्रेट-लाइन स्टेबिलिटी आणि हँडलिंग आणखी सुधारेल.
Toyota Kirloskar Motor च्या वाहनांना ग्राहकाचा कसा प्रतिसाद? सप्टेंबर 2025 मध्ये किती वाहनं विकली?
नवीन TVS Raider ला एक नवीन व्हेरिएंट मिळू शकतो. सध्या ही बाईक SX, SSE, iGO, SPLIT SEAT, SINGLE SEAT आणि DRUM अशा व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. नवीन व्हेरिएंटमध्ये ABS असण्याची शक्यता आहे.
TVS Raider ची एक्स-शोरूम किंमत 80,500 रुपयांपासून सुरू होते आणि टॉप-स्पेक SX व्हेरिएंटची किंमत 94,500 रुपये आहे. नवीन ABS आणि रियर डिस्कसह या मॉडेलची किंमत SX व्हेरिएंटच्या आसपास असण्याची शक्यता आहे.